श्री
क्षेत्र परशुराम संस्थान
भगवान श्री विष्णूंच्या दशावतारांपैकी सहावा अवतार म्हणजे भार्गवराम किंवा परशुराम
या पूर्ण मानवी आकारातील चिरंजीव अवताराचे जागृत देवस्थान-परशुराम येथे आहे.
परशुरामांनी
अवतार कार्यात 21 वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली त्यावेळी त्यांना सार्वभौमत्व प्राप्त
झाले. परंतू त्यांना राज्य करावयाचे नव्हते शिवाय नि:क्षत्रियकरणात हातून खूप हत्या
घडली म्हणून त्यांनी मन:शांतीकरिता मोठा यज्ञ केला. त्याचे पौरोहित्य कश्यप ऋषींनी
केले. यज्ञ सांगतेकरिता जिंगलेल्या पृथ्वीचे दान कश्यप ऋषींना दिले व उर्वरित आपली
सर्व संपत्ती ब्राह्मणांस दान केली. दान दिलेल्या भूमीत रहायचे नाही म्हणून समुद्र
हटवून्ा स्वत:स विश्रांती, निवास व तप:श्चरणासाठी नवीन भूमी निर्माण केली. तीच अपरान्त
भूमी म्हणजे कोकण होय सद्याचे परशुराम मंदिर आहे, त्या पर्वत क्षेत्रास परशुरामांनी
महेंद्रगिरी असे नाव दिले. त्यास सध्या परशुराम डोंगर असे म्हणतात. श्री परशुराम
महेंद्रगिरीवर निवास करतात व हिमालयात तपश्चर्येसाठी जातात, अशी श्रध्दा आहे.
सुमारे 600 वर्षापूर्वी हल्लीचे मंदिरातील स्वयंभू स्थानावर गाय पान्हा सोडत असे.
त्यावरून हया देवस्थानाचा शोध लागला., काही कालावधीनंतर सध्याचे देवस्थानचे गणपुले
पुजा-यांचे नारायण हे पूर्वज रत्नागिरीनजीक केळये मजगाव येथे रहात असत. त्याना दष्टांत
झाला की, परशुरामांची सेवा केल्यास मनोकामना पूर्ण होतील . त्या नुसार हे कुटुंबासह
येथे आले. त्यावेळी देवाची पूजा एक कुणबी करीत होता. त्याच्या सांगणीवरून गणपुले
सेवा करू लागले. पूजा करणा-या कुणब्यास पाणकर म्हणत. या गावात आजही त्यांचे वंशज
आहेत. आजही त्यांचा या देवस्थानात त्यांचा मान पहिला आहे. नंतर देवस्थान्ााच्या
प्रसिध्दी पश्चात तत्कालीन आदिलशहा सरकारच्या मदतीतून मंदिरास दोन घुमट बांधणेत
आले. व देवस्थानासाठी काही उत्पन्न मिळणेबद्दलची कायम सनद मिळाली. सुमारे 300 वर्षापूर्वी
कोकणवर जंजिरेकर सिद्यी हबशी यांची सत्ता होती. त्यांनी देवस्थानास हानी पोहोचवण्याचे
असफल प्रयत्न केले. त्यावेळी परशुरामक्षेत्री ब्रम्होद्रस्वामी नावाचे महापुरूष
तपश्चर्येसाठी मुक्कामी होते. त्यांना योग सिघ्दी प्राप्त होत्या. दुष्टप्रवृत्तीपासून
होणा-या त्रासापासून सुरक्षितता येणसाठी स्वयंभू स्थानावर
त्यांनी पादुकांची स्थापना केली. समोर दगडी फरशी बांधून शिसे ओतले. तिसरा घुमट जंजीरा
येथील हबशी सिद्यीच्या कन्येने सुमारे 300 वर्षापूर्वी बांधला. सिद्यीचे जावई समुद्र
प्रवास करत असता मोठे वादळ उठले सुमारे 6 महिनेपर्यंत समुद्रात भरकटलेल्या जहाजाचा
पत्ता लागेना. त्यावेळी सिद्यीच्या कन्येने ब्रम्होंद्रस्वामींच्या आज्ञ्ोनूसार
श्रीदेव भार्गवरामांना नवस केला की, आपले पतीसह गलबत सुखरूप परतल्यास श्रींच्या
मंदिरास एक घुमट बांधीन व चौघडा वादनीची व्यवस्था करीन. तत्पश्चात थोडेच दिवसात
गलबत सुखरूप परतले. नवस फेडीनिमित्त तिने तिसरा घुमट बांधला व चौघडावादनाकरिता दरसाल
1200 रूपयांची नेमणूक केली. मंदिर बांधकामासाठी द्रव्यपूरवठा करणारे मुस्लिम प्रत्यक्ष
कारागीर ख्रिश्चन व हिंदूधर्मीय भक्त यामुळे एकात्मतेचे दर्शन या बांधकामातून जाणवते.
मंदिराच्या वास्तू स्थापत्य सौदर्यात मंदिर, मशीद व चर्च रचनेचा सुंदर संगम साधला
गेला. बांधकामाचे कारागीर ख्रिश्चन ज्या डोंगराच्या माळावर वस्तीला होते त्या डोंगराला
किरिस्वावचा माळ संबोधतात. मात्र जीर्णोध्दारित मंदिर रचनेत हे सर्व बदलले आहे.
मंदिराच्या लाकडी मंडपी गाभा-यात एक पुजारी व सोवळे नेसलेल्या ब्रम्हवृदांस प्रवेशाची
परंपरा आहे, स्त्रीयांनाही प्रवेश निषिध्द आहे. कारण श्री परशुराम ब्रम्हचारी आहेत,
गाभा-यात गंडकी शिळेच्या तीन सुबक मुर्ती आहेत. त्यांचे नावे अनुक्रमे काम, परशुराम
व काळ अशी आहेत. या मुर्ती म्हणजे ब्रम्हा, विष्णू व महेश यांचे अवतार होत. पैकी
मधली मूर्ती विष्णूंचा चिरंजीव सहावा अवतार श्री परशुराम आहे. काम ही वासना (इच्छा)
देवता, परशुराम वासनारहित (निरिच्छ) होऊन या स्थळी निवास करीत आहेत. म्हणूनच काळ
व काम ही प्रतिके स्थापली आहेत. तसेच जेष्ठ खगोलतज्ञ व पंचागकर्ते दा.कृ.सोमण यांनी
काळ, वेग व काम यांच्या प्रतिकांचा वैज्ञानिक दृष्टीकोनही मांडला आहे. पहिली मूर्ती
ब्रम्हदेवाचे अवतार काम. तिच्या दोन हातात दंड कमंडलू असून दोन हात वरदहस्त आहेत.
मधली मूर्ती विष्णू अवतार श्री परश्ाुरामांची. तिच्या हातात बाण, धनुष्य, परशु अशी
शस्त्रास्त्रे असून उजवा हात अभय हस्त आहे. सर परशुरामांचे मूळ नांव राम परंतू
भृगुकुलोत्पन्न म्हणून त्यांना भार्गवराम या नावानेही ओळखले जाते. त्ासरी मूर्ती
शंकराचे अवतार काळ. तिच्या हातात परशू आणि मृग (हरण) असून दोन हात
वरदहस्त आहेत, तिन्ही मूर्ती चतुर्भूज आहेत. या मूर्तीच्या मागील बाजूस पितळी प्रभावळ
आहे. प्रभावळींच्या तोंडांना कीर्तीमुख म्हणतात. परशुरामांच्या मूर्तीसमोर सिंहासनाचे
पुढील बाजूस खालील भागात स्वयंभू स्थान आहे. त्यावर ब्रम्होंद्रस्वामी स्थापीत पादुका
आहेत, त्याखली स्वयंभू लिंगे आहेत.
सुमारे 180 वर्षापूर्वी सद्यस्थितीतील मूर्तींची प्रथम प्राणप्रतिष्ठापना ब्रम्होंद्रस्वामींनी
करवून आसनस्थ जीर्ण मूर्ती वाशिष्ठी नदीच्या गांधारेश्वर डोहात विसर्जित केल्या.
येथून दुस-या गाभा-यात येताना दरवाज्यास असलेले सुबक नक्षीकाम केलेले लाकडी मखर
प्रेखणीय आहे. या गाभा-यात श्रीदेव भार्गवराम यांचा पलंग आहे. भगवान परशुराम दिवसभराच्या
विश्वसंचारापश्चात सुर्यास्तानंतर येथे विश्रींती घेतात, अशी श्रध्दा आहे. सद्यस्थितीतील
मूर्ती गुहागर येथील परचुरे पुराणिक यांनी पुणे येथे बंकटराम शिल्पकाराकडून घडविल्या.
त्यांची प्रतिष्ठापना मिती माघ शु. 6 शके 1701 रोजी करणेत आली.
तिस-या घुमटानजीक 16 खांबी सभामंडपात पुणे येथील पेशवे दप्तरांतून आणलेली श्री ब्रम्होंद्रस्वामींची
तसबीर आहे. या सभा मंडपालगतच दक्षिणाभिमुखी मारूतीचे मंदिर आहे. बहुधा श्री रामदास
स्वामींन्ाी याची स्थापना केल्याचा तर्क आहे. या मंदिराला घासूनच काळया पाषाणांची
दीपमाळ आहे. या पाषाणांना हत्तीमुखाचा आकार दिला आहे. त्रिपुरारी पौर्णिमेस दीपमाळ
पाजळली जाते. मारूती मंदिरामागे मार्गदर्शक शुक्ल प्रतिपदेस प्रतिवर्षी ढालकाठी
नावाचे भगवे निशान उभे करतात. ते वैशाख अखेर काढतात. ही प्रथा ब्रम्होंद्रस्वामींनीच
पाडल्याचे सांगतात. श्री परशुराम मंदिराचे मागील बाजूस परशुरामाची रेणूकेची काळया
गंडकी पाषाणाची सुबक चतुर्भुज मूर्ती असून तिने गदा, डमरू, पानपात्र व शीर धारण
केले आहे. हे शीर सहस्त्रार्जुन दैत्याचे मानतात. रेणुका मंदिराला लागून बाणगंगातीर्थ
नावाचे विशाल कुंड आहे. श्री परशुरामांनी बाण मारून याची निर्मिती केली. म्हणून
यास बाणगंगा तीर्थ असे संबोधले जाते. कुंडाजवळ संगनरवरी पाषाणाची गंगेची मूर्ती
व शिवलिंग असलेले छोटे मंदिर आहे. त्याचे कडेला बारमाही शीतल जलसाठयाची छोटी विहीर
तृषार्थ्यांना तृप्त करते. श्री परशुराम मंदिराचे उत्तरेस
संगमरवरी पाषाणाची सिध्दीविनायकाची मूर्ती असलेले मंदिर आहे. या गणेश मूर्तींची
प्रतिष्ठापना माघ श्ाुध्द षष्ठी शके 1707 म्हणजेच इ.स. 1785 मध्ये झाली. या मंदिरात
माघ शुध्द षष्ठी व भाद्रपद शुध्द चतुर्थी निमित्त चार दिवस उत्सव साजरे केले जातात.
श्री परशुराम मंदिर प्रकाराभोवती धर्मशाळा असून जांभा दगडाच्या दीपमाळा आहेत. मंदिराच्या
महादरवाजालगतच तीन मजली चिरेबांधणीची इमारत आहे. तळमजल्यात देवस्थानचे कार्यालय
व कोठीची खोली, दुस-या मजल्यावर रेकॉर्ड रूम व पंचक मिटीची बैठकीची खोली असून तिस-या
मजल्यावर चौघडा आहे. मंदिर प्राकाराबाहेर देवाची बाग हे ठिकाण असून तिथे एक तोफ
आहे. रोज दोन वेळा तोफेचा आवाज काढण्याची पध्दत होती. परंतू ती पध्दत सध्या बंद
आहे. म्ांदिर प्राकारात सन 1971 मध्ये कै. यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत ग्रामीण
मराठी पत्रकार परिषदेचे तीन दिवसांचे पहिले अधिवेशन संपन्न झाले होते. देशभरातून
सुमारे 400 हून अधिक पत्रकार या अधिवेशनास उपस्थित होते. पहाटे 5 वा., दुपारी 3
वा. व सायंकाळी 7 वा. अशी दैनंदिन त्रिकाळ देवाची पूजा होते. श्री परशुराम देवस्थान
चिपळूणच्या उत्तरेस खेडच्या दिशेस 10 किमी. अंतरावर आहे.
यात्रा
व उत्सव
देवस्थानचा मुख्य उत्सव श्री परशुराम जयंती (अक्षयतृतीया) हा उत्सव वैशाख शुध्द
प्रतिपाद ते तृतिया असा तीन दिवस साजरा होतो. तसेच महाशिवरात्रीस मोठी यात्रा
भरते. मार्गशिर्षक वद्य 11 चे दिवशीही मोठी यात्रा भरते. या दिवशी पंढरपूरचा विठोबा
येथे असतो असा दृष्टांत सुमारे 100 वर्षापूर्वी एका पंढरीच्या वारक-यास झाल्यामुळे
तेव्हापासून ही यात्रा भरू लागली. या एकादशीस संताची एकादशी असे संबोधले जाते.
हे देवस्थान जागृत असल्याने भाविक दर्शनाला येतात. अनेक जण मनोवांच्छित यथाशक्ती
नवस करतात व तो पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी पुन्हा येतात.
परशुरामचे ग्रामदैवत श्रीधावजी व जाखमाता
पेढे-परशुराम गावचे ग्रामदैवत श्री धावजी व जाखमाता आहे. त्यांचे प्रशस्त मंदिर
परशुराम मंदिरानजिक आहे. या मंदिरासमोर पेशवेकालीन वैशिष्टयपूर्ण बांधणीची प्रेक्षणीय
विहीर आहे. तिला धावजीची विहीर असे संबोधतात. या विहीरीचे पाणी बाणगंगेत येण्यासाठी
चिरेबंदी पाटाची रचना केलेली आजही पहावयास मिळते. पाटाजवळच्या पाखाडीनजिक विठ्ठल
मंदिर आहे. धावजी मंदिरापासून थोडे अंतरावर विहीरीवर बांधलेले श्री दत्तमंदिर
आहे. याचे नजिक बारमाही जिवंत झरा आहे. या मंदिराच्या वरील डोंगर भागात तीन
गुहा आहेत. त्यापैकी एका गुहेवर बांधलेल्या छोटया कुटीत पटवर्धनबुवा हे सदस्थगृहस्थ
निवास करीत. दत्तमंदिराच्या वरच्या पायरवाडीकडे जाणा-या टेकडीत गर्द वनराईत
श्री पर्वतेश्वर मंदिर आहे. त्याच्या पुढील एका उंच टेकडीच्या माथ्यावर भव्य
दगडी दीपमाळ आहे.
पेढयाचे दुर्मिळ कामधेनू माता मंदिर
ज्या स्थानी भगवान श्री परशुराम देवस्थान आहे. त्या महेंद्रगिरीच्या पायथ्याशी
श्रीराम पादुका ठिकाणाजवळ पेढे गावात श्री कामधेनू माता मंदिर उभे आहे. श्री
परशुरामांच्या दिव्य लिंगावर पान्हा सोडणारी गोमाता ज्या शिळेच्या रूपात स्वत:चे
अस्तित्व ठेवून अंतर्धान पावली त्याच स्थानावर जागृत कामधेनू मंदि आहे. ज्या
गोमातेने पान्हा सोडून दुधाचा पाट वाहवला आणि श्री परशुरामांचे गुप्त स्थान
निदर्शनास आणून दिले, या देवस्थानास श्रीक्षेत्र परशुराम क्षेत्रांइतकेच महत्व
आहे. भारतील मोजक्याच दुर्मीळ कामधेनू मंदिरापैकी हे एक कामधेनू मंदिर आहे.
पेढयाच्या श्री परशुराम सानिध्य निसर्ग पर्यटन केंद्रापासून अगदी नजीक हे मंदिर
चिपळूणपासून सुमारे 4 किमी. अंतरावर आहे. महाराष्ट्रात कामधेनू मंदिरे अथवा
शिल्पे दुर्मिळ असून यात राजापूरचे धूतपापेश्वर मंदिर, साता-याचे श्री जरेडेश्वर
मंदिर, अहमदन्ागर-धमाणगावचे श्री जगदंबा मंदिर, दापेलीचे श्री राधाकृष्ण मंदिर,
कोळथरेचे श्री दत्त मंदिर, जव्हारचे श्री स्वयंभू शिवमंदिर, यवतमाळ जुगादचे
मंदिर आदिंचा समावेश आहे.
धामणवणे निसर्गराजीत वसलेले श्री विठ्ठलाई मंदिर
चिपळूण शहराच्या दक्षिणेकडील डोंगरमाथ्यावरील माळरानावर निसर्ग संपन्न भागात श्री
विठ्ठलाई देवीचे पुरातन मंदिर वसले आहे. मंदिराचा सभा मंडप प्रशस्त आहे. या
मंदिराच्या जवळील उंच प्रांगणातून परशुराम घाट चिपळूण शहर व परिसराचा भाग व
भव्य सहयाद्री पर्वत रांगांचे दर्शन घडते.
सद्यस्थितीतील जीर्णोध्दारित मंदिर वास्तू उभारणीत गावातील प्रत्येक घराचे अर्थ
व श्रम यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. चिपळूण रावतळेमार्गे धामणवणे मंदिरापर्यत
वाहन रस्ता आहे. अंतर सुमारे 6 किमी. असून श्रीदेवी विंध्यवासिनी मंदिराच्या मागील
बाजूच्या डोंगरातून जांभ्या दगडांचा पाखाडी मार्ग आहे.
धामणवणेतील श्री गणपती मंदिर
गणपतीची उंदरावर बसलेली अस्पष्ट अवयव असलेली ही 70 सेमी उंच मूर्ती आहे. हे उंच
डोंगरावर असलेले जांभ्या दगडाने बांधलेले छोटे दुऊळ वर घुमटावर शिखर, शिखराचे
घुमटाभोवती चार छोटे मिनार असे या मंदिराचे स्वरूप आहे. रामचंद्र अप्पाजी चितळे
हे धामणवणे येथे रहात असताना या गणपती मंदिराची दुरूस्ती चालू असता डोक्यात
दरडी पडून ते अंदाजे इ.स. 1800 मध्ये मृत्यूमुखी पडले, अशी नोंद मिळते. यावरून
हे मंदिर सन 1800 चे आधीचे असावे. या देवस्थानच्या ईनाम जमिनी चिपळूण परिसरात
काही ठिकाणी पूर्वीपासून होत्या. सन 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दाच्या काळात
या मंदिरानजिकच्या श्री गणेश मंदरात वास्तव्य करणारे एक साधू हे स्वातंत्र्ययुध्दाशी
संबंधित भूमिगत लढवय्ये होते. अशी दंतकथा सांगितली जाते. या गणेश मंदिरालगत
सुमारे पन्नास वर्षापूर्वी बांधलेल्या एका तलावात नजिकच्या बारमाही जिवंत झ-याचे
पाणी अडविले आहे, हे पाणी अतिशय शीतल व चवदार आहे.
कापसाळचा श्री गणपती
येथे जेव्हा जेव्हा प्रथम लोक रहायला आले तेव्हा ही मूर्ती बसविली असे सांगतात.
याला अंदाजे 200/250 वर्षे झाली असतील. एका चौथ-यावर विठ्ठलरखुमाई व दुस-या
चौथ-यावर गणपतीची दीड फुट उंच रंगवलेली मूर्ती आहे. विठ्ठलाच्या मूर्ती श्री.
अनंत शिवराम साळवी यांनी अंदाजे 1970-75 चे सुमारास बसविल्या. गाभारा व सभामंडप
असे मंदिराचे स्वरूप आहे. माघात 3 दिवसाचा उत्सव साजरा होतो.
कापसाळची श्री सुखाईदेवी
हे कापसाळ गावचे ग्रामदैवत आहे. अंदाजे 200/225 वर्षापूर्वी हे गांव वसले असावे.
त्यावेळी हे मंदिर बांधले असावे. हे या गावच्या 12 वाडयांचे मंदिर असून येथे
सुकाई, सोलजाई, वाघजाई व काळजाई यांच्या मूर्ती आहेत. सुकाईची मुर्ती महिषासुरमर्दिनी
रूपातील असून इतर देवींच्या मूर्ती वाघ, सिंह यांवर बसलेल्या आहेत. मंदिराभोवती
झाडे लावून हा परिसर शांत, प्रसन्न ठेवला आहे. या मंदिराबाहेर एक छोटे देऊळ
असून त्यात देवींच्या 7/8 मीटर झिजलेल्या काळया पाषाणाच्या मूर्ती आहेत.
मिरजोळीचे बुध्द मंदिर
येथील भगवान बुध्दांची मूर्ती ही 45 सेमी. उंचीची पितळेची आहे. हे मंदिर 1988
मध्ये बांधले. येथील मूर्ती श्री जनार्दन मारूती सकपाळ, मु.हातीब, जि.रायगड
यांनी दिली. सिताराम राघव जाधव,सुकोजी रामजी माहिते हे याची व्यवस्था पाहतात.
हे मंदिर म्हणजे 4 मीटर बाय 10 मीटर आकाराचा हॉल आहे. यातच एका चौथ-यावर मूर्ती
बसविली आहे.
धामणदेवीचे पिंपळेश्वर मंदिर (ता. खेड)
एकाच बुंध्यात वड, पिंपळ, आवळा, औदुंबर आणि बेल ही 5 झाडे वाढलेले व अध्यात्मिक
पावित्र्याने भारलेले पिंपळेश्वर मंदिर धामणदेवी येथे आहे. भोईबाबा म्हणून प्रसिध्द
असलेले रामचंद्र नारायण कासेकर हे या परिसराचे व्यवस्थापन पाहत असून वातावरण
नयमरम्य व आल्हाददायक असे आहे. या मंदिराची स्थापना 1962 मध्ये झाली आहे.
|