वैजीचे
श्रीदेवी सुकाई-चंडकाई देवस्थान
वैजी येथे शिरळ, रेहेळ, वैजी, मालघर, पाचाड व भागाडी या सहा गावांचे मिळून एकच श्रीदेव
सुकाई, चंडकाई देवस्थान संस्था समस्त ग्रामस्थांचे श्रध्दास्थान आहे. ग्रामदैवतांच्या
स्थळांपैकी प्रमुख ग्रामदेवत्ाा श्री सूकाई ही स्वयंभू असून तिचे पुरातन मंदिर मु.
वैजी या गावात आहे. या देवस्थानाविषयी आख्यायिका अशी की, एक शेतकरी शेतात नांगरणी
करताना त्याचा फाळ जमिनीत अडकला. त्याच रात्री त्यास देवीने दृष्टांत देऊन सांगितले
की, मला भूमीमधून वर काढून प्रतिष्ठापना कर मी समस्त जनतेच्या सुखासाठी अवतरली आहे.
म्हणून श्री सुकाई देवी असे नामकरण झाले असावे. ही देवी आदिमाया जेथून प्रकट झाली
त्या वैजी गावात त्याच स्थानावर मूर्तीची प्रतिष्ठापना करून मंदिर उभारले गेले.
तिच्या उजव्या बाजूस शिवपिंडी व नंदी तर आव्या बाजूस श्री कालकी देवीच्या मूर्ती
प्रतिष्ठापित करण्यात आल्या आहेत. या मंदिरामध्ये प्रामुख्याने गोंधळ व जत्रा यासह
अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे होतात.
शिरळची श्री चंडकाई देवी
शिरळ येथील श्री चंडकाई देवीचे मंदिर प्रसिध्द आहे. कालांतराने मंदिर वस्तीपासून
पूर असल्यामूळे गावात बांधले. मंदिरात श्री चंडकाई व पद्मावती देवीच्या पाषाणमूर्ती
आहेत. प्रतिवर्षी नवरात्रोत्सव, दस्ारा, गोंधळ, जत्रा असे कार्यक्रम संपन्न
होतात. शिमग्याचा पहिला होम याच देवीचा लावण्याची प्रथा आहे. जत्रोत्सवाचे वेळी
सभोवतालच्या गावांमधून आलेल्या पालख्यांची भेट व नृत्य कार्यक्रम अवर्णनीय असतो.
जत्रोत्सव चैत्र पौर्णिमा ते अमावस्या या कालावधीत साजरा होतो. शिरळ या गावच्या
देवस्थानाचा एकत्रितपणे कारभार चालता असताना देवाची एकच पालखी होती. तिच्यामध्ये
सुकाई, चंडकाई, कालीश्री, वाघजाई, खेम, बाजी, कालकी, व शिवपिंडी अशा सजविलेल्या
रूपी स्थानापन्न होतात. पूर्वी ही एकच पालखी शिमग्याच्या भोवनीसाठी सहा कोंडात
फिरत असे. जत्रेसाठीसुध्दा हीच पालखी असे. पुढे शिरळ, वैजी, मालघर या तीन गावांचा
स्वतंत्र कारभार सुरू झाल्यानंतर श्री सुकाई, चंडकाई देवस्थानचा पारंपारिक कारभार
परस्पर सहकार्याने सुस्थितीत चालला आहे. मालघर हे श्री सुकाई देवीचे माहेर आहे.
रेहेळची कालीश्री देवी
श्री कालीश्री देवीचे पुरातन मंदिर रेहेळ या गावात आहे. या देवस्थानाचा कारभार
सुमारे शंभर वर्षापूर्वी रेहेळ व भागाडी येथील ग्रामस्थ स्वतंत्रपणे पाहू लागले
या देवस्थानतर्फे शिमगा, जत्रा व नवरात्र असे उत्सव प्रतिवर्षी साजरे होतात.
येथील शिमग्याचा होम भद्रेच्या दिवशी पहाटे प्रज्ज्वलित केला जातो. या ठिकाणी
बाजूबाजूला दोन होम लावले जातात. एका होमावर सुकाई देवी व एका होमावर कालीश्री
देवीची पालखी असते. यानंतर पारंपारिक शिंपणे कार्यक्रम होतो.
पाचाडचे श्रीदेव मंदिर
श्री देव खेम मंदिर पाचाड या गावी आहे. येथील ग्रामस्थांनी या देवस्थानचा कारभार
सुमारे 80 वर्षापूर्वी पाहण्यास सुरवात केली. या देवस्थानचे शिमगा, चैत्र जत्रा
आदि पारंपारिक उत्सव साजरे होतात. पूर्वी शिरळ या गावचे वतनदार त्या गावचे स्थानिक
मूळ रहिवासी मोरे हे प्रथेनुसार मानकरी होते. शके 1730 मध्ये मोरे घराण्याचे
देवस्थानच्या दैनंदिन कारभारासाठी देवस्थानच्या नावे आपल्या वतनापैकी 80 एकर
भूखंड दान केला. जमीन कसण्यासाठी ग्रामस्थांची नेमणूक केली. आज कूळ कायदा अमलात
असतानाही एकाही ग्रामस्थाने पिढीजात जमीन करणारे असूनही स्वत:चे नावावर जमीन
न चढवता उलटपक्षी आमची व्ौयक्तिक नावे न लावता ती आमच्या देवस्थानची जमीन आहे.
असे तहसिहदार कार्यालयात लेखी दिले. ही महाविस्मयकारी व बोधप्रत घटना आहे.
गोंधळेचे पेशवेकालीन श्री हरिहरेश्वर मंदिर
निसर्गरम्य परिसरात विराजमान गोंधळे गावातील पेशवेकालीन श्री हरिहरेश्वर मंदिर
भाविक पर्यटकांसाठी अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. वाशिष्ठीची उपनदी असलेल्या तांबी
( प्राचीन नाव ताम्रपर्णी ) नदीच्या कना-यावर गोंधळे गाव वसले आहे.
मंदिराच्या घुमटाच्या बाजूला कोरलेला मजकूर या मंदिराचे ऐतिहासिक महत्व स्पष्ट
करतो. मंदिराचे काम 1696 मध्ये आप्पाजी चिमणाजी गोंधळेकर यांनी पूर्ण केले. त्यानंतर
1826 मध्ये या शिवालयाचा जीणर्ोध्दार रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी ग्रामस्थांच्या
सहकार्याने केला. या कामावर नवारक देवकृष्ण जोशी कारकून व संगमंश्वरचे लक्ष्मण
हैबत गवंडी म्हणून सेवेस होते. सखाराम गोंधळेकर, रावजी गोंधळेकर, काशीनाथ गोंधळेकर
यांनी शिवलिंगावर बिल्वपत्र ठेवले. पुन्हा 2001 मध्ये घुमट दुरूस्ती व 2005 मध्ये
मंदिर जिर्णोध्दार व सुशोभिकरण करण्यात आले.
मंदिरातील दूर्मिळ शिवपिंड
मंदिर गाभा-यातील शिवपिंड दूर्मिळ असून तिची उंची सुमारे एक फुट तर व्यास सुमारे
दीडफुट आहे. मंदिराच्या आख्यायिकेनूसार, पेशवाई अमलामध्ये नेपाळच्या राजाने
पेशव्यांना शिवमुर्ती म्हणून भेट म्हणून दिली होती. पेशवे दफ्तरखान्यात चाकरीस
असलेल्या आप्पाजी गोंधळेकर यांनी सदरहू मूर्ती पेशव्यांकडून गोंधळे येथे आणून
तिची प्रतिष्ठापना केली.
अप्रतिम नंदी
मंदिराच्या मध्य भागाच्या गाभा-यात चित्तवेधक श्री गणेशमूर्ती असून बाहयभागात
अप्रतिम नंदीची मुर्ती आहे. मंदिराशेजारीच विशाल आकारमानाची प्राचीन विहीर आहे.
चिरेबंद बांधकामाच्या विहिरीस चाळीस पाय-या असून तिला बारमाही पाणी साठी असतो.
मंदिर परिसरात बगीचा व कारंजे, धर्मशाळा आदि सुविधा आहेत. दोन गाभा-याची वैशिष्टयपूर्ण
बांधकाम शैलीची कलात्मकता या मंदिरात आहे. मुख्य कळस सुम्ाारे पंधरा मीटर उंचीचा
आहे.
प्रति वर्षी श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी असते. महाशिवरात्रीला उत्सवाचे आयोजन
केले जाते.
चिपळूण-गोधळे 45 किमी. अंतर आहे. नजीकच्या चिवेली गणेशवाडी येथे निवास व्यवस्था
होऊ शकते.
पाथर्डीचा पाथरेश्वर
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पाथर्डी गावात शिवपूर्वकालीन 450 वर्षापूर्वीचे महादेव
मंदिर आहे. मंदिरात वैशिष्टयपूर्ण माता पार्वतीची मूर्ती आहे.
या देवस्थानाच्या नावावरून गावास पाथर्डी हे नाव पडले. गावाने शिवकाळही अनुभवला
आहे. सहाणेजवळील ग्रामदेवता श्री भैरी देवालय हबशांनी उद्ध्वस्त केले होते. त्याचे
बांधकाम शके 1690 मध्ये महादजी राम तांबे यांनी केले. त्यावेळी त्यांनी गावातील
मशिदीचीही दुरूस्ती केली. या देवालयाचा पुररूध्दार पाथर्डीचे खोत केसो विष्णू
व शिवराम गोपाळ तांबे यांनी शके 1807 चे सुमारास केली. देवाची जीणर् झालेली कांजणीमूर्ती
बदलून दुसरी प्रतिष्ठापित करण्याकरिता नवीन घडवून आणली. या ग्रामदेवतेची यात्रा
देवदीपावलीस असते. पंचक्रोशीतील ग्रामदेवतांची भेट व स्नहमीलन कार्यक्रम, रहाट
चालविण्याचा कार्यक्रम हे या यात्रेचे वैशिष्टय होय.
पाथरेश्वर प्राचीन व जागृत देवस्थान आहे. देवालयाचे सर्व ताशीव चिरेंबंदी काम
पाथर्डीचे खोत लक्ष्मण गणेश तांबे यांनी त्यांचे उपाध्ये बाळकृष्ण भट बिनजनाद्र
भट - अंतरकर यांचे देखरेखीखाली करवून घेतले. देवालयाचा चौथरा जमिनीच्या पृष्ठभागापासून
उंच उठावदार आहे. सभामंडपाच्या घुमटाची उंची गाभा-यावरील घुमटापेक्षा कमी आहे.
राघोबादादा पेशवे यांची पत्नी आनंदीबाई पाथर्डीला जाऊन पाथ्ारेश्वराचे दर्शन घेत
असे.
पाथरेश्वर मंदिराच्या पोवळीला लागूनच श्री पांडूरंगाचे मंदिर आहे. या मंदिराचे
ही चिरेबंदी दगडाने बांधकाम पाथर्डीचे खोत लक्ष्मण गणेश तांबे यांनी केले. देवाचे
पूजेकरीता फुलझाडे, तुलसी, बेल या वृक्षांच्या लागवडीसाठी पाच बिघे पडजमीन श्रीमंत
माधवराव नाराण पेशवे यांजकडून खोत लक्ष्मण तांबे यांना इनाम म्हणून मिळाली. त्यांच्या
ऐतिहासिक दाखला असा, सुमा -सीतसबैनमया व अलक 6027 सफर शके 1697 इ.स.1775 ची सनद
लक्ष्मण तांबे मोकादम मामले हमजाबाद खोत मौजे पाथर्डी यांसी हवाली. या जमिनीस
इनाम म्हणून पांडूरंग देव नाव चालू आहे.
पाथर्डी येथील गोपाळ अनंत तांबे यांचे पणतू हरी केशव तांबे यांचाही देवालय बांधणीत
मोठा सहभाग आहे. या दुमजली देवालयाच्या बांधणीत लाकूडकामाचाही चांगला वापर केला
आहे. छत कौलाने शाकारलेले आहे. कृष्णाजी अनंत तांबे, गोपाळ अनंत तांबे या बंधूद्वांनी
बांधलेल्या चौसापी घरबंदाच्या उत्तरेकडील चौथ-यावर सद्यस्थितीत त्याचे नांदते
घर असून मध्यभागी अंगन आहे. गावात भैरू देवी मंदर असून लिंगूबाई, वाघजाई, भैरीनाथ,
जागेश्वर, सोमेश्वर अशा पाच मूर्ती असलेली ग्रामदेवता पाथर्डी गावास कृपाशिर्वाद
देत आहेत.
गुढे येथील श्रीशिव वामनेश्वर
गुढे गावच्या निसर्गरम्य परिसरात प्राचीन श्रीशिव वामनेश्वर मंदिर वसले आहे. येथील
निवासी तांबे घराण्यातील मूळ पुरूष वामनवेत तांबे यांनी हे मंदिर जिर्णोध्दारित
केले आहे. वामनेश्वर मंदिराची बांधणी हेमांडपंती असून ते सुमारे 600 ते 700
वर्षापूर्वी बांधले असावे, असा तर्क आहे. सन 1986 मध्ये तांबे कुटुंबियांनी
इतर मूळ बर हूकूम देवालयाप्रमाणेच रचनेत कोणताही बदल केला नाही. देवालय गुढे
नदीकिनारी घनदाट झाडीत उभे आहे. भगवान शिवशंकर यांना नागरी बसतीतील गोंधळ-गडबड,
बकालपणा, अस्वच्छता, हेवेदावे, प्रदूषण मानवत नसल्याने ते सदैव नागरी वस्तीपासून
दूरवर असतात, य्ााची जाणीव या मंदिरात येताच क्षणी होते.
गुढे गावच्या गुरववाडीलगत हे शिवालय आहे. मंदिरावर फारशी कलाकुसर नसली तरी गाभा-याच्या
घुमटास कमळाच्या पाकळयांचा आकार आहे. गाभा-यासमोर सभामंडप आहे. मंदिर आवारात जांभा
दगडात बांधलेली विहीर आहे.
नजीकच पेढीतील मारूती, शेषशाही, श्री गणेश, ग्रामदैवत मंदिर यांची सरकार दप्तरी
नोंद आढळते. शिवालय परिसराचे क्षेत्रफळ सुमारे 15 गुंठे इतके असून विविध वनस्पतींची
देवराई आहे.
सदर ठिकाणी तांबे घराण्याच्या मूळ पुरूषाच्या वास्तव्याच्या खुणा जोपासणारा चौथरा
(निवासस्थानाच्या जोत्याचे अवशेष) यांचा शोध कै. नाना काका तांबे विविध दप्तरांतील
दस्तऐवजांच्या अभ्यासाअंती लावला. मंदिर परिसरात काळया पाषाणाच्या भग्नावस्थेतील
अनेक शिल्पमूर्ती आहेत.
दोणवलीचा सिध्दीविनायक
चिपळूण तालुक्यातील दोणवली हया निसर्गरम्य गावात पेशवेकालिन श्री सिध्दीविनायक
मंदिर उभे आहे. मंदिराचा सभामंडप उघडा असून गाभारा बंदिस्त आहे. मंदिराची बांधणी
जांभा दगड, गूळ, चुना इ. पासून केल्याचे जाणवते. मंदिराचे वैशिष्टयपूर्ण बांधकाम
असलेल्या घुमटास कमलपुष्पासारखा आकार दिला आहे. पूर्ण मंदिरावर सफेद चुन्याचा
गिलावा आहे. गाभा-यात उजव्या सोंडेची संगमरवरी पाषाणाची सिघ्दीविनायकाची सुबक
मुर्ती आहे. मंदिरासमोर प्रशस्त काळया पाषाण शिळेवर काळया पाषाणाची चित्तकर्षक
विशाल पणती आहे. हे मंदिर इ.स.1774 दरम्यान थोरले माधवराव पेशवे यांनी बांधले
असा उल्लेख आहे. मंदिराचे पिछाडीस ओहोळावर असलेला मोठया आकाराच्या जांभा दगडापासून
तयार केलेला अर्धवर्तुळाकृती ऐतिहासिक पूल अभ्यासकांचे कुतूहल चाळवतो. मंदिर
परिसरातील आल्हाददायक वातावरण भाविकांच्या मन:शांतीस पूरक ठरते.
कुंभारलीतील महाकाली देवस्थान
तालुक्यातील कुंभारली, शिरगाव व पोफळी या गावांचे आराध्य दैवत श्रीदेवी सुकाई-वरदायिनी-महाकाली
देवस्थान हया जागृत ग्रामदेवता आहेत. तीन गावचे मानकरी मिळून ग्रामदेवतांचा
कारभार पाहण्याचा दुर्मिळ योग शेकडो वर्षापासून येथे पहावयास मिळतो.
संपूर्ण महाराष्ट्राला कुंभार्लीचे महाकाली देवस्थान परिचीत असले तरी प्रत्यक्षात
या ठिकाणी श्रीदेवी सुकाई-वरदायिनी-महाकाली या देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापित
केल्या आहेत. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणातून म्ांदिराकडे तोंड करून उभे राहिल्यास
डावीकडे श्रीदेवी महाकाली तर उजवीकडे श्रीदेवी सुकाई व वरदायिनीचे स्थान आहे.
सुकाई-वरदायिनीच्या मंदिरात गाभा-यात शिवलिंग, नंदी व सिध्दीविनायक व इतर देव्ामूर्ती
स्थानापन्न आहेत. यांचे दर्शनानंतर सभामंडपातील डावीकडून श्रीदेवी महाकालीच्या
दर्शनास जाण्याचा मार्ग आहे. दोन्ही मंदिराच्या गाभा-याला लागूनच विस्तीर्ण सभामंडप
आहेत.
या देवस्थानची प्रतिष्ठापना साधारपणे सन 1209 दरम्यान झाल्याचा उल्लेख आहे. यानंतर
वेळोवेळी मंदिराची दुरूस्ती व नूतणीकरण झाले असून सन 1990 मध्ये मूर्तीचे वज्रलेपनाने
सुशोभिकरण केले गेले. मंदरात सुंदर प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर प्रथम सुकाई-वरदायिनी
देवींची मंदिरे दर्शनास यावे लागते. या मंदिरात नंदी-शिवलिंग व सिध्दीविनायक व
इतर देवतांच्या मूर्ती आहेत. या मंदिराचे सभामंडपाच्या डावीकडील कोरीव काम पाहण्यासारखे
आहे. दगडी खाबांवर केलेल्या कोरीव कामात मोर, एकमेंकात माना अडकवलेले पक्षी, हत्ती,
पोपट, कोंबडा अशी चित्रे कोरली आहेत. खांबांवर कोरलेल्या विठाेबा रखुमाईच्या मूर्ती
हे येथील वेगळेपण आहे. गाभा-यात चार व सभामंडपात सहा अशा एकूण दहा खांबांवर प्रत्येकी
चार चित्रे कोरली आहेत. सभामंडपातील दगडी खांबांवर शिलालेख कोरला असून शके 1700
(सन 1778) प्लवंगनाम संवत् असा मजकूर वाचता येतो.
आख्यायिका
या देवस्थानाबाबत आख्यायिका सांगितली जाते की, एकेकाळी ऐन गणेशोत्सवाच्या काळात
मरीआईचा फेरा येऊ घातला होता. त्याप्रसंगी आई महाकाली व पोफळीचे पीर आकुसखाँबाबा
यांनी तिला वाशिष्टी नदीच्य्ाा दोन्ही तीरावरून जाण्यास मज्जाव केला. तेव्हा तिने
त्यांस कोठून जाऊ ? अशी विचारणा केली, त्यांनी मरीआईस दोन्ही तीरांवरचे गाव सोडून
कशीही जा. असे सांगितले असता ती नदीच्या वाटेने निघून गेल्ाी, याचा परिणाम म्हणून
गौरी विसर्जनाच्या दिवशीच नदीतील सर्व मासे मरून गेले. या गौड बंगलाविषयी जनतेने
पुजारी गुरवामार्फत देवीला कौल लावला असता देवीने सांगितले की, मरीआईच्या फे-यामुळे
नदीतील मासे मेले, गावातील मंडळींवर हा प्रसंग येऊ नये म्हणून मी व आकुखाँ बाबा
संयुक्तपणे झगउलो पाहिजे तर प्रचिती म्हणून पेटया उघडून आमचे करडे पहा याचप्रमाणे
ग्रामस्थांनी पाहिले असता खरोखरच देवीच्या साडया वगैरे फाटलेल्या आढळल्या.
उत्सव
देवीची यात्रा हा कुंभार्ली-शिरगाव-पोफळी या तीन गावांचा मोठा दिमाखदार उत्सव
असतो. या वार्षिक यात्रोत्सवाचा प्रारंभ फाल्गुन शुध्द प्रतिपदेस सकाळी होऊन
दुसरे दिवशी द्वितीयेस सकाळी यात्रोत्सवाची सांगता होते. या यात्रोत्सवाचे वैशिष्टय
म्हणजे देवीपूजन, आरती, लाट चढविणे, मांड भरणे, लाट फिरवणे, भजन पारंपारिक लोकनाटय,
कबड्डी स्पर्धा आदि भरगच्च कार्यक्रम.
देवीचे कार्य तीन गावातील अठरा कुंभातील मानक-यांकडून केले जाते. पोफळी येथील
मानकर घराण्याकडे देवीच्या पंचधातूची रूपे बाराही महिने पूजेला ठेवलेली असतात.
बारा तिथीही ही रूपे मंदिरात आणून देवीच्या पाषाण मूर्तीवर चढविली जातात. त्यांच्या
विधीवत पूजेनंतर ती रूपे पुन्हा मानक-यांच्या घरी नेली जातात. हिंदू संस्कृतीतील
बारा तिथी मंदिरात बारा रूपे लावून साज-या केल्या जातात.
होळी-शिमगोत्सवाची महिनाभर पालखी
तीन गावच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रथमत: देवींची पालखी शिरगावातील तीन गावांच्या
सहाणेवर आणली जाते. पहाटे होम प्रज्ज्वलनानंतर कुंभार्ली ग्रामस्थ पालखी गावात
आणतात. सकाळी होम लागल्यानंतर पालखी शिरगावला येते. याच दिवशी सायंकाळी शिरगावला
तीन गावांची सहाण भरते. येथे वर्षभरातील संपूर्ण हिशेब तसेच आगामी काळातील छबिना
कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. देवीचे कोणतेही कार्य करण्यापूर्वी चर्चा या
ठिकाणी केली जाते. यानंतर पारंपारिक रितीरिवाजानुसार छबिना कार्यक्रम संपन्न
होतो. सुमारे महिनाभर मंगलमय वातारणात पालखी तीन गावांत फिरत असते. असे हे तीन
गावात्ाील ग्रामस्थ व भाविकांचे कल्याण पाहणारे जाज्ज्वल्य देवस्थान सहयगिरीच्या
निर्सरम्य कुशीत वसले आहे. चिपळूणहून कुंभार्ली सुमारे 20 किमी. अंतरावर आहे.
वीरचा श्री लक्ष्मी मल्लमर्दन
वीर गावात देवपाट नदी ओलांडून आल्यानंतर डोंगराच्या कुशीत पुरातन श्री लक्ष्मी
मल्लमर्दन देवस्थान दिसते. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करण्यापूर्वी जांभ्या
दगडात बांधलेली कमान स्वागत करत. मंदिराच्या सभामंडपाची रूंदी सुमारे 30 फुट
व लांबी 100 फुट आहे. सभामंडपाच्या जमीन पातळीपेक्षा गाभारा सुमारे 3 फुट खोलीवर
आहे. मजबूत बांधणीच्या मदिराच्या छप्पर बांधणीत लाकूडकामाचा कौशल्याने वापर
केल्याचे आढळते. मंदिरा सभोवती जांभा दगडापासून बांधलेला कोट (भिंत) आहे. मंदिराचे
गाभा-यात श्री लक्ष्मी मल्लमर्दनची काळया पाषाणातील रेखीव मूर्तीच्या दर्शनाने
भाविकांने मन तृप्त होऊन व्ास्मयचकीत कुतूहल जागृत होते. ही शिल्पमूर्ती रचनात्मकतेच्या
कल्पकतेने कोरलेली आहे. 6 पाषाण असून एकावर एक असे 2 पाषाणाची रचना आहे. तळास
108 विष्णू लिंगे कोरलेली आहेत. प्रत्यक्ष श्री लक्ष्मीमल्लमदर्न मध्यभागी असून
त्याचे उभय बाजूस जय-विजयांची शिल्पे आहेत. भगवान श्रीकृष्णाने 8 मल्लांचा नाश
केला म्हणून त्यांची माळ गळयात धारण केल्याचे या शिल्पात दर्शविले आहे. मल्लमर्दन
म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्यांचे अग्रभागी श्री देवी महालक्ष्मी, महासरस्वती
व महाकाली तीन रूपांचे संयुक्त
उग्ररूप धारण केल्याचे श्रीलक्ष्मीशिल्प आहे. मंदिरालगतच्या देवपाट नदीकडे उतरणा-या
जांभा दगडाच्या पाय-या असून त्यांच्या शेजारी जांभ्या दगडात बांधलेले बारमाही
जुळे कूंड आहे. स्थानिक ज्येष्ठ नागरिक श्री. विक्रम उर्फ नाना वीरकर यांनी
दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 450 ते 500 वर्षापूर्वी जयगड खाडीतून व्यापारी
गलबत प्र्ावास करत असताना मोठे तुफान (वादळ) उठले. त्यावेळी गलबत बुडू नये म्हणून
गलबतातील सर्वात मोठी व जड वस्तू म्हणून सदरहू मूर्ती खाडीत सोडण्यात आली. कालांतराने
स्थानिक ग्रामस्थास देवतेने दिलेल्या दृष्टांतानुसार वीर गावात स्थापना केली
गेली. सन 1940 मध्ये मंदिराचे नूतणीकरण झाले. पुणे येथील इतिहास प्रसिध्द लाकडी
पुलाचे रचनाकार विष्णूपंत वीरकर यांनी येथील स्थानिक कारागिंसह सदरहू मंदिर
नूतनीकरण बांधकामाचे आव्हान यशस्वी केले.
सावडर्याचे श्री केदारनाथ मंदिर
हे ग्रामदेवेतेचे मंदिर असून येथे केदार म्हणजे काळभैरव हे महत्वाचे दैवत आहे.
या मंदिरात जुने लाकडी खांब असून लाकडी तुळयांवर सिंह, पोपट, पाने, फुले यांचे
कोरीव काम केले आहे. या मंदरात 7/8 फुट उंच लाकडी घोडा असून उत्सवात देवाचे
पालखीपुढे हा चालवितात. घोडयाला रंग देऊन घोडा छान ठेवला आहे. हे ग्रामदेवतेचे
मंदिर असल्याने गाव जेव्हा वसले तेंव्हाच याची स्थपना झाली असावी. हा काळ नेमका
कोणता हे माहित नाही. मात्र याचे पुजारी घराणे 200/250 वर्षापासून याची पूजा
करीत आहेत त्यावरून हे मंदिर 1750 चे आदिचे असावे, असा अंदाज बांधता येतो. सावरर्ड
हे पूर्वी महालाचे ठिकाण होते. शके 1790 म्हणजेच सन 1868 मध्ये याचे लाकडी खांब
बसवून जीर्णोध्दार केला होता,अशी नोंद आहे. गाभा-यात काळभैरव, बाजी, वाघजाई
अशा देवतांच्या काळयापाषाणांच्या सहा मूर्ती येथे आहेत.
कुपडचे कालिकामाता मंदिर
या मंदिरात आठ मूर्ती आहेत त्यात कालिका, वाघजाई, बाजी, झोलाई, वरदान व इतर देवतांच्या
मूर्ती आहेत. पूर्वी कुडप, डेरवण,आमदखोर या तिन गावांचे-वाडयांचे हे मंदिर होते.
हे अंदाजे 200/250 वषर्ापूर्वीचे असावे हे ग्रामदेवतेचे मंदिर आहे. सभामंडपाच्या
भिंती अर्घ्याअसून लाकडी तुळयांवर छप्पर आहे. 1981 मध्ये जीर्णोध्दार करण्यात
आला. 1935-36 मध्ये कालिका देविचे स्थान खुप जागृत होते. त्यावेळी अंगात आलेले
लोक विस्तव खायचे. अंगारा दिला की रोग बरा व्हायचा, येथील एकही माणूस कधी अपधातामध्ये
दगावलेला नाही.
अलोरेतील श्री शंकर मंदिर
अलोरेतील देवराईत दगडी बांधकाम असलेले हे मंदिर आहे. बाहेर एका बाजूला गणपती,
दुस-या बाजूला दोन हातांची मूर्ती, काही जुन्या मूर्ती व शिवलिंग आहे. आजूबाजूला
मोकळे आवार, झाडे असा हा शांत परिसरआहे. पहिला 30 बाय 20 चा उघडा सभामंडप, नंतर
दुसरा सभामंडप आहे. याचे दारातच दोन फुट उंच, अडीच फुट लांब सुंदर रंगविलेला
नंदी आहे. गाभा-यावर 5/6 फुट उंच दगडी रंगविलेले शिख्ार आहे. पावसाळयात हे लिंग
पाण्यातच असते.
अलोरेचे ग्रामदैवत श्री गंगादेवी
अलोरे गावचे हे ग्रामदैवत आहे. ही मूर्ती चार फुट उंच, चार घोडे जोडलेल्या रथात
बसलेली, अशी असून ती चतुर्भज आहे. दोन हात मांडीवर ठेवले आहेत. यात पूर्ती पलीकडे
केदाराची मूर्ती, घोडयावर बसलेली व डाव्या हाताला भैरी अशा खूप जुन्या मुर्त्या
आहेत. गाभारा 10बाय15 चा, पुढे उघडा सभामंडप व पुढे पडवी असे मंदिराचे स्वरूप
आहे. वर कौलारू छप्पर आहे. गाभा-याबाहेर साती आसरांचे छोठे पाषाण आहेत. गाभा-याबाहेर
उजव्या हाताला या गावात आलेल्या मोरे यांचे मुळ पुरूष चांदरराव मोरे यांचे मुर्त्ती
आहे.
कुंभार्ली घाटातील सोनपात्रादेवी
या देवीला सोनबा देवी असेही म्हणतात. घाटात रस्तेचे मध्यावर हे छोटे देऊळ आहे.
बापु शेळके यांचे घराणे गेल्या अनेक पिढया पुजा करीत आहेत. हा घाटाचा रस्ता
इंग्रजांचे काळात तयार झाला. एका धनगराने हा रस्ता इग्रजांना दाखविला. नंतर
इंग्रजांनी त्याला मारले. त्याचे स्मरणार्थ हे देऊळ बांधले असे सांगतात. देवळात
चार दगडी गोलाकार पाषाण आहेत. हा घाट रस्ता 1860-70 चे सुमारास तयार झाला. हे
काम इंजिनियर पुरूषोत्तम दामोदर छत्रे यांचे देखरेखेखाली झाले.
केतकीतील गंगास्थान
अशोक मोरू गोंडेकर यांचे घरातील हे स्थान एका खोलीत दगडाचे उखळ आहे. जमिनी पासून
उखळाची खोली 16 ते 17 सेंमी. असून उखळ अनेक वर्षे येथेच आहे. पण अंदाजे 1983-84
पासून दर महाशिवरात्रीला या उख्ाळातून खालचे बाजूने पांढ-या रंगाचे पाणी येते.
शिरंब्याचे तळयातील श्री मल्लिकार्जुन देवस्थान : (ता.संगमेश्वर.)
विर-देवपाटकडे जाताना लागणा-या शिरंबे या गावातील स्वयंभू श्रीदेव मल्लिकार्जुन
हे श्री शंकरांचे मंदिर तळयाच्या मधोमध वसले आहे.
या ऐतिहासिक मंदिराची उभारनी शिवकालिन असून, त्यातील शिवपिंडी साधारणपणे इ.स.1400
वर्षापूर्वीची असल्याचे तेथील पुजारी सांगतात. छत्रपति शिवाजी महाराजांनी विशेष
रक्कम अदा करून या पुरातन मंदराचे बांधकाम केले. मंदिराच्या सभोवती असलेल्या तळयाचे
बांधकाम चिरेबंदी आहे. या देवस्थानाचे महात्त्म्य अलौकिक असल्याचे स्थानिक ग्रामस्थ
सांगतात. या टुमदार मंदिरा भोवतालच्या भिंतीवर रामायण महाभारत कालिन प्रसंग चित्रित
केले असून, सुबक कलाकुसर केली आहे. सभामंडप उघडा असून गाभारा बंदिस्त आहे. गाभारा
सभामंडपाच्या भूपातळीपेक्षा थोडा खालच्या पातळीवर आहे. शिवरपिंड ही सदैव पाण्यातच
राहिन अशी गाभा-यातील पाण्याची पातळी व पायरी तळयाच्या पाण्याची पातळी एक समान
राहिन अशी रचना केली आहे.
या देवस्थानच्या परिसरात ग्रामदेवता श्री वरदानदेवी, श्री चंडकाई देवी यांची स्वतत्र
मंदिरे आहेत. सर्प दंश झालेल्या व्यक्तिस ग्रामदेवतेच्या मंदिरातील एक विशिष्ठ
खांबाला बांधतात. तेथे तळयातील पाणी ठेऊन नगारे वादन होते. त्या बाधित व्यक्तिस
उतार पडतो. अशी प्रथा आज तागायत स्थानिक पंचक्रोशितील ग्रामस्थ आचरणात आणतात.
या देवस्थानच्या फाल्गुन महिन्यातील उत्सवाप्रसंगी श्री देव मल्लिकार्जुनाचे चांदीचे
रूपे विराजित पालखी (डोलारा) ची मिरवणूक (छबिना) काढण्यात येते. यावेळी पालखीची
प्रत्येक घरातून आरती केली जाते. आणि त्यानंतर गावजत्रा भरविली जाते. चिपळूण-वहाळ-शिरंबे
सुमारे 25 किमी. अंतरावर आहे.
तुरंबवची श्री शारदादेवी
विद्येची देवता श्रीदेवी शारदेचे मंदिर चिपळूण तालुक्यात तुरंबव येथे आहे. आखिल
कोकणपट्ठीतील हे एकमेव शारदा मंदिर आहे.
तुरंबव गावाच्या निसर्ग सौदर्यपूर्ण परिसरात असलेले श्री शारदादेवीचे प्रेक्षणीय
मंदिर धार्मिक व निसर्गपर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे आकर्षण गणले जाते. तुरंबव
गावास असलेला निसर्गाचा वरहस्त व त्याची भौगोलिक रचना यामुळे या खेडयास कोकणी
परंपरा जोपासण्यास अधिक पुष्टी मिळाली आहे. या गावातील पावसाळी ऋतूतील प्रवास
विशेष संस्मरणीय ठरतो. मंदिराच्या पूर्वबाजूस सखल भागात दाट वन्ाराई व तिन्ही
बाजूनी डोंगराने वेढलेले आहे. मंदिराच्या पाखाडया वृक्षारोपणासह सुशोभित केल्या
आहेत. मंदिराची बांधणी राजस्थानी पध्दतीची असून नक्षीकाम कोरलेल्या संगमरवरी दगडांचा
वापर केल्ाा आहे.
मंदिराच्या मध्यभागी घुमटाकार चौथरा असून त्यावर ग्रामदेवता श्रीदेवी वरदायिनी,
श्रीदेवी मानाई, व श्रीदेवी चंडिका यांच्या मूर्तीसह त्यांच्या मध्यभागी श्री
शारदादेवीची मूर्ती प्रतिष्ठापित केल्या आहेत. गाभा-यासमोरील चौकटीत बसून सर्व
प्रतिमांचे जवळून दर्शन होते. येथील प्रथेनुसार मंदिरातील मूर्तींच्या दैनंदिन
पूजाअर्चेचा मान याच गावच्या स्थानिक गुरव गावकर यांचेकडे आहे. दररोज सांज आरतीही
होते. विविध सण उत्सवांच्या निमित्ताने देवतांची उपासना केली जाते. देवी नवसाला
पावणारी असल्याने दर्शणार्थ अलोट गर्दी होते. विशेषत: प्रित्यर्थ नवसासाठी श्रध्दाळूंची
वर्दळ असते.
अश्विन महिन्यातील नवरात्रात येथे दिमाखदार उत्सव साजरा केला जातो. त्या प्रसंगी
नऊ दिवस यात्रा भरते. नवसाला पावणा-या देवीच्या लोकिकामुळे भाविक भक्तांची तुफान
गर्दी उसळते. भव्य कार्यक्रमांच्या रेल्ाचेलीमुळे परिसराची शोभा अधिकच खुलून दिसते.
नवरात्रीतील पहिले दोन दिवस देवीचा जागर म्हणून जाखडी नृत्य, संस्कारक्षम भजन
किंवा व्याख्यान, दिंडी आदि धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
तिस-या दिवसापासून गावराईच्या नवस कार्यक्रमाला प्रारंभ होतो. सकाळी 8 वाजल्यापासून
दर्शन व देवीची ओटी भरणे असे कार्यक्रम सुरू होतात. यानंतर दीपारत्यांचे नृत्य
व जाखडी नृत्यास सुरूवात होते. या नृत्यासाठी विशिष्ठ प्रकारचा पेहराव करणे ही
येथील पारंपारिक रूढी आहे. विशिष्ठ प्रकारचे धोतर, कमरेला रंगीत शेला (पटका) डोक्यावर
मराठेशाही पगडी पायात चाळ असा गणवेश परिधान केलेले सर्व ग्रामस्थ मानकरी जाखडी
नृत्यात सहभागी होतात. विजयादशमीच्या (दसरा) दिवशी सामूदायिक सोने लुटणे हा सोहळा
मोठया उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी नऊ दिवस रूजवलेले धान्य (रोव) हे स्नेहभावनेने
एकमेंकांना आदानप्रदान केले जाते. दुस-या दिवशी एकादशीला पहाटे जमविलेले नवधान्याचे
भक्तांना वाटप केले जाते. भक्तगण हा हुरडा धान्यवृध्दीच्या श्रध्देने घरातील धान्यात
मिसळतात. हे स्थान सावर्डे मार्गे 32 किमी. अंतारावर आहे.
वहाळची श्री विठ्ठल रखुमाई
येथील दोन्ही मूर्तींना दगडी प्रभावळ आहे हे या मंदिराचे वेगळेपण आहे. अंदाजे
200/250 वर्षापूर्वी हे मंदिर येथील वहाळकर घराण्याने बांधले. 100/125 वर्षापूर्वी
जीर्णोध्दार केला, त्यावेळी सभामंडप बांधला. सभामंडपात देवदेवतांच्या अनेक तसबिरी
लावल्या आहेत. तसेच भिंतीवर पंडलिकाचे भेटीसाठी विठ्ठल आले, शेगावचे गजानन महाराज
यांची तैलचित्रे काढली आहेत. सभामंडपापुढे पडवीसारखा भाग आहे.
बिवलीचे पुरातन श्री लक्ष्मीकेशव मंदिर
चिपळूण शहराच्या पश्चिमेस निसर्ग सौदर्याची मुक्त हस्ते उधळण असलेले डोंगर कुशीत
बिवली हे गाव वसले आहे. गावाच्या ब्राह्मणवाडीत पुरातन श्री लक्ष्मीकेशव मंदिर
उभे आहे. मंदिराच्या चहूबाजूंनी जांभ्ाा दगडाचे भक्कम, बंदिस्त व प्रशस्त आवार
आहे. या देवस्थानचा जार्णोध्दार सुमारे 200 वर्षापूर्वी पेशवे दरबार नीळकंठ शास्त्री
थत्ते यांनी केला.
गाभारा बंदिस्त असून त्याची लांबी रूंदी सुमारे 7 बाय 7 फूट इतकी आहे. गोलाकार
गाभा-याची अंतर्गत बाजूकडून उंची सुमारे 25 फुट इतकी आहे. उंच घुमटावर वायुवीजन
व प्रकाशाकरिता आरपार कोनाडयांची व्यवस्था आहे. गाभा-यासमोरील सभागृह सुमोर 12
बाय 8 फुट लांब व रूंद आहे. याचे छत गजपृष्ठाकाराचे आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून
पूर्वेकडील प्रमुख प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. मंदिराचे पश्चिमेस
पिछाडीस दुसरे प्रवेशद्वार असून तेथे सुमोर 1 किमी. लांबीची पुरातन जांभ्या दगडाची
पाखाडी आहे.
गाभा-यात काळया शाळीग्राम पाषाणात एकसंध कोरलेली सुबक श्री लक्ष्मी केशवाची मूर्ती
आहे. पायापासून मस्तकापर्यंत प्रभावळीसह मूर्ती सुमारे सव्वा दोन फुट उंच आहे.
प्रभावळीच्या त्रिकोणात दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीच्या उजव्या पहिल्या हातात
पद्म असून त्याची एक पाकळी दुमडली असल्याने त्यात गणपतीचा भास होतो. उजव्या मागील
हातात शंख आहे. मागील वरच्या डाव्या हातात चक्र आहे व खालील हातात गदा आहे. मूर्तीच्या
उजव्या पायाजवळ गरूड आपल्या पत्नीसह विनम्र भावे हात जोडून उभा आहे. डाव्या पायाजवळ
लक्ष्मीजवळ तिची सेविका चावरी धरून आहे. मस्तकावर कुरळे कुंतल व गंध लावलेले आहे.
गळयात य्ाज्ञोपवित, वैजयंती माळा, कौस्तुभमणीहार व दागिने कोरलेले आहे. गळयातील
माळेतील मोत्यांमध्ये आंब्याचा आकार कोरला आहे. मनगट व पायात नाजूक तोडे आणि हाताच्या
बोटांत अंगठया उठावदारपण्ो कोरलेल्या दिसतात. मूर्तीच्या तळहातावरील रेषाही स्पष्ट
दिसतात. या सर्वांगाने नटलेल्या रेखीवपणे कोरलेल्या श्री लक्ष्मी केशवाच्या मूर्तीच्या
दर्शनाने देहभान हरपून जाते व भक्त नतमस्तक होतो. श्री लक्ष्मी केशवाचे वाहन गरूड,
सभागृहात प्रवेश करताना गरूडाची बैठी शुभ्र संगमरवरी मूर्ती स्वागत
करते. श्री लक्ष्मी केशवाच्या देखण्या मूर्तीदर्शनाने मन प्रसन्न होते. चिपळून
करंबवणे मार्गे 24 किमी. अंतरावर तर धामेली मार्गे 8 किमी. अंतरावर आहे.
कार्तिक उत्सव
श्री लक्ष्मी केशव देवस्थानतर्फे प्रतिवर्षी कार्तिक महिन्यातील शुध्द 10 पासून
पौर्णिमे पर्यत कार्तिक उत्सव साजरा केला जातो. पाचव्या मुख्य दिवशी महाप्रसाद
असतो. काही वेळा या दिवशी त्रिपुरी पौर्णिमा असते.
बिवलीचे प्राचीन श्रीकृष्णेश्वर मंदिर
बिवलीच्या या निसर्गरम्य गावात मालदोली रस्त्याच्या अगदी कडेला ग्रामदेवता श्री
वाघजाई-खेमराज मंदिरानजीक धरणवाडी येथे अत्यंत प्राचीन शिवालय आहे. यास श्रीकृष्णेश्वर
मंदिर म्हटले जाते.
हे मंदिर पांडवकालीन असल्याचे जाणकार सांगत असले तरी याचेविषयी निश्चित माहिती
उपलब्ध नाही. या मंदिराचे बांधकाम जांभ्या दगडापासून केले आहे. मंदिर भग्नावस्थेत
जरी भासले तरी अंतर्गत भागाची गजपृष्ठाकार बांधणी सुबक आहे. मंदिरात फक्त गाभारा
असून भग्नशिवपिंडी आहे. मंदिराचे सभोवती जांभ्या दगडाच्या भिंतीचे अवशेष आहेत.
नागावेतील सुकाईदेवी मंदिर
येथे श्री सुकाई देवीचे जागृत देवस्थान असून हे मंदिर यशवंतराव शिंदे यांनी बांधले.
या मदिराच्या निर्मिती मागील पूर्व इतिहासानुसार यशवंतराव हे मु-यातील खेमशास
जाऊन श्री देवी सुकाईची पूजा करायचे. पूजा समाप्त होताच त्यांनी मागणी केल्यानूसार
देवी सव्वातोळा सुवर्ण मुखातून सोडायची. अन् ते घेऊन यशवंतराव घरी यायचे. असे
12 वर्षे सुरू होते. तद्नंतर मूळ घरी पेढांब्यास यावयास तयार झाली. फक्त गावात
पोहोचेपर्यत मागे न पाहण्यास सांगितले गेले. त्यानूसार यशवंतराव घोडयावरून चालले
असताना त्यांना वाद्यांचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने त्यांनी अलोरे मैदानानजीक
मागे वळून पाहिले. तेव्हा देवीने मी नागावले अशी हाक दिली. अन् देवी याच ठिकाणी
राहली. यातूनच पुढे या गावाला नागावे हे नाव प्राप्त झाले. यशवंतराव शिंदे मोकाशी
पेढांबकर यांचे कारकिर्दीत हे मंदिर वैभवास जाणले गेले. मंदिराच्या डाव्या बाजूस
पूर्वी शिलालेख होता. कालौघात तो नष्ट झाला असावा.
|