चिपळूणातील चतुष्कोन गणपती
 
उक्ताडचा उघडा गणपती
शहराच्या पश्चिमेस उक्ताड भागात उघडा गणपतीचे मंदिर आहे. हा पूर्वाभिमुख गणपती नवसाला पावतो, असा अनुभव आहे. काळया पाषाणाची ही मूर्ती सुमारे 300 वर्षे उघडयावरच होती. मूर्तीवर शेंदूराचा थर चढवलेला होता. या मूर्तीच्या सोंडेजवळ एक छोटासा गोल खड्डा आहे. ते मुर्तीचे मुख मानले जाते. पूर्वी काही भाविक या मुखात गुळाचा खडा नैवेद्य म्हणून ठेवत असत.

मंदिरासंबंधी आख्यायिका अशी आहे की, एका रात्रीत निगडीच्याच झाडांपासून मंदिर बांधण्याचा दृष्टांत काही भाविकांच्या स्वप्नांत दिला होता, साहजिकच असे मंदिर उभारणे अशक्यप्राय होते. कारण निगडीची झ्ााडे इमारत बांधण्या इतकी मोठया आकाराची नसतात, त्यामुळे या विवंचनेत ही मूर्ती वर्षानुवर्षे उघडयावरच राहिली आणि म्हणूनच त्याचे नाव उघडा गणपती असे प्रसिध्द झाले. दिवसागणिक दर मंगळवारी, वनायकी, संकष्टी व अंगारकी चतुर्थीला भाविकांची गर्दी वाढू लागली. ऊन,पावसांत असलेला उघडा गणपती पाहून अनेकांना खंत वाटू लागली. त्यातूनच मंदिर बांधण्यासंबंधी दैव संकेतानुसार सर्वानुमते बैठकीत ठाम निर्णय झाला. 1984 मध्ये आकर्षक मंदिर उभारले गेले. अशा प्रकारे उघडा गणपती मंदिराच्या सावलीत आला. या मर्तीची प्रतिष्ठापना करताना पूर्वीच्या पाषाण मूर्तींवरील शेंदुराचे थर काढून टाकण्यात आले. दैनंदिन पूजाअर्चेसाठी पुजा-याची नियुक्ती करण्यात आली. या गणपतीचा माघी महिन्यात गणेश जयंती उत्सव तीन दिवस मोठा शानदार उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो.

चिपळूण-गुहागर रस्त्यालगतच शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकापासून सुमारे 4 कि.मी. अंतरावर मंदिर असून वाशिष्ठी नदी तीरावरील एका प्रशस्त मैदानावर वसलेले आहे.


श्रीगणपती मंदिर, मुरादपूर, चिपळूण.
अंदाजे 1920 ते 25 मध्ये एका बिल्डींग कॉन्ट्रॅक्टरने हे मंदिर बांधले, असे सांगतात. गणपतीची मूर्ती काळया पाषाणाची अंदाजे 80 ते 85 सेंमी उंचीची साधी असून अवयव अस्पष्ट आहेत. हे वस्तीपासून थोडया अंतरावर एकांतात असे स्थान बाजूने फुलझाडे लावली आहेत. बाहेर बसण्यासाठी कट्टे बांधले आहेत. याचे मागे पिंपळाचे झाड असून तेथे काळभैरव, मारूती यांच्या छोटया मूर्ती ठेवल्या आहेत.


मळयातील स्वयंभू श्री गणेश
शहरात मुंबई-गोवा महामार्गालगतच रावतळे-मतेवाडी नजीक रेडिज पेट्रोल पंपाशेजारी मळयात स्वयंभू श्री गणेश मंदिर आहे.

