निसर्ग पर्यटन
 

प्रस्तावना

अलिकडच्या काही वर्षात झालेल्या बदलामुळे चिपळूणचे पर्जन्यमान बदलले आहे. साहजिकच याचा परिणाम येथील निसर्ग पर्यटनावर झाला असून बहरलेला निसर्ग पर्यटकांना खुणावत असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी पहायला मिळते. यातील काही निवडक ठिकाणांविषयी माहिती देत आहोत.

विसावा पॉईंट


राष्ट्रीय महामार्ग चिपळूण विभागाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 वर चिपळूण शहरापासून फक्त 8किमी. अंतरावर निसर्गरम्य विसावा पॉईंट आहे. या पॉईंटवरून चिपळूण शहर दर्शन आणि गोवळकाेट दर्शन आणि वाशिष्ठी नदीचे विस्तीर्ण पात्राचे विहंगमय दृश्य पाहताना भान हरपून जाते. त्यामुळे वाशिष्ठी दर्शन पॉईटला विसावा पॉईट असे म्हणतात. परशुराम घाटातील एक अवघड, अपघाती वळण सुलभ सोपे करून सुशोभित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला आहे.


पूर्वी या पॉईटच्या वळणावर एक छोटी शी टेकडी होती व तिला लागूनच महामार्गास पर्यायी रस्ता होता. परंतू टेकडी व त्यातच अवघड वळण यामुळे वाहनचालकांनी कितीही दक्षता घेतली तरी अपघातांचे प्र्ामाण अधिक होते. या समस्येवर सुयोग्य तोडगा म्हणून महामार्ग विभागाने रितसर परवानगीनूसार टेकडी भूईसपाट केली. त्यामुळे घाटाचा भाग तर रूंदावलाच पण वळणही गेल्याने अपघातांच्या संख्येवर निंयत्रण आले. संभाव्य दरडीपासून वाहन बचावात्मक तळही येथे उभारण्याची संकल्पना आहे.

डेरवणचे श्री स्वामी समर्थ उद्यान


कोकणच्या नैसर्गिक समृध्दीस पर्यटनाची जोड दिल्यास कोकणचा सर्वांगीण विकास जलदगतीने होईल याचे मूर्तीमंत उदा. म्हणजे डेरवण येथील स्वामी समर्थ उद्यान होय.

श्री शिव समर्थ गडालगतच हे उद्यान श्री संत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे उभारले गेले असून त्याची देखरेख ट्रस्टकडेच आहे. श्री शिवशिल्पसृष्टीच्या नजीकच्या डोंगरउतारावर सुमारे तीन एकर क्षेत्रफळ असलेल्या या उद्यानात जलव्यवस्थापन वनौषधी लागवड व संवर्धन, निसर्ग-पर्यावरण जोपासना आदि महत्वपूर्ण विषयांचे प्रत्यक्ष दर्शन होते. आधुनिक क्रीडा साधनांनीयूक्त असलेल्या या उद्यानात कृत्रिम धबधबा व जलधारांना विविध आकर्षक आकार प्राप्त करून देणारी कारंजी ध्वनीप्रकाश योजनेवर नृत्य करताना पाहून मन हरपून जाते.

आल्हाददायक वातावरणातील या उद्यानात पर्यटक खेळण्यात बागडण्यात रमून जातात. तेव्हा निखळ आनंद मिळून मन तजेलदार होते.
हे उद्यान म्हणजे सदगुरू दिगंबरदास महाराज व अशोककाका महाराज यांच्या निसर्गाविषयीच्या उदात्त भावनांचे प्रतिक आहे. हे उद्यान फक्त सायंकाळी 6 ते रात्रौ 8 वाजेपर्यंत पर्यटकांना पाहण्यासाठी खुले असते.

वीरमध्ये अरण्य-साहस पर्यटनास वाव


चिपळूण तालुक्यातील सरहद्दीवरून वाहणा-या कापशी नदी खो-याच्या अति दुर्गम भागात वसलेले निसर्ग सौदर्याची मुक्त उधळण करीत वीर गाव वसले आहे. हा ग्रामीण परिसर वन पर्यटन, साहसी पर्यटन, धार्म्ाक पर्यटन, ग्रामिण व कृषी पर्यटन प्रकारांनी संयुक्तपणे बहरण्यास अतिशय अनुकूल आहे. वीर-देवपाट या ग्रामीण भागात नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळांची रेलचेल आहे.

येथे अरण्य व पोफळीच्या बागा, समृध्द वन्यजीव, 200 प्रकारच्या वनस्पतींचे समृध्द वन आहे. येथील शास्त्री नदी, माखजन खाडी व वीर खाडी यांच्या प्रेक्षणिय त्रिवेणी संगम स्थळास {धाकटा तिसंग| असे संबोधतात. कापशी नदी बावनदी व जयगड खाडी यांच्या प्रक्षणीय त्रिवेणी संगम स्थळास {थोरला तिसंग| असे संबोधतात. कोकण किनारा महामार्गावरील प्रसिध्द राई भातगांव पूल याच ठिकाणी आहे. कापशी नदी व शास्त्री यांचा प्रीती संगम भातगावनजीक आहे.

वीरकर चौसोपी

वैशिष्टयपूर्ण कोकणी पध्दतीच्या पारंपारिक बांधणीचे उत्तम उदा. असलेली वीरकरांच्या खाजगी मालकीची चौसोपी या गावात जतन करून ठेवण्यात आलेली आहे. येथे श्रीदेवी भगवतीची स्थापना आहे. आवारात स्ाुमारे 450 वर्षापूर्वीची वैशिष्टयपूर्ण बांधणीची विहीर आहे. साहसी पर्यटन अभ्यासक श्री भरतकुमार आंबेटकर यांची वन पर्यटन, कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, धार्मिक पर्यटन पूरक प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया या परिसरात सुरू आहे.

विविधतेने नटलेला धामणवणे फार्म


चिपळूणच्या विकासावर चौफेर कटाक्ष असणारे निसर्गप्रेमी रामशेठ रेडिज यांनी धामणवणे येथील डोंगरमय भागात उभारलेली फार्म हाऊस त्याच्या विधितेमुळे वैशिष्टयपूर्ण ठरली आहे. पाखाडी, पक्षी निरीक्षकांना मेजवानी ठरेल असे पक्षी अभयारण्य पक्षीतळे विविध औषधी वनस्पतींची लागवड, फलबागाने युक्त असे फार्म हाऊस आहे. येथून चिपळूनचे नयमरम्य दर्शन होते. यासाठी विशेष मचाणाची व्यवस्था करण्यात आली आहे. साहसी पर्यटकांच्या निवासासाठी विशेष कँप साईट ची रचना करण्यात आली असून नैसर्गिक जांभ्या दगडाला तासून बैठकांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

खेडयातील पर्यटन रूजविणारे पेढे पर्यटन केंद्र


कोकणातील जमिनी, आता सोन्याच्या खाणी आणि कोकण आणि कोकणवासियांचा विकास हाच ध्यास ही ब्रीदे घेऊन कार्य करणारे कोकणभूमी प्रतिष्ठान व कोकण क्लब या महत्वाकांक्षी संघटनांचे निर्माते व अध्यक्ष संजय यादवराव यांनी गौरविलेले व खेडयातील पर्यटनास अनुकूल असल्याचा उल्लेख केलेले निसर्ग पर्यटन केंद्र परशुराम टेकडीच्या पायथ्याशी पेढे गावात आहेत. हे महाडिक चालवित आहेत. हे स्थळ धामणदेवी व मजरेकाशी बंदरानजीक आहे.

या ठिकाणी येणा-या पर्यटकांसाठी निवास व भोजनांची व्यवस्था उपलब्ध आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सहली-पार्टीज् साठी हे स्थळ उत्तम आहे. नारळी-पोफळीच्या बागेत पर्यटक निवांतपणा येथेच अनुभवू शकतात. अ

आबीटगावचे स्नेहल कृषी पर्यटन केंद्र


चिपळूण तालुक्यातील आबीटगावच्या निसर्गरम्य वातारणात स्नेहल कृषी पर्यटन केंद्र वसले आहे. सुमारे 3 एकर इतके क्षेत्रफळ असून आंबा, काजू, फणस, जांभूळ, पेरू इ. कोकणी मेवा देणारे वृक्ष असून वा-याच्य्ाा मंद झुळूका मनास तजेला देतात. या केंद्रामध्ये निवास भोजन व्यवस्था उपलब्ध असून डबल बेड (स्वच्छता गृह-स्नानगृह अॅटॅच) 3 रूम आहेत. केंद्राजवळून नदी वाहत असल्याने जलपर्यटनासही वाव आहे. हे केंद्र सावर्डे-वहाळमार्गे सुमारे 30 किमी. अंतरावर आहे.

कोयना


112 देवरायांनी नटलेल्या चिपळूण तालुक्याला अत्यंत जवळचे असणारे अभयारण्य म्हणून कोयना अभयारण्याचा उल्लेख होतो. सन 1985 मध्ये स्थापन झालेल्या या अभयारण्याचा परिसर 422 चौ.किमी. इतका आहे. वासाेटा, महाखोरे, इंदवली मेट असे तीन भाग या अभयारण्याचे आहेत. 200 इंच पर्जन्यमान, प्राणी, पक्षी, यांचा मुक्त संचार यामुळे हा परिसर भटक्यांचे प्रमुख आकर्षण बनला आहे.

कुंभार्ली घाट


जागतिक वारसा स्थानात नोंद झालेल्या पश्चिम घाटातील एक प्रमुख घाट म्हणजे कुंभार्ली घाट. हा घाट चिपळूण-कराड सातारा पुणे-बँगलोर शहरांना जोडतो. या घाटातील सर्वोच्च ठिकाण घाटमाथा म्हणून आेळखले जाते. कोकण व घाटांना जोडणारा हा केंद्रबिंदू असून प्रचंड वेगान वाहणारे थंडगार वारे, सूर्यास्ताप्रसंगी दिसणारे नयनरम्य दृश्य अनुभवण्याचा विलोभनीय आनंद येथे घेता येतो. कोयना अभयारण्याच्या पार्श्वभूमीवरील वनराईमुळे निसर्ग डोळयांचे पारणे फेडतो.

मौर्य व मुघलांच्या पूर्वीपासून व्यापारी मार्ग म्हणून प्रसिध्द असलेल्या जिल्हयाच्या पर्यटन व्यवसायात महत्वाची भूमिका बजावणा-या या कुंभार्ली घाट परिसरात एकेकाळी मोठी बलशाली व संस्कृती संपन्न राज्य्ा व्यवस्था नांदत होती. इंग्रजांनी येथील सोनू धनगराच्या मदतीने घाटरस्ता मार्ग काढला. त्यानंतर त्याला मारण्यात आले. त्याची समाधी त्याठिकाणी आपणास दिसते. प्रवासी कोणीही असो या वळणावर देवस्थान्ााला नमस्कार करून पुढे होतात.

सामुदायिक केळी प्रकल्प, पेढांबे


पेढांबे गावी 25 तरूण शेतक-यांनी 51 एकर क्षेत्रात उभारलेल्या सामुदायिक केळी प्रकल्प संपूर्ण राज्यातील कृषी अभ्यासकांच्या वतीने कौतुकाचा विषय ठरला आहे. राज्याचे फलोत्पादन मंत्रीं ना.विनय कोरे, कृषीमंत्री ना. बाळासाहेब थोरात, केंद्रीय कृषी सचिव चौधरी, राज्य कृषी सचिव नानासाहेब पाटील आदिंनी गौरविलेल्या या प्रकल्पाला भेट देण्यासाठी पर्यटकांनाही पसंती दर्शविली आहे. ओसाड माळरानावर कृषीतज्ज्ञ रणजीत खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेला हा प्रकल्प कोकणात सहकाराची बीजे रोवून गेला आहे.

कोयना जलविद्युत प्रकल्प


रत्नागिरी-सातारा जिल्हयाच्या सीमेवरील परिसरात सहयाद्रीच्या पश्चिम घाटात, चिपळूणपासून 20 किमी. अंतरावर जमिनीपासून डोंगरात 600 मीटर खोल जमिनीत आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेला कोयना तलविद्युत प्रकल्प आहे.

महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरलेला हा प्रकल्प परिसर पर्यटकांनी आवर्जुन पाहण्यासारखा असून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने येथील शासकीय कार्यालयातून पूर्व परवानगी घेऊन पाहणे शक्य आहे. सहयाद्री पर्वतास समांतर डोंराळ भागातून उत्तर-दक्षिण वाहणारी कोयना नदी अरूंद खिंडी अडवून 103 मीटर उंचीचे धरण बांधून 2797 दशलक्ष घनमीटर क्षमतेचा शिवसागर जलाशय निर्माण करण्यात आला. यातील पाणी चार टप्प्य्ाांमध्ये संचालित करून ठेवण्यासाठी वापरलेली अभियांत्रिकी जादू विशेष थरारक वाटते. कोयना पोफळी व कोळकेवाडी या चार टप्प्यात दोन धरणांच्या माध्यमातून विद्युत जनित्रांच्या साहाय्याने भूगर्भाखाली 1920 मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे महत्वाचे अंग असलेली ऊसळी विहीर नवजा येथून भुयारातून साडेचार किमी. येणा-या पाण्याचे दरवाजे बंद केल्यानंतर निर्माण होणारा दाब निवळण्यासाठी बनविण्यात आली असून तिची खोली 131 मीटर आहे. नैसर्गिक सोदर्याने नटलेल्या निर्भिड अरण्यातील काळा कातळातून हजारो श्रमिकांनी व अभियंत्यांनी उभारलेला हा प्रकल्प एक अभियांत्रिकी आश्चयर् आहे. येथील श्रमीकांच्या धारांचा सुगंध आज महाराष्ट्रातील घराघरात विद्युत रूपाने दरवळत आहे. जगातील पहिले दुहेरी लेक टॅपिंग करण्याचा मान भारताला विशेषत: महाराष्ट्राला या प्रकल्पामूळेच मिळाला. येथील तंत्रज्ञानामूळे चौथ्या टप्प्यात जलाशयातील पाणी प्रतिसेंकद 90 किमी. वेगाने वॉटर लेक मधून विद्युत गृहात येते. कल्पनेच्या पलीकडील ही जादू ! देशीविदेशी पर्यटकांना विस्मयचकित करणारा आविष्कार असणा-या या प्रकल्पांतर्गत सहयाद्री पर्वताच्या अंतर्भागात लांबच्या लांब रस्ते, एकमेकांना भिडणारे असंख्य बोगदे, अकरा मजली इमारती उभी राहील एकढी अंतर्गत खोदाई नजरेस पडते. ती पहाण्यास आप्ाल्याला भूगर्भात जावे लागेल. संपूर्ण संगणक नियंत्रण असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान कर्तुत्ववान अभियंत्याचे विद्यापीठ ठरलेल्या या प्रकल्पाला विदेशातून महाराष्ट्रात आलेले पर्यटक आवर्जुन भेट देतात.

जलथेंबांना खेळवत लखलखी तेजस्विनी काढून ती प्रकाशमान करण्याची किमया बाहय जगाशी संपर्क तुटलेला असताना हजारो हातांनी व अवाढव्य यंत्रणा हाताळणीत छाती दडपून टाकणा-या काळयाकुट्ट पथ्थरांन्ाा कवटाळीत साकारलेले हे स्वर्गशिल्प प्रत्येकाने पहावयास हवे. अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरलेला हा प्रकल्प जगामधील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्पात अग्रस्थान पटकावून आहे.

नॅकने गौरविलेले डी.बी.जे. चे
वैशिष्टयपूर्ण जैव संग्रहालय


पर्यटनात्मक भटकंती करताना ज्ञानार्जनाचा प्रयत्न करणारे पर्यटक आणि त्याचे प्रमाण अलिकडक वाढू लागले आहे. सहयाद्रीत अन् चिशेषत: चिपळून तालुक्यात आढळणा-या विविध प्राणी व पक्षांच्या अपघाती वा इतर कारणातून मृत्यू ओढवल्यानंतर त्यांना अभ्यासाच्या दृष्टीने संग्रहीत करणा-या डा.बी.जे. महाविद्यालयात आज 40 वर्षाच्या अथक आणि अविश्रांत प्रयत्नांमळु वैशिष्टयपूर्ण आकारास आले आहे.

जागेच्या उपलब्धतेअभावी सध्या हे संग्रहालय कॉलेजच्या जीवशास्त्र विभागतच नियोजनपूर्वक मांडण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या स्थापने दरम्यानचे विभागप्रमुख कै. एन. आर. दांडेकर यांचे कार्यालयात या संग्रहाला सुरूवात झाली. सध्या येथे शासनाच्या व वन अधिनियमांनुसार संग्रह करण्यास बंदी असलेल्या 21 प्राणी व पक्षांच्या दुर्मिळ प्रजाती परवानगी घेऊन केवळ अध्ययनाचे गरजेपोटी जपण्यात आल्या आहेत. मान्ावेत्तर जीवसृष्टींची प्रत्यक्ष अनुभूती येथे आल्यानंतर आपल्याला सहज मिळू शकते. विज्ञान हा अभ्यासाचा विषय नसणा-या अनेक जिज्ञासूंना या संग्रहालयात आल्यानंतर कूतूहल वाटते, असे अनेकांनी आपल्या अभिप्रयात नमूद केले आहे. याप्रयोगामूळे विद्यार्थ्यांना विज्ञानाभिमुख करण्यात यश येत आहे. येथे सापांच्या विषारी व बिनविषारी प्रजाती जपून ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली वाया गेलेल्या टयूबची कल्पना अफलातून अशी आहे. पूर्वरचना व पूर्व परवानगीनंतरच हे प्रदर्शन पहायला उपलब्ध होते. अधिकच्या नियोजनानंतर हा विभाग मोकळया जागेत मांडून येणा-यांना याची माहिती देण्यास पुढाकार घेतो. ही बाब व्ाशेष कौतुकास्पद आहे. संग्रहालयात उपलब्ध असलेल्या पक्षांमध्ये महाराष्ट्राचा राज्यपक्षी शेखरू, मगर, घोरपड, खवल्यामांजर, कोल्हा, गिधाड, गव्हाणी घुबड, रानमूंगुस, जंगली मांजर, स्वर्गी, नर्तक, चिंटया, काळया मांजर, विविध सर्प, बिबटया, सयामी जुळे, घोणस, धनेश, रानकोंबडा, पाणकोंबडा, लांडोर, घार, तरस, मोर-लांडोर, अजगरे, विविध कीटक, मुंगूस, पोपट, कवडा, कबूतर, भारतीय ससा, शृंगी घुबड, पाणकोंबडी, पॉन्ड हेरॉन, बगळा, खार, शिक्रा, मोठा बगळा, कावळा, टास पक्षी, खंडया, मैना आदिंचा समावेश आहे.

 
© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions