| गजान्तलक्ष्मी
दोन्ही बाजूनी दोन हत्ती देवीवर जलाभिषेक करीत आहेत. अशा स्वरूपाची गजान्तलक्ष्मी
ही वैभवाचे, श्रीमंतीचे समृध्दीचे प्रतिक म्हणून पूर्वापार मान्यता पावलेली आहे.
प्राचीन खेडयात गजान्तलक्ष्मीच्या मूर्तीच्ो अवशेष सापडत असून कालभैरवासमोर चिपळूण
तिचे शिल्प आहे. त्यामूळे हे शहर प्राचीन असल्याचा संदर्भ सहजतेने प्राप्त होतो.
मात्र या शिल्पांचे नियोजनपूर्वक जतन व्हायले हवे. कमळावर बसलेली देवी व दोन्ही
बाजूंनी दोन हत्ती तिच्यावर अभिषेक करीत आहेत. अशा दगडी मूर्ती काही गावातून आढळतात.
गजान्तलक्ष्मी ही राजांची कुलदैवत होती. राष्ट्रकुट राजांचा काळ साधारणत: सन 500
ते 900 असा आहे. या मूर्ती ज्या गावात असतील त्याचा अर्थ समजावा की, ती गावे तितकी
जुनी आहेत. या गावातून राष्ट्रकुट राजांचा मोठा सरदार / सेनापती राहत असावा. त्याने
आपल्या राजाच्या कुलदेवतेचे चिन्ह आपल्यागावत कोरून ठेवले होते. पूर्वी या मूर्तीची
पूजा होत असे. राष्ट्रकूटांचे राज्य गेल्यानंतर या देवता मागे पडल्या. तसेच अनेक
गावे नव्याने वसविली गेली. नविन घराण्यांच्या देवता नव्या होत्या. त्यानी आपल्य्ाा
देवतांची स्थापना केली व या देवतांची पूजा होईनाशी झाली.
कोळकेवाडीची कोरीव लेणी (ओरवी)
चिपळूणपासून सुमारे 18 किमी. अंतरावर असलेल्या कोळकेवाडी धरणानजीकच्या सहयाद्री
पर्वतरागांच्या कुशीत बारराव कोळीराजे यांच्या पाऊलखुणांची साक्ष देणा-या ओरवी
आहेत. डोंगरमय अरण्यात समुद्रसपाटीपासून 2625 फुट (800मीटर) उंचीवर बारा ओवरींचा
समूह साहसवीरांना चढाईस आव्हान देत आहे. ओवरीच्या पश्चिमेकडून अरण्यमय चढाई
मार्ग आहे. कोळेवाडी गावाला अलिकडच्या काळात धरणामुळे महत्व प्राप्त झाले असले
तरी पूर्वी बारराव कोळयांचे 12 खोल्यांचे गुप्त निवासस्थान याच गावात डोगरात
होते. हे स्थळ जंगली जयगडाच्या नजीक आहे. ओव-याचे मध्यभागी सभामंडप असून येथून
गोवळकोट खाडीचा देखावा परशूराम देवालयाचा दर्शनी दरवाजा व कळस दिसतो. उत्तरेस
बारवई किल्ला, पूर्वेस तिवरे घाटी वृंदावन व नांदिवसेचा भैरकाठी किल्ला दिसतो.
त्याकाळी बारराव कोळी दैनंदिन घोडयावर बसून भिमेश्वराचे दर्शनास येत असत. ओव-याचे
खाली घोडयाचे पागा व चौव-या असून त्याची घरटे अतिजळीवस्थेत आहेत. 12 व्या ओव-याचे
डोक्यावरती पाण्याचे सूर्यदर्शनी टाके आहेत तेथे शिवाच्या त्रिमुर्ती आहेत.
हे टाके पाण्याचे बारमाही एकाच पातळीत असते. खडीवरून पाण्याचा झोत पडतो. त्यास
जंगल झोत म्हणतात. हे पाणी अति उंचावरून
पडत असल्याने वा-याने जोराने वरचेवर फेकले जाते. या विस्मयकारक ठिकाणी वर्तमान
स्थिती जाणून घेतल्यास ख-या अर्थाने साहसी पर्यटनाची संकल्पना मूर्त स्वरूप
धारण करू शकते.
ओवरीच्या पश्चिमेकडील कातळकडयात गुंफा क्र.1 ची लांबी रूंदी सुमारे 35 न् 25 फूट
व उंची 6.5 फूट असून मध्यभागातील आधारस्तंभ ढासळला आहे. गुंफेत नंदीची छोटी पाषाणमूर्ती
पुरातनकालीन वीगळी व शिल्पमूर्ती आहेत.
ओवरीच्या उत्तरेस गुंफा क्र. 2 ते 12 असा सलग समूह कातळकडयाच्या अवघड जागेत वसला
आहे. गुंफा क्र. 2 ची लांबी रूंदी सुमारे 15 न् 35 फूट व उंची 8.5 फूट आहे.
गुफा क्र. 3 ची लांबी रूंदी सुमारे 35 न् 15 फूट व उंची 12 फूट आहे.
गुफा क्र. 4 ची लांबी रूंदी सुमारे 12 न् 6 फूट व उंची 12 फूट असून या गुंफेत
जलस्त्रोत आढळतात. लागूनच पाण्याचे टाके आहेत.
गुंफा क्र. 5 ही अतिशय वैशिष्टयपूर्ण आहे. दुमजली असलेली ओवरींवरील ही गुंफा इतर
गुंफापेक्षा विशाल आकाराची आहे. हिच्या प्रवेशद्वारावरती टेहळणी सज्ज कमलपुष्पांणची
अप्रतिम कोरीव काम केलेली शिल्पपट्टी आहे. ही गुफा दोन भागात विभागली गेली असून
बाहय भागाची लांबी सुमारे 20 फुट असून अंतर्गत भागाची लांबी सुमारे 15 न् 20 फूट
आहे.
गुंफा क्र 5 व 6 एका विवराद्वारे (मोठे आरपार छिद्र)एकमेकांस जोडल्या गेल्या आहेत.
गुंफा क्र 6 ची लांबी रूंदी सुमारे 20न्15 फूट असून गुंफेत सरपटत जावे लागते.
गुफा क्र. 7 ची लांबी रूंदी सुमारे 12 न् 8 फूट व उंची 20 फूट आहे.
गुफा क्र. 8 ची लांबी रूंदी सुमारे 10 न् 10 फूट व उंची 6 फूट आहे.
गुंफा क्र 9 पूर्णत: ओहोरलेली आहे.
या गुफांचा बराचसा भाग भग्न असून या गुंफा समुहास स्थानिक ग्रामस्थ बारा
खोल्या किंवा कलावंतीणीचा महाल म्हणून संबोधतात. या गुंफाविषयी निश्चित पुरावा
नसल्याने विविध मतमतांतरे आहेत.
सभोवती दरी असल्याने कोरीव व लेणी समूहाच्या माथ्यावरील चढाईचा मार्ग आव्हानात्मक
व चित्तथरारक आहे. माथ्यावर उघडयावर विठ्ठल-रखुमाई प्रमाणे कटीवर हात घेतलेल्या
शिल्पमूर्ती, असून सुमारे 1 फुट लांबी रूंदीची आयताकृती वीरगळ जमिनीत अर्धवट गाडलेल्या
अवस्थेत आहे. वाडयाच्या जोत्याचे भग्नावशेषही आहेत.
अरण्यमय परिसरात विविध वनौषधी असून वन्य जीवांचा वावर आहे. सर्वोच्च माथ्यावरून
दक्षिणेस जंगली जयगड, पश्चिमेस कोळकेवाडी धरणाचा जलाशय, उत्तरेस सहयाद्रीच्या
रौद्र भीषण पर्वतरांगा व सभोवत्ााली दरी दृष्टीपथास येते. चिपळूण शहरापासून अलोरे,
कोळकेवाडी, बौध्दवाडी मार्गे सुमारे 25 किमी. अंतरावरील हा ऐतिहासिक ठेवा साहसी
पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
डेरवणची शिवशिल्पसृष्टी
किल्ले सिंधुदुर्गावरील भारत देशातील एकमेव छत्रपती शिवरायांचे मंदिर सोडल्यास
शिवाजी महाराजांचे भव्य शिव शिल्प मंदिर फक्त डेरवण येथेच आहे.
श्रीसंत सीताराम बुवा आत्माराम वालावलकर या पुण्य पुरूषाचे डेरवण गावात वास्तव्य
होते. ते मूळचे सावंतवाडी संस्थानातील तेर्से बांबर्डे गावचे पददलित दुर्बल घटकांच्या
समाजसेवच्या अखंड व्रतानिम्ात्त त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले. या थोर विभूतीचे
निर्वाण दि. 18 जानेवारी 1969 रोजी झाले. शिवरायांप्रती असलेली त्यांची आररभावना
व त्यांची स्मृती चिरस्थायी रहावी या हेतूने त्यांच्या निकटवर्तियांनी सद्गुरू
जोशी तथा दिगंबरदास महाराज यांचे मार्गदर्शनाखाली श्री संत सीतारामबुवा वालावलकर
चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. त्यामार्फत अनेक समाजोपयोगी कार्ये केली जातात.
समाजास आपले राष्ट्र वैभवशाली बनविण्याची स्फूर्ती केवळ दृश्यरूपातील शिवचित्र
अनूभूतीतूनच येईल. हा विचार सद्गुरू दिगंबरदास महाराजांनी प्रत्यक्ष उतरविण्यास
डेरवणची भूमी निवडली. दि. 5 मे 1981 रोजी श्री महाराजांनी शिवजयंतीच्या दिनी श्री
शिवसमर्थ मंदिराचे उद्घाटन केले. कै.गणेश दादा पाटकर आणि सहका-यांनी आपले पूर्ण
कौशल्य पणाला लावून तब्बल पंधरा वर्षे अथक मेहनतीतूनच श्री महाराजांनी शिवशिल्पसृष्टी
प्रत्यक्षात साकारली. श्रीशिवसमर्थगड महाराजांच्या संकल्पनेनुसार स्फुल्लिंग फुलवित प्रथम
स्थायी रूपात डेरवण भूमीवर उभा राहिला.
या गडात भव्य तटबंदीतून प्रवेश करतांना प्रथम सुसज्जतेने गस्त घालणारे मावळे स्वागतास
दुतर्फी सामोरे येतात. गडाच्या महादरवाज्यासमोर दोन हत्ती झुलत आहेत. महादरवाजाच्या
प्रवेशातच दिव्य शिव्ाशिल्प सृष्टी चित्त वेधून घेते. शिवचरित्रातील चित्तथरारक
प्रसंग घटना कलात्मकतेने साकारले आहेत. हया शिल्प सृष्टीत दाखविलेल्या-प्रसंग
निवडण्याचे कौशल्य मोठया जिकीरीने पार पाडले ते दिगंबरदास्ा महाराजांनी.
स्वराज्याची शपथ, अफझलखान वध, विशालगडावर तोफांचे चौघडे झडल्यानंतर धन्यहम म्हणून
प्राणार्पण करणारे स्वामीनिष्ठ बाजीप्रभू, धर्मराज्यावर चालून आलेल्या शाहिस्तेखानाची
शिवरायांनी बोटे तोडून्ा केलेली फजिती, समर्थ रामदास स्वामींनी आपल्या निसर्गसार्मथ्याने
केलेले शिवरायांचे गर्वहरण, कोंढाण्याची स्वराज्यातील उणीव दर्शविणा-या जिजामाता.
बालशिजींचा नामकरण सोहळा, रोहिडेश्वरी स्वरायाची प्रतिज्ञा घेणारे शिवबा, आई जगदंबेची
प्रार्थना करणारे शिवबा, स्वराज्याच्या राज्याभिषेग सोहळा, न हिंदू पतितोमेव म्हणून
धर्मांतरित नेताजी पालकरांचे शुध्दीकरण हे भावी पिढीस कृतीशूर करतील असेच क्षण
श्री माहराजांनी निवडले.
येथील शिवमंदिरात शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा आहे. कारण रणगांजीचा देवही रणशूर
रूपातच सामोरा आला पाहिजे. शिवप्रभूंचे हे रूप तेजस्वी आहे. शिवरायांनी संत मंडळी
वंदनीय होती. श्री समर्थ रामदास स्वामी, संतश्रेष्ठ तुकोबाराय, चिंचवडचे देव,
संत नामदेव महाराज तसेच हिंदूंना पवित्र अशी गोमाता यांच्या प्रतिमांमुळे गडाचे
वातावरण प्रसन्न व पवित्र झाले आहे. हि सर्व शिल्पे सिमेंटच्या माध्यमातून निर्मिली
आहेत. या शिवशिल्पसृष्टी दर्शनाने विश्ववंद्य भारतीय संस्कृतीची महती. जीवन नौकेस
अचूक दिशा ध्येय दर्शन, निरपेक्ष कर्मयोगाचा परमानंद साधण्यासाठी मानसिक बैठक
तयार होईल. अनेक इतिहासकारांनी मान्य केलेली शिवरायांची जयंती म्हणजे फाल्गुन
वद्य तृतीया याच दिवशी कै. दिगंबरदास महाराजांनी पाडलेल्या आदरणीय प्रथांचे आचरण
करून श्रीक्षेत्र डेरवण येथे शिस्तबध्द शिवजयंती उत्सव्ा साजरा होतो. पंचखंडात
तोड नाही अशी मातृवत परदारेषु संस्कृतीचे डेरवणच्या शिवशिल्प सुष्टीचे दर्शन जीवनात
अवश्य घ्यावे. चिपळूण डेरवण सावर्डमार्गे 19 किमी अंतरावर आहे.
दर्शनासंबंधी महत्वाची टीप :
या ठिकाणी भारतीय पोषाखातच दर्शनार्थ प्रवेश दिला जातो. कारण हे संस्कृती-संस्कार
केंद्र आहे. परिसराचे पावित्र्य व शिस्त टिकावी ही या मागची भावना आहे.
वीरगळ
वीरगळ म्हणजे शूरवीरांच्या स्मरणार्थ कोरलेले पाषाण. साधारणत: सन 1000 ते 1400
या काळात कोणी शूर माणूस, गावांचा प्रमुख/सरदार युध्दात मरण पावला तर त्याचे
स्मरणार्थ एक पाषाण कोरीत असत. हे पाषाण 3 ते 4 फुट उंचीचे असत. त्यावर 4 चित्रे
कोरलेली असत. पहिल्या चित्रात काही माणसे लढाई करीत आहेत असे दृश्य असते. दुस-या
चित्रात मरण पावलेल्या माणसाला पालखीतून नेत आहेत असे दृष्य असते. तस-या चित्रात
काही स्त्रिया नाचत आहेत. म्हणजेच हा मरण पावलेला वीर स्वर्गात गेला असून अप्सरा
नृत्य करीत आहेत, असा त्याचा अर्थ असतो. चौथ्या चित्रात हा पुरूष व त्याची पत्नी
शंकराची पूजा करीत आहेत, असे कोरलेले असते. याचा अर्थ हा पुरूष शेवटी कैलासाला
जातो, अशी संकल्पना असते. असे अनेक पाषाण खेडयातून मंदिराचे जवळपास आजही आढळतात.
याचा अर्थ त्या गावात सन 1000 ते 1400 चे दरम्यान मंदिराचे / गावाचे रक्षणासाठी
लढाई झाली होती व त्यात गावाचा प्रमुख / सरदार मरण पावला होता, असे समजण्यास
हरकत नाही. तालुक्यातील अनेक प्राचीन मंदिरांच्या परिसरात अशा वीरगळी आढळून
येतात.
गंडभेरूड
कर्नाटकातल्या विजयनगर, होळसर राजघराण्यात राजचिन्ह म्हणून वापरले जाणारे गंडभेरूड
(द्वीमुखी गरूडाच्या आकृतीला दिलेले मानवी रूप) परशुराम येथील माता रेणूका मंदिराच्या
खांबावर कोरलेले आहे. विदर्भातील गाविलगडावर मोठे गंडभेरूड आहे. पुराणातील नृसिंह
अवतार अहंकारी झाल्यानंतर त्याला गंडभेरूडाने उचलून नेल्याचे सांगितले जाते.
शरभ
पाच प्राण्यांच्या विविध अवयवांपासून बनलेला हा शुभ सूचक प्राणी आहे. याचे शिल्पही
परशुरामाच्या माता रेणूका मंदिराच्या खांबावर आहे.
रेणूकामंदिर, परशुराम (शिलालेख)
मदिराचे आत प्रवेश करताना माथ्यावर शिलेत एक लेख कोरण्यात आला असून, त्यावर सच्चितानंद
भृगूनंदन स्वरूप (सुरवातीची अक्षरे ओळखू येत नाहीत ) असा उल्लेख आहे.
कोल्हेखाजण गुंफा
चिपळूण शहरातून गुहागरला जाण्यासाठी नव्याने बनविण्यात आलेल्या पर्यायी बाय-पास
मार्गावरून प्रवास करताना महालक्ष्मी डोंगराच्या पायथ्यास कोल्हेखाजण येथे हया
गुंफा आहेत. गुंफात बौध्द भिंक्षुच्या उपासनेसाठी खोदलेला एक स्तूप आहे. तर
मध्यभागी उंचवटा असून इतिहासात तो दघोबा या नावाने नोंदविल्याचे मत इतिहास संशोधक
डॉ.द.वि.जोग यांनी मांडले आहे. शहराचे अस्तित्व किमान 2 हजार वषार्पूर्वीचे
असल्याचा हा पुरावा मानला जातो.
सन 1880 च्या जिल्हयाच्या गॅझेटमधील वर्णनानुसार हया गुंफा नसून दघोबा या बुध्द
विहाराची भव्य लेणी आहेत. पाण्याचे तळे असून साधारणत: 11 फूट व्यासाचे आहे. सध्या
येथे शिवालयाची स्थापना करण्यात आली आहे.
सात हातांचा अग्निदेव (दत्तमंदिर, खेर्डी )
पुराणानुसार अग्निदेव हा 2 मुखांचा 7 हातांचा व 3 पायांचा असतो. तर आपल्याकडे
अग्निच्या मध्यकालीन मूर्ती 2 व 4 हातांच्या मिळतात. असा उल्लेख भारतीय मूर्तीशास्त्र
या पुस्तकात आहे. या पार्श्वभूमीवर विचार करताना येथील 2 तोंड 3 पाय व 7 हात
असलेली अग्निदेवाची मूर्ती महत्चाची आहे. मूर्तीच्या हातात खड्ग, कमंडलू, शंख
ही आयुधे असून, खेर्डीतील हे दत्तमंदिर सन 1935 (शके 1857) मध्ये वैशाख शु.
3 रोजी कै. रामचंद्र कदम यांनी बांधले. ठाण्याचे संत पद्मनाभस्वामी यांच्या
शिष्यांनी ही मूर्ती स्थापित केली असावी असा अंदाज आहे.
कळंबस्ते गुंफा
शहरापासून सुमारे 3 किमी. अंतरावर कळंबस्ते गावाच्या भुवडवाडीत या गुंफा आहेत.
या गुंफा काळया कातळकडयाच्या डोंगराच्या कुशीत खोदल्या आहेत. या ऐतिहासिक गुंफा
बौध्दकालिन असाव्यात असा प्राथमिक तर्क आहे. डोंगरावर अरूंद पायवाटेने गेल्यास
यांचे समोर गेल्यानंतरच दर्शन होते.
गुंफा क्र 1 विशाल आकाराची मूर्ती असून तिचे सभागृह व त्यास दोन जोडलेल्या खोल्या
अशी रचना आहे. या गुंफेवर कृत्रिमपणे ताशीव कामाच्या स्पष्ट खुणा आढळतात. त्यामुळे
मानवनिर्मित असाव्यात यास पुष्टी मिळते. यातील सभागृहाची मोजमापे 12 बाय 12 फूट
लांब व रूंद सुमारे 7 फूट उंच.
गुंफा क्र 2 ही कातळकडयाच्या अगदी पायाला खेटून खोबणीवजा आकाराची आहे.
गुंफा क्र 3 प्रवेशद्वारापासून सूमारे 32 फूट आत लांब व सुमारे 12 फूट रूंद अंतर्गत
भागाची छताची उंची सुमारे 10 फूट या गुंफेच्या प्रवेशद्वारातच औदुंबर वृक्ष जणू
स्वागतास उभा आहे. पावसाळी मोसमात या ठिकाणी धबधबा कोसळतो.
बीवलीचे रामोळं
सन 1978 च्या सुमारास या मंदिरानजीक गुहा व भुयारं आढळली, त्यात जाते, नांगर,
आदि सापडलेल्या वस्तू प्राचीन मानवी वस्तीच्या पाऊलखुणांच्या साक्षीदार ठरतात.
बिवलीच्या विठ्ठल मदिरापासून नजीक शासकीय वन विभागाचे राखीव जंगल आहे. या परिसरात
प्राचीन भुयारे व गुहा आहेत. त्यांना स्थानिक भाषेत रामोळ म्हणतात. बिवली-केतकी
या गावास व परिसरास निसर्गाचा जणू वरदहस्तच लाभला असून येथे विविध वनस्पती व
वन्यजीवन संपदा समृध्द आहे. या परिसरात धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, वन,
साहसी आदि पर्यटन प्रकार बहरण्यास वाव आहे.
शिरवलीचा प्राचीन गुंफा समूह
शिरवली गावाच्या सहाणवाडी सडयावर प्राचीन भुयारांचा व गुंफांचा समूह असून त्यातील
बव्हंशी भूयारे ओहरलेली आहेत. गुढयाच्या गढीपासून येथपर्यत सुमारे 8 किमी. अंतराच्या
लांबीचे भुयार असल्याच्ो जाणकार सांगतात, शिरवली, गुढे, डुगवे, पाथर्डी, उमरोली
पंचक्रोशीस एक वेगळाच ऐतिहासिक वारसा लाभल्याचे भुयारे-गुहा हा गढी मूक साक्षीदार
आहेत. येथे अनेक प्राचिन शिल्प समूह उत्खननाद्वारे उजेडात येऊ शकतात. या अमूल्य
वारश्याचे सुनियोजितपणे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे.
गुढे येथील वैशिष्टयपूर्ण नंदी
गुढे येथील प्राचीन श्रीशिव वामनेश्वर मंदिरातील नंदीची मूर्ती वैशिष्टयपूर्ण
आहे. नंदीच्या मूर्तीचे शिंगामधील फरकाद्वारे विशिष्ट संकेत व्यक्त होत असल्याचा
तर्क असून एक शिंग दुस-यापेक्षा थोडे खाली आहे. नंदी हा शिलाधर ऋषींचा मुलगा
शेत नांगरत असताना त्यांना मिळाला. नंदीने शंकराची आराधना केली व त्याला प्रसन्न
करून घेतले. शंकरांनी त्याला आपले वाहन बनविले तुलनेने शंकरांच्या ठायी नंदीचे
स्थान अधिक महत्वाचे आहे. शंकरांच्या विविध मंदिरांमध्ये असलेल्या नंदीच्या
मूर्तीचा अभ्यास करता ही मूर्ती वाकलेल्या एका शिंगामुळे वैशिष्टयपूर्ण ठरली
आहे.
|