दसपटीतील पर्यटन
 
प्रस्तावना

चिपळूण तालुक्यातील पूर्व विभाग रेखांश 73, 74 व अक्षांश 17, 40 दरम्यान भाग पूर्वीपासून दसपटी म्हणून ओळखला जातो. घनदाट अरण्य, उंच सहयाद्री रांगा आणि निसर्गरम्य वातारणात फुललेल्या या प्रांताचा इतहास अन् भूगोल बारगाव कोळयांचे साम्राज्य अन् तद्नंतरच्या आदिलशाहीतील शिंदे सरदाराने केलेल्या पाडावानंतर बदलला. मराठयांच्या कर्तबगारीच्या पाऊलखुणा आजही या विभागात पहायला मिळतात. अलिकडच्या काळात ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचे पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दसपटी विभाग पर्यटन व्यवसायास अतिशय अनुकूल आहे, असे वाटते. या अनुषंगाने येथील काही महत्वाच्या पर्यटन स्थळांची माहिती देत आहोत. दसपटीतील देवराई अखंड राखण्यात 5 मंदिरे स्थापणा-या यशवंतराव शिंदे यांचा मोठा वाटा आहे.

मजरे दादरचे श्रीरामवरदायिनी मंदिर


श्री रामवरदायिनी मंदिराचे बांधकाम म्हणजे वास्तशिल्पशास्त्रातील एक अनोखे कसब होय ! जयपूरहून आणलेल्या श्रीरामवरदायिनीदेवी, श्री वाघजाई देवी व श्रीमहिषासूरमर्दिनी देवी यांच्या मूर्ती हे या मंदिराचे खास वैशिष्टय आहे. त्याचप्रमाणे श्रीगणपती, श्रीसाईबाबा, बारा ज्यातीर्लिंग यांच्या विलोभनीय मूर्तीचेही दर्शन येथे घडते. या मंदिर परिसराचे रंगकाम डोळे दिपवणारे असून विद्युत रोषणाई, जोडणी काम अचंबित करते. दसपटीत आढळलेल्या ताम्रपटावरील तत्कालीन मराठी मानचिन्हाचा व संगमरवरी बांधकामाचा मंदिर सुशोभिकरणात वापर केला आहे. मंदिर परिसरातील देवराई व उद्यानही मन प्रफुल्लित करतात.

शिंदे आणि कदम सरदारांनी सहयाद्रीच्या कुशीतील खो-यावरील जुलमी बारराव कोळी सत्ता नष्ट करून पादाक्रांत केली. त्याचवेळी त्यांनी आपली कुलदेवता श्री रामवरदायिनीचे मंदिर उभाउले. त्याचीच आठवण म्हणून दसपटीतील कन्या व सुनांनी मंदिर उभारणीस घरातील र्कत्या पुरूषांना मोलाच सहकार्य केले. तेरा गावातील ग्रामस्थांनी मुंबई स्थित ग्रामस्थांसमवेत एकत्रपणे महत्प्रयासाने योगदान करून सुमारे सव्वा कोटी रूपये खर्चाचे हे जीर्णोध्दारित मंदिर उभे केले आहे.

मंदिराचे तेरा शिलेदार


मंदिराच्या विशेष अप्रूप बाबी म्हणजे मंदिराचे तेरा खांब, प्रवेशद्वारावर तेरा भाले, तेरा छोटी प्रवेशद्वारे, तेरा छोटे घुमट, असे तेरा आकडयांमध्ये गुतलेल्या या मंदिराचे मानकरी तेरा गावातील प्रमुख, जेष्ठ नागरिक आहेत.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दसपटीतील या मंदिर वास्तू उभाणीद्वारे आपल्या कर्तृत्वाला साजेसे कार्य पार पाडले आहे. एकीचे फळ मंदिर उभारणीस आले बळ या उक्तीचा आदर्श घालून दिला आहे. अशा या जीर्णोध्दारीत मंदिराच्या वास्तूचा उद्घाटन सोहळा सोमवार दि. 12 नोव्हेंबर 2001 रोजी संतश्री गगनगिरी महाराज यांचे शुभहस्ते राजेशाही थाटात संपन्न झाला.

निसर्गरम्य वातावरणातील भव्य दिव्य देखणे मंदिर म्हणजे कोकणची शान, महाराष्ट्राचा मान याची वैभवी साक्ष देत आहे.

मोरवणेचे केदार-सुकाई-झोलाई मंदिर


निसर्गरम्य देवराई आणि अलिकडच्या काळात शासनाने बांधलेले धरण, स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामदेवतेच्या मंदिराला दिलेला आधुनिक साज यामुळे मोरवणे परिसर तालुक्याच्या पर्यटनात्मक नकाशावर आला आहे. हिरवीगार, गर्द आणि समृध्द वनराईत वसलेल्या गावात भारताचा डौलदार राष्ट्रीय पक्षी मोर यांची विपुल प्रमाणातील वसाहत व मुक्त संचार यावरूनच या गावाला मोरांचे वन ते मोरवन असे मूळचे नाव्ा असावे. त्याचा अपभ्रंश होऊन मोरवणे असे नाव कायमचे रूढ झाले आहे, असा तर्क येथील जाणकार मंडळी मांडतात. कवि केशव जोशी यांनी रचलेल्या मोरवणे दर्शन या कवितेतही गावाचा उल्लेख आहे.

कधी कधी तो मोर गर्जती ।
रानी वनी या स्थळी ।।
म्हणून शोभेल नाम असे ते ।
मोरवणे हो जगी ।


या गावाचं मूळ दैवत श्रीकेदार ही पूर्व सत्तेची तर सुकाई, झेलाई, कालकाई व मंदिरातील इतर देवस्थाने ही राजसत्तेने स्थापन झाली. तत्कालीन जनतेने ही दैवते भक्तिभावाने आपलीसी केली. मूळ दैवतांच्ो हे मंदिर गर्द वनराईत आहे व याबाबतची वैशिष्टपूर्ण आख्यायिका अशी, पौराणिक काळात पर्वत हालचाल करीत असत. त्याकाळात विंध्य पर्वताने हिमालय पर्वताची बरोबरी करण्याचे ठरविले. परंतू अगस्ती ऋषींनी सर्व जाणून ईश्वरी संकेतानुसार विंध्य पर्वत ओलांडून मी परत येईपर्यंत स्पर्धा बंद कर, अशी आज्ञा दिली. आज्ञा मान्य करून विंध्य पर्वत तसाच पडून राहिला. अगस्ती ऋषी दक्षिणेत असतांना कोल्हापूर प्ारिसरात दैत्यांनी उच्छाद मांडला होता. या त्रासाला कंटाळून करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी उत्तरेस बद्रीकेदारला निघून गेली. या राक्षसांचा नाश करण्यासाठी प्रत्यक्ष श्रीदेव ब्रह्मा, विष्णू, महेश व जमदग्नी ऋषी एकरूपात सर्व शक्तीमान अवतार धारण करणारे होते. या परश्वरी संकेताची मानव प्रतीक्षा करीत होते. याच दरम्यान हिमालयात पैगंडी ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा यांनी केलेले ब्रह्मकल्पाचे शनिप्रदोष व्रत पूर्ण होत आले होते. विश्वतारक, दुर्बलांचा कैवारी, सर्व शक्तिमान पूत्र लाभावा या संकल्पानुसार विमलांबुला हिच्या हातात ज्योत प्रकटली. त्यालाच केदारलिंग, रवळनाथ, ज्योतिबा ही नावे पडली. या केदारनाथाने अनेक देवतांच्या सहाय्याने उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रयाण केले. दुष्टांचा संहार केला. त्याच दिशेला तोंड करून तो गावात भक्तांचे आजही संरक्षण करीत आहे.

मंदिर परिसरात गर्द देवराईची जोपासना केली आहे. गावात धरण प्रकल्पग्रस्तांनी या मंदिराची सुमारे 500 वर्षाची ऐतिहासिक परंपरेचा मान राखण्यासाठी मंदिर स्थलांतरित केले. ग्रामस्थांनी अपार मेहनतीतून सुंदर शिल्प निर्माण केले आहे.

आज भव्य दिव्य आकर्षक मंदिर वास्तू, नजीकचा धरण प्रकल्प व सभोवताली गर्द वनराईने बहरलेला निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भुरळ पाडतो. दैदिप्यमान इतिहास लाभलेले व सैनिकी परंपरा जोपासलेल्ो हे गाव पर्यटन क्षेत्रासही खुणावते आहे. चिपळूण-खांदाट पाली मार्गे - मोरवणे अंतर सुमारे 10 किमी. आहे.

टेरवचे श्री भवानी माता मंदिर


टेरव गावात भव्य दिव्य श्री भवानी मातेचे जीर्णोध्दारित मंदिर आहे. मंदिरास दोन घुमट असून मंदिरासभोवती बाहेरील बाजूने विविध शिल्पे व मूर्ती कोरलेल्या आहेत. दक्षिणात्य व राजस्थानी कलेचा अनाेखा संगम येथे दृष्टीस पडतो. मंदिराच्या भिंतींवर बाहेरील बाजूंनी दशावतारांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराचे पिछाडीस देवराई आहे. मंदिरात पुरातन दैवतांच्या पाषाणमूर्ती आहेत.

तिवरे येथील श्री व्याघ्रांबरी देवी


तिवरे गावचे ग्रामदैवत श्री देवी व्याघ्रांबरी देवस्थान हे वनश्रीने नटलेल्या परिसरात आहे. येथील त्रैवार्षिक जत्रोत्सव (समा) हा सुमारे पाचशे पर्षांची परंपरा लाभलेला धार्मिक एकात्मतेची प्रचिती दाखविणारा नययरम्य सोहळाच मानला जातो. या यात्रेनिमित्ताने नजीकच्या अरण्यातून सुमारे 45 फुट लांब सरळ रेषेत वाढलेले झाड तोडून, सोलून लाट तयार केली जाते. ही लाट मंदिरापर्यत ढोल ताशाच्या गजरात आणली जाते. यात्रेस पूर्वापार सात गावच्या ग्रामदेवतांच्या पालख्यांचे तिवरेत आगमन होते. दादर येथील श्री रामवरदायिनी देवीची पालखी हे विशेष आकर्षण असते. पालखी आगमनानंतर विविवत पूजा व रात्री पालख्यांचा छबिना, दुसरे दिवशी विधीवत पूजन, लाट चढविणे व फिरविणे व सायंकाळी पालख्यांची रवानगी व रात्रौ लोकनाटय असे पांरपारिक प्रेक्षणीय कार्यक्रम संपन्न होतात. ग्रामदेवता श्री व्यांघ्र्ाांबरी देवी मंदिरात श्री केदारेश्वर, श्री देवी महालक्ष्मी, श्री देवी नवश्री व श्रीदेव नागोबा यांच्या मूर्ती असून त्यांचेही भक्तिभावाने दैनंदिन पूजन होते.

तिवरेची गंगा


सहयाद्री पर्वताच्या पायथ्याशिच तिवरे गावची गंगेची वाडी आहे. येथील गंगा कुंडात दर तीन वर्षांनी कार्तिक महिन्यात गंगा उगम पावते. या गंगेवरूनच या वाडीस गंगेची वाडी हे नांव पडले. गंगा कुंडाच्या काठावर श्री शंकर, श्रीदेवी गंगा व श्री मारूती यांची टुमदार मंदिरे आहेत. गंगा आगमनकाळात भाविक पर्यटकांची येथे रीघ लागलेली असते.

पेढांबे : (दसपटकरांची मूळ गादी )


दसपटीतील शिंदे मोकाशी इनामदारांची मूळ गादी विजापूरच्या आदिलशहाकडून 28 गावांची जहागीर मिळाल्यानंतर सोताजीराव व सिधोजीराव शिंदे याच गावात राहत होते. दसपटीतील जहागिरीच्या सनदा, आज्ञापत्रे, आदि महत्वपूर्ण दस्तऐवज याच गावात मिळाल्याचे इतिहास लेखक जनरल कै. नानासाहेब गणपतराव शिंदे यांनी आपल्या मे 1940 मध्ये प्रकाशित पुस्तकात नमूद केले आहे.

येथील श्रीदेव सुकाई, केदार व वाघजाई हे पुरातन देवस्थान असून त्यांना नारळ व दहिभाताचा नैवेद्य दिला जातो. हे मंदिर यशवंतराव शिंदे यांनी बांधले. गावच्या जंगलात मानाई देवीचे स्थान आहे.

खडपोली


नदी काठावरचा सर्वात चांगला गाव म्हणून त्याकाळी खडपोली गावचा उल्लेख होत होता. दसपटीतील बारराव कोळयांचे साम्राज्य संपुष्टात आणण्याच्या अंतिम लढाई पूर्वीची लढाई खडपोलीतील घोडयाच्या पागांवर शिंदे सरदारांनी यशस्वी केली होती. येथील मल्लिकार्जुन मंदिर प्रथमत: यशवंतराव शिंदे याने बांधले.

कोळकेवाडीतील केदार वाघजाई देवस्थान


येथे श्री केदार वाघजाईचे पुरातन, स्वयंभू जागृत देवस्थान आहे. माघी पौर्णिमेला मोठा यात्रौत्सव तर दसरा व होळी ला इतर उत्सव साजरे केले जातात.

नांदिवसे


येथे देवराईत भैरवाचे पुरातन जागृत देवस्थान आहे. शेकडो वर्षापूर्वी हे स्थान सहयाद्री पर्वताच्या अंधेरी खो-याच्या मुंढे वाडीत होते. हे अंतर भैरीच्या सरीने चढत 3 किमी. होते. या ठिकाणी त्याकाळी गावाने नेमलेला पुजारी दैनंदिन पूजेला जाई. कालातराने पूजारी स्वर्गवासी झाल्यानंतर अनेक वर्षे त्यांच्या पत्नीने पूजेचे काम पाहिले. मात्र तिलाही सरीने चढणे अशक्य झाल्यानंतर, तिने भैरीस विन्ावणी केली. तिच्या विनवणीनूसार भैरी तिच्या घराकडे चालत येण्यास निघाला होता. मागे वळून न पाहण्याची म्हणजे भैरवखो-यातील वैतरणा नदीचे पात्री दाट अरण्यातील मोडली. ती जागा म्हणजे भैरवखो-यातील वैतरणा नदीचे पात्री दाट अरण्यातील आजचे भैरीचे स्थान. येथे साप चावून कोणी मृत्यू पावत नाही. येथे भैरवाचे टाक्यानजीक धर्म भिंत असून येथून पूर्वी कडकलोटाची शिक्षा दिली जात असे. येथे व्ारपीचा डोह वर्षातील एकदाच्या मासेमारीसाठी प्रसिध्द आहे. नांदिवसे चिपळूणपासून 22 किमी. अंतरावर आहे.

स्वयंदेव


येथे स्वयंभू शंकराचे जागृत स्थान आहे. नांदिवश्याचे कवि विठ्ठलराव शिंदे यांनी कुलस्वामिनी श्री रामवरदायिनी दरबार या कवितेत शिवरात्री होई स्वयंदेवी शिव दुग्धाभिषेक पूजन असा गौरवपूर्ण उल्लेख या स्थानाचा केला आहे. वैतरणा नदीच्या संगमावर हे स्थान आहे. सोमाजीराव शिंदे पेढांबर हे नांदिवसे येथे वस्तीस राहिल्यानंतर त्यांनी या क्षेत्राचे महत्व वाढविले आहे. मंदिरासमोरील अंदाजे 20 फुट उंचीची दगडी दीपमाळ वैशिष्टयपूर्ण आहे. नंदीचे दगडी शिल्प, गंगा, पार्वती, गणपती, विठोबा रूक्मिणी, कासव, गरूड वीर आदि मूर्ती येथे स्थानापन्न आहेत. दीपमाळेच्या नजीक धनर्धारी रामाचे दगडी शिल्प आहे. हे ठिकाण चिपळूणहून 20 किमी. अंतरावर आहे.

तिवरे


येथे पुरातन वाघजाईचे देवस्थान आहे. चारही बाजूनी डोंगराने वेढलेल्या ठिकाणी खो-यात दर तीन वर्षांनी गंगा येते. येथे नव्याने मंदिर बांधण्यात आले असून कुंडाची स्वतंत्र रचना आहे. मुख्यमूर्ती प्ाुरातन आहे.

ओवळी


सन 1109 मध्ये स्थापन झालेल्या जागृत श्री सुकाई देवीच्या मंदिरामुळे अन् सहयाद्री रांगेत गौरी-शंकराच्या चिरेकुंडात होणा-या 5 नद्यांच्या संगमामुळे होवळी गावास विशेष महत्व आहे. पावसाळयात या नद्या जेव्हा भरभरून वाहतात, तेव्हा संगमाच्या ठिकाणी दिसणारे दृश्य पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते. गोवळी गावचे डोंगरात कोळकेवाडी गावचे दिशेस डोंगरात एक सुंदर गुफा आहे. या गुंफेस गोसावी बाबांचा मठ असे संबोधतात. येथे एक विहीर असून तिचे पाणी मधूर आहे. देवराईत वसलेले ग्रामदेवतेचे मंदिर पूर्णत: वैशिष्टयपूर्ण आहे.

अडरेतील स्वयंभू श्री महादेव मंदिर


चिपळूण-कराड महामार्गाला सती येथे फाटा फुटून अडरे-अनारी गावांकडे येणारा रस्ता आहे. या महामार्गापासून फक्त सुमारे 5 किमी. अंतरावर अडरे येथे प्राचीन शिवालय उभे आहे.

गावच्या पश्चिमेस तीन डोंगरांच्या कुशीत हे जागृत शिवालय वसले आहे. मंदिराचे पिछाडीस प्रवाहित नदीमुळे परिसराची निसर्गसंपन्नता अधिकच बहरली आहे. येथील नीरव शांततेत नदी प्रवाहाच्या खळखळणा-या संगीतामुळे भाविक तल्लिन होऊन जातात.

विशाल आकाराच्या या मंदिराची बांधणी पाषाणी आहे. मंदिराच्या सभामंडपापेक्षा गाभारा भूपातळीपेक्षा थोडा खोलवर आहे. मंदिराच्या बांधकामात भारतीय वास्तूशिल्पकलेचे नमुने पहावयास मिळतात. मंदराच्या प्रवेशद्वारातच हुबेहुब नंदीची बैठी रचना आहे. मंदिरासमोर बारमाही शितल जलाने ओतप्रोत भरलेली विहीर आहे. मंदिरा समोरील प्रांगणात विस्तीर्ण पसरलेला पिंपळ वृक्ष आपल्या पुराणत्वाची साक्ष देत आजही खंबीरपणे उभा आहे. मंदिराच्या विस्तिर्ण परिसरात गोमातेची समाधी व सभोवती भक्तांच्या समाध्या आहेत.

श्रावण महिन्यात भाविक भक्तिचे 400 नंदादीप तसेच नवसाचे नंदादीप तेवत ठेवले जातात. असे हे नयममनोहरी शिवालय भाविक व पर्यटक यांचे आकर्षण बनले आहे. या स्थळाचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे क वर्ग पर्यटन स्थळ म्हणून उल्लेख केला गेला आहे.

गावातील सामाजिक एकात्मता


अडरे गावात स्वयंभू महादेव मंदिराबरोबरच गावदेवीचे मंदिर हनुमान मंदिर व नालंदा बुध्दविहार ही प्रमुख प्रार्थनास्थळे आहेत, हे गाव म्हणजे सामाजिक एकात्मतेचे प्रतिक आहे. गावातील सर्वधर्मिय एकमेकांच्या उत्सव, कार्यक्रमांत सहभागी होतात. गावातील विविध मंदिरात अनेकविध सामाजिक धार्मिक, शैक्षणिक उपक्रम सर्वधर्मीयांच्या सहभागाने यशस्वी केले जातात. संपूर्ण गावाने आर्थिक व सामाजिक सहिष्णूता जोपासली आहे. चिपळूणपासून 12 किमी. अंतरावर हे गांव आहे.

चारगावचे श्री मल्लिकार्जुन मंदिर


चिपळूण शहरापासून सुमारे 5 किमी. अंतरावर मौजे निरबाडे, काडवली, पाली व खांदाट या चार गावांचे जागृत श्री मल्लिकार्जुन देवस्थान वसले आहे. मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सद्यस्थितीत या चार गाव्ाच्या श्री रामवरदायिनी देवस्थान मंडळामार्फत सुरू आहे. मंदिरास प्रशस्त सभामंडप असून सभामंडपाच्या भूपृष्ठ पातळीपासून गाभारा सुमारे 8 फुट खोल जमिनीत आहे. गाभा-यात पुरातन श्री शिवपिंड आहे. मंदिरासभोवताली देवराई जमिनीत आहे. गाभा-यात पुरातन श्री शिवपिंड आहे. मंदिरासभोवताली देवराई आहे. गाभा-यात पुरातन श्री शिवपिंड आहे. मंदिरासभोवताली देवराई आहे.

 
© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions