प्रस्तावना
तालुक्यात मुस्लिम बांधवांची पारंपारिक वस्ती आहे. शहराचे हद्दीत जामे मस्जीत, दादर
मोहल्ला मस्जीत, मिठागरी मोहल्ला मस्जीत, साठे मोहल्ला मस्जीत, मुकादम मोहल्ला मस्जीत,
पालोजी मोहल्ला मस्जीत, उक्ताड मोहल्ला मस्जीत, जुम्मा मस्जीत, मुनारा जामे मस्जीत,
बहादूरशेख मस्जीत आणि ताकिया मस्जीत या मस्जीती आहेत. तर सुफी संतांच्या कबरी अर्थात
दर्गेही आहेत. यात लोटेशहा, शेखसमसुद्यीन, कालेशहा बाबा, सय्यद मुदादशहा, शेख बहादूर,
पीर शकुला, मुरादखान, सय्यद मुस्तीमीन शहा, ख्वाजा कमालुद्यीन आणि सय्यद बु-हानशहा
यांचा समावेश आहे. सर्व र्दग्यांचे उरूस मोठया प्रमाणावर भरतात. सर्व धर्मिय समभावाचा
सुरेख संगम येथे अनुभवास येतो.
पोफळीतील हजरतपीर आकुसखाँ बाबांचा दर्गा
चिपळूणच्या पूर्वेस कुंभार्ली घाटातील एका टेकडीवर पोफळी येथे हजरत आकुसखाँ बाबा
दर्गा हे पवित्र स्थान आहे. सर्व धर्मीयांचे ते श्रध्दास्थान आहे.
इ.स. 1500 ते 1600 च्या दरम्यान कोकण प्रांतावर कोळी राजांच्या सात भावांची सत्ता
होती. त्यांची आपापसात कायम भांडणं होत. ते प्रजेवर अन्याय व अत्याचार करीत. त्रस्त
जनतेचा एक गट त्यावेळी विजापूरच्या अली अदीलशहाच्या भेटीस गेला. प्रजेला छळणा-या
या कोळी राजांबरोबर युध्द करून आमची सुटका करावी असे आवाहन यागटाने आदिलशहाला
केले. आवाहन मान्य करून दरबार भरला. सर्व जाती धर्माच्या सेनाप्ातींमध्ये पीरबाबां
आकुसखाँ हे एक सेनापती व जनजागृती करणारे संत म्हणून प्रसिध्द होते.
आदिलशहाची आज्ञा घेऊन पीरबाबा आकुसखाँ स्वत:हून कोळी राजांबरोबर लढाईस निघाले.
कोकण हद्दीच्या घाटमाथ्यावर बाबांची छावणी तळ ठोकून बसली. कोळीराजा व आदिलशहाचे
सैन्य यांच्यात घनघोर युध्द झाले. कोळी राजाला सैन्यासहित मागे हटविण्यात आदिलशही
सैन्याला यश मिळत होते. मात्र तद्ददरम्यान बाबा शहीद झाले.
कालांतराने पीर बाबा एकदा आदिशहाच्या स्वप्नात आले. त्यांनी दृष्टांत दिला की,
मी ज्या ठिकाणी शहीद झालो आहे त्याच ठिकाणी दिवा बत्तीकरिता सेवकाची व्यवस्था
करावी. त्यानुसार आदिलशहाने सय्यद मुस्तफा यांना सातगाव इनाम देऊन कोकणात पाठविले.
येथे छोटेखानी र्दग्याची उभारणी करून त्यांनी जनसेवा आरंभिली कुंभार्लीतील महाकाली
देवी मंदिर स्थापनेबाबत त्यांनी मदत केल्याचे सांगतात. सय्यद मुस्तफांच्या पश्चात
1922 च्या दरम्यान मिरजोळीचे (ता. चिपळूण) शाबाखान दलवाई यांनी आफ्रिकावासियांच्या
मदतीने जीर्णोध्दारित इमारत उभी केली. बाबांच्या चमत्कारिक अनुभूतींमुळे नवसाला
पावणारे स्थान अशी ख्याती निर्माण झाली.
सन 1967 च्या कोयना भूकंपात र्दग्याची इमारत खचली तत्कालिन मुख्यमंत्री मोरारजी
देसाई यांनी स्वत:र्दग्याची पाहणी केली. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या अभियंत्यांना
र्दग्यासाठी निवारा बांधून देण्यास मुख्य्ामंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार दानशूरांनी
मदतीचा हात देऊन 1978-79 ला र्दग्यावर गुंमज व इतर बांधकामे झाली. चिपळूण ते पोफळी
हे अंतर सुमोर 20 किमी. आहे.
वैशिष्टयपूर्ण ऊरूस
प्रतिवर्षी हिजरी सनाच्या सफर मु. 13 (मराठी महिन्याच्या माघ पौर्णिमेस) या दिवशी
दोन दिवस दोन रात्री ऊरूस भरतो. या ऊरूसाला सर्वधर्मीयांच्या लाभणा-या प्रतिसादामुळे
त्यास वेगळे महत्व आहे.
यशवंतराव चव्हाण यांची भेट
संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू असताना कॉग्रेसचे तत्कालीन उमेदवार यशवंतराव चव्हाण
यांच्या सहका-यांनी बाबांना नवस केला होता, यशवंतराव चव्हाण जेंव्हा निवडून
आले तेव्हा फुलांची चादर चढवून दर्ग्याचे दर्शन घेतले. त्यानंतर वर्षातून एकदा
त्या स्थळाला भेट देत असत.
चिपळूणचे मिनी हिस्टेशन लोटनशहा
दर्गा
शहराचे जुना एस.टी. स्टँड मागील बाजूस छोटसं डोंगरस्थानं समजलं जाणार आणि सर्वधर्मसमभावाचे
प्रतिक मानलं गेलेलं लोटनशहा दर्गा हे ठिकाण आहे.
हे स्थळ ब्रिटिश काळापूर्वीपासून अस्तित्वात आहे. त्याकाळी येथे छोटीशी कबर होती.
या ठिकाणी एक ब्रिटिश अधिकारी बंगला बांधण्यासाठी आले असता, काही केल्या बंगल्याचे
काम पूर्णत्वास जात नव्हते. ते काम्ा काहीना काही कारणास्तव कोसळून जायचे. त्यामुळे
त्या अधिका-याने स्थानिकांसह तत्ससंबंधी माहिती व शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु
तो अयशस्वी ठरला. बांधण्यात आलेले लोटले जायचे म्हणून या स्थान्ाास लोटनशहा
असे नाव पडल्याची आख्यायिका सांगितली जाते. या ठिकाणी गरीबशहा बाबा नावाचे एक
फकीर वास्तव्य करीत. ते या ठिकाणच्या कबरीची दिवाबत्ती व सेवा करीत. ते मूळचे
पंजाबचे होते. त्य्ााकाळी येथे घनदाट अरण्य होते. वन्यजीवांचा वावरही होता. गरीबशहा
बाबांची सध्याची आठवी पिढी या श्रध्दास्थानाची देखभाल व सेवा करीत आहे. या पिढीतील
वंशजांनी सदरहू जागा सरकारी मालकीची अस्ाल्याचे सांगितले.
ही जागा म्हणजे गुरे-जनावरांचे चरण्याचे ठिकाण होते. म्हणून त्यास गुरूचरण या
दुस-या नावानेही संबोधले जाते. परंतु हे नाव अप्रसिध्द आहे घनदाट अरण्यमय ठिकाणास
अतिशय बिकट मार्ग होता. कालांतराने जंगल कमी होत गेले. सभोवतालच्या भागात वस्ती
वाढली. या स्थानी येण्यास खेंड भागातील दुर्गाआळी येथून तसेच जुना एस.टी. बस स्थानकाचे
पिछाडीस असलेल्या उंच टेकडीवर पक्क्या पाय-या बांधलेल्या आहेत. येथून चिपळूण शहराचे
चोहोबाजूचे विहंगमय दर्शन सहजपणे होते. इथल्या आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटक
नागरिकांचा ओढा इकडे अधिक वाढत आहे. रमणीयतेमुळे व चिपळूण नगरीच्या अंतर्गत मध्यवर्ती
भागात उंचीवर वसलेल्या या टेहळणी सज्जावजा चिपळूण शहराचे मिनी हिलस्टेशन म्हणून
मान्यता मिळाली आहे.
अलोरेतील शहानूरबाबा सेवाधाम (दर्गा)
तालुक्यातील अलोरे गावात शिरगाव मार्गावर डोंगर टेकडीवर शहानूरबाबा सेवाधाम (दर्गा)
आहे. शहानूरबाबा हे सुफीसंत सुमारे 17 व्या शतकामध्ये होऊन गेल्याचे पुरावे
औरंगाबादमधील शहानूर म्ायाँ मोहल्ला येथे आढळतात. अलोरे मधील देवरे मास्तरांच्या
प्ररणेने र्दग्याची स्थापना सन 1977-78 मध्ये झाली. त्याकाळी या भागात जंगल
होते.
र्दग्याच्या प्रमुख गाभा-यात समाधी असून नजीकच एक आरपार छिद्राचा गोल दगड आहे.
हा दगड मनोवांच्छित फलप्राप्तीची पडताळणी करतो, अशी श्रध्दा आहे. अभिमंत्रित पवित्र
जल व उदीचा समस्याग्रस्तांना दिलासा देऊन गुण आणतात. आखिल महाराष्ट्रात वैशिष्टयपूर्ण
5 घूमट असलेला हा एकमेव दर्गा आहे. सर्व धर्मभाविकांना शहानूरबाबांची साधना सेवा
सुलभपणे करता येण्यासाठी साहित्यिक श्री मच्छिद्रनाथ वाटेकर य्ाांनी आरत्या रचून
संग्रह केला आहे अशी माहिती सुमारे 35 वर्षे र्दग्याची सेवा करणारे सेवक श्री.
अशोकभाई वडगांवकर यांनी दिली. रविवार दि. 29 जुलै 2007 (गुरूपौर्णिमा) या दिवशी
मुंबईस्थित महंत माननीय सहस्त्रबुध्दे आणि सहकारी यांनी अशोकभाई वडगांवकर संचारमूर्ती
शहानूबाबा यांचेवर श्री मच्छिंद्रनाथ तुकाराम वाटेकर यांच्या हस्ते शिवसागरनंद
असा नामाभिषेक करून घेतला.
दर गुरूवार, शुक्रवार, गुरूपौर्णिमा, आषाढ अमावस्या, चैत्र द्वितीया (ऊरूस) असे
धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. दूरच्या भाविकांसाठी येथे निवासाची व्यवस्था
आहे. चिपळूणजून सुमारे 15 किमी. अंतरावर हे पवित्र स्थान असून तेथे शहानूबाबा
बस थांबा आहे.
|