चिपळूणच्या मार्कंडी भागातील एका टेकडीवरील एक बैरागी ब्रिटिश राजवटीत सन 1854 चे सुमारास रोज रात्री उठून भगवती विंध्यवासिनीचे दर्शनास जात असे. प्रथम तो सद्यस्थितीतील मंदिराच्या ठिकाणी असलेल्या पिंपळ वृक्षास प्रदक्षिणा मारून प्रार्थना करी, माते स्वराज्य बुडविणा-या कंपनी सरकारला तू नष्ट कर. 1857 च्या क्रांती समरामध्ये झाशीची राणी, तात्या टोपे, बहादूरशहा यांनी कंपनी सरकारला प्रखर झुंज्ा देऊन बुडविले. परंतु कंपनीच्या जागी सम्राज्ञी व्हिक्टोरिया आली. बैराग्याची पुन्हा स्वराज्य यावे अशी प्रार्थना चालू झाली. सन 1858 मध्ये सीतारामपंत देवधर याना त्यांच्या शेतात स्वयंभू श्रीगणेशाची मूर्ती सापडली. सध्याच्या मुंबई-गोवा महामार्गालगत देवधर कुटुंबियांच्या मालकीच्या जमिनीमध्ये शेती व इतर असा कोणताही व्यवहार नव्हता. सिताराम पंतांनी तिथे शेती करण्याचा विचार केला. जमीन जरी पडीक असली तरी मळयाची जागा असल्याने पाणथळही आहे. यामुळे शेती करावी ही त्यांची इच्छा होती. त्यानुसार नांगरणी करीत असताना ही मूर्ती सापडली. ही मूर्ती पिंपळ वृक्षाच्या बुंध्यापाशी स्थापली गेली. श्री चे प्रसन्न रूप पाहून सारेजण हरखून गेले. साहजिकच यांस मळयातील स्वयंभू श्री गणेश असे नामाभिधान प्राप्त झाले.

पेशवे काळात दरबारारील चिपळूणला स्थायिक झालेले बाळकृष्ण चितळे हे नि:सिम गणेश भक्त होते. त्यांच्यामुळे मळयातील गणेशाकडे तत्कालिन प्रसिध्द व्यापारा बाळाजी नारायण चितळे व अन्य भक्तजन जाऊ ल्ाागले. पिंपळ वृक्षावरील मधमाशांचा त्रास निवारण करण्यासाठी आग घातली. त्यामुळे त्रास मिटला परंतु पिंपळ वृक्ष कालांतराने कोसळला. जांभा दगडांचा जुना पार व त्यावर गणेशमूर्ती फक्त राहिली, प्रथम पोंक्षे गुरूजी स्वयंभूस्फूर्तीने पूजाअर्चा करीत परंतु नंतर सिताराम पंत देवधरांचे वंशज पूजाअर्चा करू लागले. सद्यस्थितीत संजय कृष्णाजी देवधर व कुटंबीय मालक व पुजारी म्हणून दैनंदिन नित्यनेमाने सेवा करतात. संजय हे स्वत:वयाच्या 8 व्या वर्षापासून गेली 34 वर्षे पूजा अर्चा करीत भक्तांशी सुसंवाद साधून आहेत.

देवधर कुटुंबीय राष्ट्रीय एकात्मता व सर्व समानतेच्या कार्यक्रमांना प्राधान्य देतात. विश्व कल्याणार्थ श्री गणेश अथर्वशीर्षाचे एकलक्ष जपानुष्ठानाचा महत्वाकांक्षी संकल्प त्यांनी पूर्णत्वास नेला. सहस्त्र पुष्पहारांनी मंदिर सजविणे, फुलांचे व्रत, दीपोत्सव आदि कार्यक्रम कल्पकतेने येथे संपन्न केले जातात. या मंदिरात भाविकांची सदैव मांदियाळी असते, मानसिक समाधानाबरोबर हाकेला धावणा-या मळयातील गणेश्ााचे दर्शनार्थ भाविकांची पावले आपसूकच मंदिराकडे वळतात.


पागेतील श्री गणपती
पेशवाईच्या अगोदरचे हे प्राचीन गणेश मंदिर असून, पेशवाई काळात याचा जीर्णोध्दार झाला आहे. हा काळया पाषाणात घडविलेला गणपती आहे. विंध्यवासिनी देवी व हा गणपती एकाच पाषाणात बनविला गेल्याचे जाणकार सांगतात. या मंदिरालगत वाडा आहे. सरकार दरबारातील मंडळी येथे येऊन आपले घोडे बांधत असत. मंदिर जीर्णोध्दारित आहे. माघी दशमी ते फाल्गुन प्रतिपदा दरम्यान कृष्णेश्वराची पालखी गणेशास भेटावयास आणतात.
 
© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions