| प्रस्तावना
कोकणातील रत्नागिरी जिल्हयातील सांस्कृतिक राजधानीचे समृध्द शहर चिपळूण. याच शहरात
अगदी सुमोर 100 वर्षापर्यंत साठ तळी अस्तित्वात होती. ही तळी पाण्याने बारा माही
तुडंब भरलेली असायची त्याप्ौकी काही तळयांमध्ये विविध प्रकारच्या कमळांचा बहर यायचा.
विविध प्रकारच्या जलपर्णी जलपृष्ठावर मोहोरून जायच्या. या तलाव परिसरात जलचर, पाणपक्षी,
फुलपाखरे अशा प्रकारच्या जैवविविधतेची मांदीअाळी असायची.
या जलाशयामुळे चिपळूण नगरीच्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीचा समातोल राखला गेला.
याचा परिणाम स्वरूप म्हणून हिरव्या वृक्षाराजीचे प्रमाण चांगले राखले गेले होते.
अशा प्रकारे चिपळूण नगराच्या स्ाौदर्यात अधिकच भर जणू निसर्गात:च घातली गेली.
सध्याच्या साने गुरूजी उद्यानाच्या ठिकाणी सुर्यकुंड नावाचे तळे होते. यामध्ये सुर्यकमळे
बहरायची. श्री गौतमेश्वर मदिरापासून तळयाकडे उतरण्यास घाट होता. सद्याच्या चिपळूण
नगर परिषद विश्रामधामाच्या ठिकाणी {मुरम तळी| होती. रावतळे हे नावही {बारारावांचे
तळी| यावरूनच आले आहे. विंध्यवासिनी मंदिरालगत अगस्ती कुंड तळे आजही आहे. कावीळतळी
हे नावही तलावावरून पडले आहे. पवारआळी नजीकचे कुंभारतळे काय किंवा रॉयल नगर नजीकचा
नारायण तलाव काय शेवटच्या घटका मोजत आहे. रामतीर्थ तलाव कसाबसा तग धरून उभा आहे.
पेठ मापातील ओहरलेल्या तळयात तर खाजगी अतिक्रमण आहे. फरश्ाी तिठया नजीकच्या अर्धवट
स्थितीत असल्याने तलावालाही उर्जितावस्थेची प्रतिक्षा आहे.
विरेश्वर तलावाचे सुशोभिकरण व जतनीकरण कार्याचाआदर्श ठेवून सुनियोजनबध्द तलाव विकास
आराखडयाद्वारे उर्वरित तलावांचे जोपासणा व सुशोभिकरण मोहिम जोमाने राबविल्यास चिपळून
रहिवास्यांना विरंगुळयाचा पर्याय तर मिळेलच शिवाय शहराची सौदर्यवृध्दी होऊन शहर
समृध्दीच्या संधीचे सोने करून घेईल.
फरशी
तिठयावरील प्राचीन तलाव
फरशी तिठया लगतच श्री परशुराम पादुका मंदिराचे मागील
बाजूस हा प्राचीन तलाव आहे. हा तलाव श्रीदेव भार्गवराम देवस्थानचे अख्त्यारीत
आहे. 4-5 एकराहून अधिक क्षेत्रफळात
पसरलेल्य या तलावात विशिष्ट मोसमात सुर्यकमळांचा बहर असतो. तलाव परिसरात झाडीमुळे
वैविध्यपूर्ण पक्षी-फुलपाखरांचा नियमित वावर असतो.
वीरेश्वर तलाव
वीरेश्वर मंदिराच्या लगतच प्राचीन तलाव आहे. या तलावाचे विशिष्ट हंगामात बहरणा-या
कमळांमुळे सौदर्य विलोभनीय दिसते. या तलाव परिसरात मगर व विविध पक्षांचे दर्शनही
सुखमय वाटते. या तलाव्ााच्या दुरावस्थेतून त्यास उर्जीतावस्था प्राप्त करून
त्याचे संरक्षण व संवर्धनाचे स्थानिकांनी एकत्र येऊन श्री वीरेश्वर मित्र मंडळाची
स्थापना केली. मंदिराच्या मागील बाजूस साफसफाई व उत्खनन मोहिमे दरम्यान ऐतिहासिक
बांधीव घाटाचा / पाय-यांचा शोध लागला तसेच महिषासुरमर्दिनी देवी मूर्ती सापडली.
मंडळ तलाव सुशोभिकरण मोहिमे अंतर्गत करावयाच्या कामांसाठी विविध स्तरांवर अविरत
प्रयत्न सुरू आहेत्ा. मंडळाने तज्ञांच्या मार्गदर्शनानूसार सुशोभिकरण आराखडा
बनविला आहे. शहराच्या मध्यवर्ती एक आकर्षक पर्यटन स्थळ बनविण्याच्या दृष्टीने
जलद मार्ग क्रमन सुरू आहे.
सन 1929 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या विरेश्वर तलावा शेजारी परीसरात खोती
व अस्पृश्यते विरोधी आंदोलन केले हाते. त्यामुळे हा परिसर समाज परिवर्तनाच्या
लढयाने पावन झाला आहे.
|