प्राचीन पाखाडया व विहीरी
 

वैजी शिरळला जोडणारी प्राचीन पाखाडी


शिरळ ते वैजी यांचा संबंध मोठया दगडात बांधलेल्या पाखाठुव्दारे जोडला गेला आहे. पाखाडीचे वरील बाजूस पूर्वी चंडकाई मंदिर होते. वैजी व शिरळ या गावांच्या मध्यावर ते शके 1714 मध्ये बांधल्याची नोंद असल्याचा शिलालेखहोता. ही पाखाडी जावळीच्या चंद्रराव मोरे यांनी बांधल्याचा इतिहसात उल्लेख आढळतो.

    

प्राचीन परशुराम पाखाडी


मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गापासून आत पेढे या गावात कोष्टीवाडीतून श्री परशुराम क्षेत्राकडे जाणारा मजबूत जांभा दगडी बांधणीचा ऐतिहासित पाखाछी मार्ग आहे. हा मार्ग शिवकालीन चंद्रराव यांन्ाी बांधल्याचा उल्लेख अतिहासात आढळतो. शेकडो वर्षापूर्वी चिपळूण बाजारपेठेकडून अनेक भाविक चालत या स्थानी कामधेनू शीलेचे पूजन करण्यासाठी येत. तेथून शंभर वाम अंतरावरील श्रीराम पादुकांवर अभिषेक करीत. श्री परशुराम पाखाछी मार्गास येथूनच प्रारंभ होतो. ऐतिहासिक पाच पारांपैकी पहिला पार येथे आहे. येथील पिंपळ वृक्षाखाली विश्रांती घेऊन भाविक श्री परशुराम दर्शनाच्या ओढीने पाखाडया चढू लागतं. रेखीव जांभा दगडाच्या कमानी व प्रवेशव्दारानजीक दुसरा पार आहे. महेंद्र पर्वत चढून थकलेला यात्री येथून शीतल वा-याच्या झुळका अंगावर घेत वाशिष्टीवे खोरे आणि दाट वनराईतील चिप्ाळूण नगरीचे नयनरम्य दर्शन घेऊन विश्रांती घेंई. येथूनच श्रीपरशुराम परसावणीस प्रारंभ होतो. प्रवाही गोमुखच्या शीतल जलाने भाविक ताजातवाना होई व श्रींचे दर्शनास जात असे. कामधेनू मंदिर ते श्री परशुराम मंदिर यात्रेचा पाखाछी मार्ग सांस्कृतिक परंपरेचा ऐतिहासिक वारसा आजही साक्ष देत आहे.

वैजीतील प्राचीन विहीर


वैजीतील श्री देव सुकाई चंडकाई देंवस्थान परिसरात पुरातन विहीर असून, पापंडवांनी बांधल्याचे सांगतात. जांभ्या दगडाने बांधलेल्या या विहिरीत उतरण्यासाठी पाय-यांची रचना आढळते. या विहिरीचे बाजूच्या बांधमध्ये पुरातन लिपीतील शिलालेख होता. त्यावर स्त्री व गाढव यांची चित्रे कोरली होती. स्थानिक यास {गाद्या गाढव| असे संबोधायचे. मात्र आज हा शिलालेख विहिरीजवळ पाहण्यास उपलब्ध नाही. य्ाा विहिरीशी पेशव्यांचा संबंध असल्याचेही सांगितले जाते. विहिरीचे जल देवस्थान व गा्रमस्थ दैनंदिन वापरतात.

परशुराम येथील धावजीची विहीर


पेढे ~परशुराम गावचे ग्रामदैवत श्री धावजी व जाख माता आहे. त्यांचे प्रशस्त मंदिर परशुराम मंदिरा नजीक आहे. या मंदिरा समोर पेशवे कालीन वैशिष्टयपूर्ण बांधणीची प्रेक्षणिय विहीर आहे. तिला {धावजीची विहीर| असे संबोधतात. या विहीरीचे पाणी बाणगंगेत येण्यासाठी चिरेबंदी घाटाची रचना केलेली आजही पहावयास मिळते.

 
© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions