| प्रस्तावना
महाराष्ट्रातील मराठयांचे रहाते वाडे हा एक वैशिष्टयपूर्ण वास्तू प्रकार मानला
जातो. पेशवाई अखेरपर्यंतच्या एकूणच मराठा शाहीच्या कालखंडामध्ये महाराष्टात ब-याच
ठिकाणी वैशभशाली राजवाडयाची निर्मिती झाली. सामान्य जनांच्या वास्तूही याच नमुन्यावर
अथवा पारंपारिक गरजेनुसार बांधल्या गेल्याचे दिसते. हे वाडे पर्यटन विषयात आजही
जुना इतिहास नव्याने मांडू शकतात.
कुटरे येथील राजेशिर्के यांचा थोरला वाडा
राजेशिर्के घराण्याने कुटरे येथे प्रथम राजवाडा बांधला. त्यानंतर ते स्वतंत्र झाले.
त्यांचा मूळवाडा हाच असल्याने यास yथोरला वाडाz असे म्हणतात. सध्याच्या चिपळूण तालुक्यातील
शिवपूर्ण काळात कोकणात्ाील कुटरे या गावी राजेशिर्के राजघराणे प्रथम आले. गावातील
खालची पेठमधील गणेशवाडीत आजही या घराण्याची शौर्यसाक्ष मूकपणे देत आहे.
हा चौपाखी जुना वाडा काका राजे यांचा होता. या पुरातन वाडयात सद्यस्थितीत राजेशिर्के
यांचे वंशज नांदत आहेत. येथे नवसाला पावणा-या श्री देवी सुकाई देवीची पूजाअर्चा
दैनंदिन होते. या राजवाडयाचे भग्नावशेष आजही शौर्यगाथा सांगण्यास तग धरून आहेत.
येथे राजेशिर्के घराण्यांच्या पूर्वजांच्या पराक्रम गाजविणा-या काही साक्षीदार वस्तू
वंशजांच्या संग्रही आहेत.
डेरवण येथील राजेशिर्के यांचा राजवाडा
डेरवण या गावी सद्यस्थितीतील शिवशिल्पसृष्टी शिव समर्थ गडापासून सुमारे 1.5 किमी.
अंतरावर हा राजवाडा इतिहासप्रेमी पर्यटकांचे स्वागतास उभा आहे. येथे आजही राजेशिर्के
यांचे वंशज नांदत आहेत. श्रीमंत ईनामदार बाबासाहेब राजेशिर्के यांनी सुमारे
1840 ते 50 च्या सुमारास या दुमजली राजवाडयाची उभारणी केली.
सद्यस्थितीत सुमारे 7 हजार चौरस फुट इतक्या भूक्षेत्रावर निवासी वास्तू उभी आहे.
राजवाडयाच्या पायाच्या जोत्यांमध्ये शिशाचा रस ओतून तद्नंतर पुढील बांधकाम केले
गेले. पायाच्या बांधकामात काळया प्ााषाणाच्या अखंड तोडी वापरल्या आहेत. तर भिंत
बांधकामात दगड, विटा, गूळ, चुनखडी व अंडयाचा बलक यांचे मिश्रण वापरले आहे. राजवाडयाच्या
छतावर पूर्वी नळयाची कौले होती. सद्यस्थितीत साधे कौलारू छप्पर आहे. तसेच या चौसोपी
राजवाडा बांधकामात फणस व सागवाणी लाकडाचा वापर केला आहे. राजवाडयाचे मुख्य प्रवेशद्वार
पूर्वाभिमूख असून प्रवेश करताच सदर सभागृह लागते. सदरे लगतच माजघर असून त्यास
जोडून बाळंतिणीची खोली आहे. पश्चिमेस तुळशी वृंदावनाची व विहीरीची रचना राजस्त्रियांसाठी
केली आहे. राजवाडयासमोरील विहीरीचा वापर पुरूषमंडळींना करण्याचे प्रयोजन होते.
सदरेच्या वरच्या मजल्यावर जुळा दिवाणखाना व अंतर्गत बाजूस शयनकक्ष आहे. दिवाणखान्यासमोर
दर्शनी भागात लांबलचक सज्जा (गॅलरी) आहे.
राजवाडयात पूर्वजांच्या पराक्रमाच्या स्मृती त्यांच्या वापरातील काही ऐतिहासिक
वस्तू कायम जोपासून ठेवल्या आहेत. महापराक्रमी राजघराण्यातील राजवाडयातील वंशज
पर्यटकांसमोर आदरतिथ्याने ऐतिहासिक गाथा उलगडतात. शिर्केवाडयापासून सुमारे 2 किमी.
अंतरावर राजेशिर्केवाडी येथे निसर्गरम्य वातावरणात धरण आहे. मुंबई गोवा महामार्गावर
डेरवण फाटा येथून 4किमी. अंतरावर तर शिवसमर्थगडापासून डेरवणचा राजवाडा सुमारे
1.5 किमी अंतरावर आहे.
|