| प्रस्तावना
संपूर्ण जगासह आपल्या देशात एक काळ असा होता की, त्यावेळी फक्त उन्हाळा आणि हिवाळा
हे दोनच ऋतू सहलींसाठी महत्वपूर्ण मानले जायचे. मात्र आता काळ बदलला आहे. या ऋतूंबरोबरच
पावसाळयातील निस्ार्ग सौदर्याचा आस्वाद घेण्यासाठी, धबधब्यात चिंब भिजण्याचा अनुभव
अनुभवण्यासाठी आज प्रचंड प्रमाणात वर्षासहलींचे आयोजन केले जात आहे. या आयोजनात
महत्वाची भूमिका बजावू शकतील असे चिपळूणातील काही धबधबे.
सवतसडा धबधबा
पावसाळी हंगामात परशुराम घाट रस्त्याच्या अंतर्गत घळईत घाट चढतांना उजवीकडे कोसळणा-या
जलप्रपातास सवतसडा धबधबा असे म्हणतात. विशेषत: रौद्ररूप धारण करूण पावसाळयात कोसळणा-या
या पांढ-याशुभ्र धबधब्याचे दर्शन चित्ताकर्षक ठरते. पावसाळी ऋतूत धबधब्याचा परिसर
हिरवाईने नटलेला असतो.
चिपळूणपासून सुमारे 5 किमी. अंतरावर हा धबधबा आहे.
या धबधब्याच्या माथ्याकडील भाग बाहयवक्र (ओव्हर हँग) प्रकारचा आहे. त्यामुळे धबधब्याच्या
वेगवान जलधारा डोंगर कडयापासून काही अंतरावर कोसळतात. उंचीवरून कोसळणा-या जलधारांच्या
प्रभावामुळे त्याच्या पायथ्याशी डोहासारखा खड्डा तयार झाला आहे. पावसाळयात जेथे
जलविहारासाठी पर्यटकांची खूप गर्दी होते.
धबधब्याशी संलग्न आख्यायिका अशी की, या परिसरातील निवासीनी नावडती स्त्री व आवती
स्त्री या दोघींचे एकमेंकाशी सवतीचे नाते होते. एकदा आवडती स्त्री नावडत्या स्त्रीला
म्हणाली तुझी मी आज वेणी-फणी करते. अचाणकपणे उफाळूण आलेल्या या प्रेमभावनेविषयी
नावडतीला आवडतीची शंका आली. प्रत्यक्ष वेणी-फणी घालण्यासाठी त्या कडयावर बसल्या.
त्यावेळी नावडतीने स्वत:च्यापदराची गाठ आवडतीच्या पदराला बांधली. वेणी-फणी आटोपल्यावर
आवडतीने नावडतीला धक्का देऊन कडयावरून ढकलले. परंतू बांधलेल्या गाठीमुळे नावडतीसह
आवडतीही कडयावरून खाली कोसळली गेली. तेव्हापासून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या
ठिकाणास सवतसडा असे नाव पडले.
वीर-देवपाटचा बारमाही धबधबा
देवपाट हा बारमाही धबधबा वीर गावाच्या अरण्यमय डोंगर कपारीतून कोसळत असतो. हा
धबधबा दोन टप्प्यांमध्ये काळया कातळकडयांतून प्रवाहित आहे. या धबधब्याच्या वरच्या
भागाच्या टप्प्याची उंची सुमारे 50 फुट आहे. तर त्याखालील भागाच्या टप्प्याची
उंची सुमारे 100 फुट आहे. दोन्ही टप्प्यांच्या तळास जलप्रवाहाच्या जोरदार मा-यामुळे
डोह तयार झाले आहेत. हे डोह जलक्रिडेसाठी सुरक्षित आहेत. देवपाट नदीचा उगम संगमेश्वर
तालुक्यातील पुर्ये व कळंबुशी या दोन गावांच्या हद्दीवरील डोंगर कपारीत आहे.
देवपाट धबधब्यापर्यंत अरण्यमय पाऊलवाट आहेत. निसर्गाचा आस्वाद घेत पायी प्रवास
केव्हा संपतो ते समजत नाही.
रानपाट नदीचा उगम संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे गावाच्या डोंगर कपारीत आहे. वीर
गावातून रानपाट रस्तामार्गे हा धबधबा सुमारे 2 किमी. अंतरावर आहे. रानपाट येथे
धबधबा आहे. देवपाट व रानपाट या नद्यांचा संगम फणशीची गोठण येथे झाला आहे.
अडरेतील धबधबा
चिपळूण शहराच्या पूर्वेला 13 किमी अंतरावर हे सृष्टीसौदर्य आहे. हा धबधबा मानव
निर्मित असलातरी त्याचे स्वरूप नैसर्गिक आहे. अडरे व अनारी गावच्या सीमेवर महाराष्ट्र
शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाच्यावतीने पाझर तलाव बांधण्यात आला. त्याची लांबी
500 फुट व रूंदी 200 फुट एवढी विस्तीर्ण आहे. या तलावाच्या बाजूने नदीकडे पाणी
सोडयात येते. ते खूप उंचावरून व मोठमोठया शिळांवरून नैसर्गिक उंचवटयांवरून वाहणारे
हे पाणी नैसर्गिक धबधब्याप्रमाणे आपले वेगळेपण जपत आहे. भरपूर पाण्यामुळे पहिल्या
भिंतीवरून पडणारे पाणी पुढे धबधब्यावर आल्यावर अत्यंत देखणे दृश्य पहायला मिळते.
दोन्ही ब्ााजूलाविशाल डोंगर व मध्ये धरणाची भिंत आणि एका बाजूला खळखळणारा धबधबा
पाहताना मन हरपून जाते. गु-हाख्यांनी चरायला आणलेल्या गाई-म्हशी, आजूबाजूला
जंगलात गुराख्यांच्या वाजणा-या मंद बासरीचा सूर आणि घनदाट जंगलातून पक्षांच्या
किलबिलाट मध्येच एखादया कोकीळेचा मंजूळ गाण्याचा स्वर येथे येणा-याला पकडून
ठेवतो.
कुंभार्ली घाटमाथ्यावरील धबधबा
कोकण व घाट यांना जोडणा-या कुंभार्ली घाटाचा परिसर ओलांडल्यानंतर लगेचच डाव्या
हातास एक सुंदर बैठा जलप्रवाह आपले लक्ष वेधून घेतो. फेसाळणा-या या धबधब्यात
डुंबण्यासाठी शेकडो पर्यटक गर्दी करतात. निसर्गरम्य कोयनानगर परिसरात ओझार्डे
हा आणखी एक धबधबा आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू
उद्यान या धबधब्याजवळ उभारण्यात आले होते. येथील पंचधारा मूकूट नेहरूंच्या पंचशील
तत्वांची जाणीव करून देतो. अलोरेतून नवजा घाटमार्गे अथवा कोयनेहून नेहरू उद्यानासमोरील
रस्त्यावरून धबधब्याकडे जाता येते. सहयाद्री पर्वतरांगेतील हा प्रचंड मोठा धबधबा
असून 200 फुट उंचीवरून कोसळतो.
|