साहसी पर्यटन
 

प्रस्तावना

अलिकडच्या काळात ही हटके संकल्पना आकारात आली आहे. डोंगरभटक्यांची फिरस्ती फार वर्षापासूनच सुरू आहे. पण त्याला पर्यटनाचा आधार देण्याचा प्रयत्न या संकल्पेने केला. पक्षी निरीक्षण, अभयारण्य व जंगलभ्रमंती, गडदुर्ग दर्शन, खगोलशास्त्रीय सहल, ट्रेकिंग आदि प्रकारांचा समावेश करून काही भ्रमंतीसाठी महत्वाची ठिकाणे येथे दिली आहेत. व्यक्तिमत्व विकास, निसर्गाशी जवळीक, मानसिक जडणघडण, शारिरीक तंदुरूस्ती आदि हेतू यातून निश्चित साध्य होण्यास मदत होते. छत्रपती शिवरायांचे स्वराज्यनितीतील सहयाद्री पर्वतातील किल्ले हे महान शस्त्र होते. किल्ले पर्यटन संल्पनेत निसर्ग, पर्याटन, वन, साहसी व ऐतिहासिक आदि पर्यटन प्रकारांचा सुरेख मिलाप होतो असा हा किल्ले पर्यटन साहसी पर्यटनाचाच भाग आहे. ऐतिहासिक काळात किल्ले हे राजसत्तेचं ऐ मुख्य अधिष्ठांत होत. भारतीय युध्द शास्त्रात या किल्ल्यांच महत्व प्राचीन काळापासून आहे. किल्ल्याच्या मदतीने एक सशस्त्र माणूस शंभर योद्यांशी सहज लढू शकतो, याची मूर्तीमंत साक्ष देणारी निसर्गरचना म्हणजे किल्ला. अशाच काही चिपळूण परिसरातील किल्ल्यांची व साहसी पर्यटनस्थळांची माहिती देत आहोत.

वासोटा ऊर्फ व्याघ्रगड ( मार्गे नागेश्वर गुंफा )


किल्ला वासोटा हा पर्वतीय वनदुर्ग या प्रकारातील किल्ला आहे. कोकणात (चिपळूण) उतरणा-या तिवरे घाटावर पहारा करणारा वासोटा उर्फ व्याघ्रगड 1200 मी.उंचीवरील जावळी अरण्यातील प्रमुख किल्ला शिर्के राज्ावटींच्या काळात लष्करी ठाणे म्हणून वाररात होता. गडावर दुर्गाची अधिष्ठात्री देवता म्हणून वाघजाई देवीचे मंदिर आहे.

इ.स. 1178-1193 दरम्याम कोल्हापूरच्या शिलाहार राजधानी घराण्यातील द्वितीय भोज याने हा किल्ला बांधल्याचा कयास आहे. किल्ल्यावर सध्या पडझड झालेल्या इमारती व दरवाजे आढळतात. गिर्यारोहक व साहसी प्ार्यटकांची पंढरी म्हणून चिपळूणच्या पूर्वेस वसलेल्या वसोटयाचा उल्लेख केला जातो. चिपळूण धामनंद-चोरणे या गावी 30 किमी. अंतरावर बसने येता येते. चोरवणेतून नंदी ओलांडून वासोटयाकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. सुमारे 1.5 तास खडी चढाई संपल्यानंतर नागमोडी वाटेतून 1 तास पायपीट केल्यानंतर काळेकभिन्न कातळ कडे दिसतात. स्थानिकांनी खडक तासून तेथे मार्ग तयार केला आहे तढण स्ांपल्यानंतर येथील जागृत देवस्थान श्री देव नागेश्वर गुंफा मंदिर दृष्टीस पडते. येथील स्वयंभू शिवपिंडीवर होणारा बारामाहि नैसर्गिक जलाभिषेक पर्याटकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरला आहे. या शिवपडावर विडा धरुन मनोवांच्छित संकल्प केला असता जलाभिषेक विडयावर झााल्यास मनोकामना पूर्ण होते अशी श्रध्दा आहे. गुहेच्या समोर सरळ तुटलेला कडा व अक्राळ विक्राळ जबडा पसरलेली सुमारे 1500 फूट खोल दरी साहसी पर्यटनाचा अर्थ समजावून सांगते. इ.स. 1659 दरम्यान इंग्रजांची राजापूर येथील वखार लुटल्यानंतर संभाजी राजांनी या वखारीत रेव्हिंग्टन व त्याच्या इतर 6 व्यापा-यांना वासोटयावर कैद करुन ठेवले होते.

येथूनच सहयगिरीच्या डोंगरधारेवर वासोटयाकडे जाणारी अरण्यमय पाऊलवाट आहे. पाऊलवाटेवरुन काही अंतर चालल्यानंतर वृंदावन नावाचे उंच शिखर लागते. याचे डाव्या बंगाने जाणारा मार्ग गहन अरण्यातून जातो. विविध प्रकारचे वन्यजीवन दृष्टोपथास येते. अतिप्राचीन उंचाले वृक्ष, वड, पिंपळ, पावरी,जांभूळ,बांबू,करवंदी, जंगली जायफळ, तूस,फणस,सोयटी,कुंभा आदि वनस्पती आढळतात. तसेच या अरण्यात इंडियन रॉबिन घार, कोकळ,रानकोंबडा विविध प्रकारच्या चिमण्या तुडतुडया,मैना आदि पक्षी जगत तसेच सांबर,चितळ, बिबटया,अस्वल,गवा, भेकर,तरस,आदि चतु:ष्पाद जगत पहाडी पाल, देवखार,अजगर विविध सरपटणारे प्राणी घेरपड, विंचू, लाल काळया मुंग्या,मधमाशा आदि वन्यजीवनांचा आढळ आहे. या जंगलातून थोडे पुढे गेल्यावर चार वाटा एकत्र आल्याची जागा (चौक) लागते. सरळ समोर जाणारा माग्र्ा मालवदेय कडे, तर उजवीकडील मार्ग वासोटयाकडे, तर डावीकडील मार्ग मेट इंदवलीमार्गे शिवसागर जलाशयाकडे जातो. मेट इंदवलीला जाण्यास साधारणपणे अर्धा तास लागतो. तेथून नौका विहाराने बामणेली-कास तलावामार्गे साता-याकडे जाता येते. वासोटयाकडे जाणा-या मार्गाने थोडे चालल्यानंतर करवीरच्या खुरटया जगलातून सुमारे 100 मिटर अंतरावर वासोटा दृष्टीस पडतो. सूर्य मावळतीसमयी आपण येथे असल्यास येथील उंच कडा वेगळाच भासतो. याचे डाव्या बाजूस असलेल्या ताई तेलीणीच्या किल्ल्यामधील (जुना वसोटा) सायंकाळच्या सूर्य किरणांनी झळाळलेली अरुंद दरी पाहण्यास आनंद अवर्णनीय.

वासोटयावर ढासळलेल्या बुरुजातूनच प्रवेश होतो. माथ्याचे डाव्या हातास डाव्या हाताची वाट बांधीव जुळया तलावाकडे जाते. समोरची वाट भग्न हनुमान व शिवमंदिराकडे तर उजवीकडील वाट वासोटयाच्या माचीकडे जाते. या माचीकडे जाताना कमी उंचीचा काळया दगडांनी बांधलेला दरवाजा लागतो. या स्थानास काळकाईचे ठाणे असे संबोधतात. येष्थून पश्चिमेकडे चिपळूनची औद्योगिक वसाहत,चोरवणे, शिंदेवाडी, सापिर्ली, उख़्ैंरेकडे वृंदावन शिखर व नागेश्वर गुंफा मंदिर, पूर्वेकडे गर्द जंगल व शिवसागराचा गंभीर जलाशय दृष्टीस पडतो. काळकाईच्या ठाण्याच्या मार्गाने परतीच्या मागार्च्या उजव्या हातास जांभा दगडाने बांधलेले विश्वमंदिर आहे. मंदिर छोटे असले तरी मुमटयाच्या प्रत्येक दगडाच्या सांध्यातून शिवपिंडीवर पावसाळयात जलाभिषेक होतो. त्याचे थोडे अंतरावर हनुमान मंदिर आहे. यावर छप्पर नाही. मूर्ती विशाल आकाराची आहे. मूर्तीच्या डाव्या हातास तलाव आहे. मंदिराचे पुढे उजव्या हाताला चूना व मळण्याचा काळया पाषाणातील घाण्याची पेड दिसते. घाण्याचे पेड व नजीकचे दोन भागात विभागलेला चिरेंबंदी तलाव वैशिष्ठयपूर्ण आहे. तळामागे पश्चिमेला वासोटयाचा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यावर पुरातन वाडयांची जोती, चौथरे आहिेत. तलावाच्या पूर्वेस दाट अरण्यातून चढर्द केल्यानंतर जुना वासोटा व नवा वासोटा यामधील सुमारे 1500 फुट उंचीचा कोकणकडा खुणवतो. हयालाच बाबूखाड किंवा बाबू कडा असे संबोधतात.

टीप ~ किल्ले वासोब हा शसासकीय वन विभागाच्या कोयना अभयारण्य क्षेत्राच्या अखत्यारित असल्याने तत्संबंधी पूर्व परवानगी अत्यावश्यक आहे.

गुढेतीन पवार संस्थानिकांची गढी


चिपळणून शहाराच्या पश्चिमेस पुढे येथे पवार संस्थानिकांची भुईकोट किल्लेवजा गढी आहे. ही गढी गावची गा्रमदेवता श्रीवाघजाई देवस्थान व देवराई परिसरानजीक कापशी नदी किनारा आहे. गर्द वनराई परिसरात वन्यजीवनांचा वावर असून, वातावरण आल्हादायक आहे.

गढीवर जाण्यास दोन मार्ग म्हणजेच पाऊनवाटा आहेत. त्यापैकी एक मार्ग नदी किना-यावरुन जाम असून, दुसरा मार्ग सुमारे 30 फुट उंच मुरमाड मातीचा, अत्यंत निसरडा, थरारक कडा मार्गावरुन गिर्यारोहणाचे तंत्र वापरुन चढाईचा आहे. गढीला 6 बुरुंज असून, गढी पूर्णत- उपेक्षित असल्याने दुरावस्थेत आहे. झाडाझुडपांनी व्यापून झाकली गेली आहेत. गढीची सध्याची पायथ्यापासून माथ्यापर्यन्तची उंची सुमारे 50 ते 60 फूट भरते. गबढीला नदी किना-यालगतच ताशीव तटबंदी असून, भग्नावशेष इतरत्र विखुरलेले आहेत. गढीच्या तटबंदी व बुरुंजांचे भग्नावशेष, पूर्वेस तीवग्र उतार, कापशी नदीचे पात्र दक्षिणेस टेहळणी बुरुंंज,बालेकिल्ल्यावर तोफांसाठी मारगिरीच्या जागा, तोफा स्थानापन्न करण्यासाठी चिरेबंदी पाषाणाचे जांभा (दगड) वैशिष्टयपूर्ण बांधकाम, हत्ती बांधण्याच्या साखळदंडाचे अवशेष हे सर्व दृष्टीपथास य्ोते. गढी पूर्णत-खचलेली असून मानवी वावर अजिबात नसल्याने दुरावस्थेेने परिसीमा गाडली आहे. चिपळूण पासून हे ठिकाण सुमारे 40 कि मी. अंतरावर आहे. गढी परिसरावर तत्कालीन पवार संस्थानिकांची सत्ता होती म्हणून यास पवारांची गढी संबोधतात. या गढी विषयी निश्चित छोसपणे माहिती उपलब्ध नाहृ. किल्ल्यांप्रमाणेच मराठी समाजाचा गढी हा एक वैशिष्टयपूर्ण वास्तू प्रकार आहे. सभोवार तटबंदी असणारे खाजगी निवास्थान असे या विषयी थोडक्यात म्हणता येईल. मराठी सरदारांचे प्रासादतूल्य निवासस्थानांच्या शेजारी संरक्षणाच्या हेतूने तबची उभारणी केलेली रचना म्हणजे गढी होय. महाराष्ट्रात पूर्वी पासून या गढयांची रचना अस्थ्तित्वात होती. तालुक्यात सध्या तरी या एकाच गढीचे अवशेष पहावयास मिळतात.

तळसरचा किल्ला एक टेहळणी बुरुज


चिपळूण तालुक्याच्या पूर्वेस मुंढे-तळसर गावानजीक हा गढीवजा डोंगरीदुर्ग आहे. सहयाद्रीच्या उत्तुंग पर्वत रांगांमध्ये हा किल्ला वसला आहे.

सद्यस्थितीत हा किल्ल्याचा परिसर पूर्ण उपेक्षित राहिल्याने दुरावस्थेत आहे. घनदाट अरण्याने व्यापलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे 1800 फुट इतकी आहे. या किल्ल्याची निश्चीत अशी माहिती उपलब्ध नाही. या किल्ल्यावरील भुयारात पेंढा (भाताचे वाळलेले गवत) टाकल्यास मुंढे गावाच्या नदीच्या डोहात वर येतो. व किल्ल्याचा उपयोग इतिहास काळात पश्चितघाट व कोकण यामधील एक टेहाळणी नाके म्हण्ाून होत असावा.

तळसर गावातून या किल्ल्यामार्गे दुर्गवाडीत जाण्यास प्राचीन पाऊलवाट आहे. यापाऊलवाटे दरम्यान भैरवगडाकडे जाताना सहयगिरीच्या उंच शिखर सपाटीवर घोडयाची पागा, विहीर यांचे भग्नावस्थेत घनदाट अरण्यात झाकोळले गेल्याने ते जणू दाट अंध:कारात बुडालेल्या इतिहासावर नवप्रभा पडण्याच्या प्रतिक्षेत आहेत. येथील जंगलात असलेल्या अस्वलांच्या प्राबल्यामुळे त्यास {अस्वलांचे जंगल| असे म्हणतात. येथील वनविहासाठी शासकीय वनविभागाची पूर्ण परवानणी घेणे आवश्यक आहे.

किल्ले भैरवगड


किल्ले भैरवगड हा पर्वतीय वनदुर्ग प्रकारात मोडतो. ग्रॅण्ट डफ याचे मतानुसार पन्हाळयाच्या राजांनी बांधलेल्या या किल्ल्याचे क्षेत्र 2.1 हेक्टर इतके आहे. येथील भैरवाच्या देवालयामूळे किल्ल्याला भैरवगड हे नाव प्राप्त झाले येथील भैरवाची मूर्ती रेखीव आहे.

किल्ले भैरवगड चिपळूण तालुक्याच्या हद्दीवर असून जाणेसाठी पाथ-मंजोत्रीमार्गे हेळवाक-रामघळ-वाघणे या गावातून जातो. या गडास किल्ले बरिरवगड असेही म्हणतात. रामघळीतून भैरवाकडे जाताना मोठे उघडे बोडके पठार नजरेस पडते. पठारावरून पुढे चालताना जंगलाची उंची व दाटी वाढत जाते. 2 तास चालल्यानंतर अदमासे 500 फुट उतल्यानंतर वाघणे गाव लागते. येथे भग्न चौथ-याची अर्धवट बांधलेल्ाी विहीर व विशाल आकाराचे तुळशी वृंदावन आहे. त्याचे पुढे एक गुरांचा वाडा आहे. या पाऊलवाटेवरून रानकोंबडी, कोळशिंदे, व गवे, देवखार आदि वन्यप्राणी नजरेस पडण्याची शक्यता असते. मुख्य गडावर जाण्याचा मार्ग तीव्र चढाईचा आहे. वाघणे गाव सोडल्यास गडापर्यंत पोहोचेपर्यत पाण्याची व्यवस्था नाही. हेळवाक ते किल्ले भैरवगड पायी प्रवास सुमारे 6 तासांचा आहे. गड परिसरात खाटी जांभूळ, अळू, औदुंबर, मदन, पानफुटी, निर्गुडी, कारवी अदिंचा आढळ आहे. या गडावररून किल्ले भवानीगड व प्रचितगड येथे जाता येते. भैरवगड हा गिरीदुर्ग आहे याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 3400 फुट इतकी आहे. भैरवगड हा भैरव मंदिर देवस्थान परिसर व प्रत्यक्ष भैरवगड या दोन भौगोलिक रचनेत विसावला आहे. भैरवमंदिर समोरील भैरवगड बालकिल्ला हा मंदिराच्या डोंगरापेक्षा सुमारे 200 फुट उंच आहे. गडाचे महादरवाजाचे भग्नावशेष, विशाल आकाराचे भग्न बुरूज व सभोवती तटबंदी गूळरचना मिश्रणाच्या जात्याचे 1 पेड,काळया पाषाणाची भग्न डोण, वाडयाचे व राहुटयांचे चौथरे आदि अवशेष दिसतात. गडाच्या कोकणाकडील बाजूस पाते, वळवट, मंजोत्री, दुर्गवाडी, देशपांडेवाडी, पाचांबे, कुचंबे ही गावे तर पश्चिम घाटाकडील बाजूस पाथर पुंज, मळे, पाने ही गावे वसली आहेत.

इ.स. 14 व्या शतकात पन्हाळगड ताब्यातून गेल्यानंतर इ.स. 1768 पर्यंत शिरकाणाची (शिर्के) राजधाणी भैरवगड होती. त्याचवेळी तेथे श्री शिरकाई देवी स्थापना झालेली आहे. मात्र आज या बाबतची पुरेशी माहिती अथवा तत्सम पुरवा उपलब्ध नाही. जंगली जयगडापासून भैरवगड दक्षिणेस अंदाजे 16 किमी. अंतरावर आहे. त्यापुढे 11 किमी. वर प्रचितगड आहे. 23 मे 1818 रोजी भैरवगड इंग्रजांचे ताब्यात न लढता गेला. मुक्कामाची योग्य सोय किल्ल्यावर भैरव मंदिरात असून चैत्र वद्य प्रतिपदेला येथे यात्रा भरते. भैरवमंदिराचे खालच्या बाजूकडील दरीत पाय-या उतरून गेल्यानंतर घळईत पिण्याच्या पाण्याचे बारमाही टाके आहे. चिपळूणकडून येण्यास या गावात येण्यास बारमाही एस.टी.बसची योग्य सोय आहे. दुर्गवाडीतून पाते गावी जाऊन सुमारे 2 तासात गडावर पोहोचता येते. गड एका स्वतंत्र टेकडीवर आहे. गडाच्या तीन दिशांना सरळसोट कडे आहेत गडाकडे जाताना भग्नावस्थेत दोन दरवाजे दिसतात. बाजूला एक पाण्याचे टाके आहे. यात उतरण्यास कडयाच्या बाजूने पाय-या आहेत. पाय-यांचे महत्व कळून येत नाही. शेजारीच कातळाला एक मोठे छिद्र पाडलेले आहे. तेथील पाणी बहुधा घोडयांसाठी असावे येथील शितल जलाचा बारमाही साठा आहे. मंदिरापेक्षा गडाची उंची थोडी अधिक आहे. रात्रभर जोरदार वारे वहात असतात. भैरव मंदिराचे प्रांगणात तुळशीचे वृंदावन व शिवमंदिर असून शिवप्रेमींनी शिवरायांच्या भातूच्या पुतळयाची स्थापना एका शिळेवर केली आहे. चिपळूणकडून 32 किमी. अंतरावर दुर्गेवाडी आहे. दुर्गेवाडीतून पातेमार्गे डोंगर सोंडेवरून डाव्या दिशेने सरळ पाऊलवाटेने मार्गक्रमण केल्यास गडावर पोहोचता येते. दुसरा मार्ग पाटण तालुक्यातील हेळवाक मार्गे पूर्णत: वाहन रस्ता थेट भैरव मंदिरा पर्यंत जातो.

टीप :- किल्ले भैरवगड हा शासनाच्या वन विभागाअंतर्गत चांदोली अभयारण्य प्रकल्प अखत्यारित असल्याने तत्संबंधी पूर्व परवानगी अत्यावश्यक आहे.

किल्ले तिवरेगड


रत्नागिरी व सातारा जिल्हयाच्या सरहद्दीवर दसपटीतील सहयाद्रीच्या कुशीत तिवरे ता. चिपळून गावाच्या डोंगर रांगेत चिपळूणपासून सुमारे 25 किमी. अंतरावर किल्ले तिवरेगड आहे. सहयाद्रीच्या या रांगेत उंच टेबलासारख्या दिसणारा पठारवजा डोंगर म्हणजेच तिवरेगड. तिवरे गावातून तिवरेवाडी मार्गे {बैलमारव| घाटातून या गडाकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. घाट संपल्यानंतर पूर्वी उजव्या बाजूने पाल घाटातून पाली गावाकडे जाण्यासाठी पाऊलवाट आहे. तिवरेगडावर पोहोचता येते. गडावर देविची छोटी मूर्ती व चौथ-याचे भग्नावशेष दिसतात. गडावर जाण्यासाठी एकदिशा मार्ग निवडुंगाच्या साक्षीने पार करावा लागतो.

गड माथ्यावरून पूर्वेकडे पसरलेला शिवसागर (कोयना ) जलाशय, पश्चिमेकडील चिपळूण शहर, व परिसरीतील औद्योगिक वसाहतीचे विहंगमय दृश्य नजरेस पडते. गडाचे उत्तरेकडे मालदेव उठारासह सदयाद्री रांगेतील वासोटा, महिमंडणगड, परबत, चकदेव, मधु-मकरंदगड, रसाळ-सुमार-महिपतगड आदि दुर्गशृंखलांचे दर्शन घडते. तिवरे घाट पुरातन काळापासून प्रसिध्द असून देशावरून लमाणांचे तांडे या वाटेने कोकणात येत असत. बैलमारव घाट हा कोकण व पश्चिमघाट यांना जोडणारा महत्वाचा दुवा होता. याचमार्गे बैलांच्या पाठीवर माल लादून त्याची ने-आण चाले. म्हणून यावरून त्यास बैलमारव घाट अस्ो नाव पडले होते.

देवसरी


तिवरे गावातून सुमारे 1300 फूट उंचीवर सहयाद्रीगिरीत ऊर्ध्व बाजूकडून पायाकडे निमुळता होत गेलेला सुमारे 22 फुट उंचीचा विशाल प्रशस्त खंड आहे. याचे शेजारी पाऊलमार्गास देवसरी असे म्हणतात.

मालदेव


चिपळूण तालुक्याच्या सहयाद्री रांगेत अरण्या सहवासासाठी उत्तम ठिकाण म्हणून साहसवीरामध्ये मालदेव हे ठिकाण अधिक प्रिय असून साहसी पर्यटनास खुणावत आहे. मालदेवला एक पुरातन जांभ्या दगडांची बांधीव चौकोनी विहीर असून आत उतरण्यास रूंद पाय-या आहेत. मालदेवच्या मुख्य मंदिरात चार कोनाडयाचे छप्पर असून भैरव व देवी अशा मूर्ती आहेत. मंदिराच्या सभोवती सुमारे 5 फुट उंचीची संरक्षक भिंत आहे. प्रदक्षिणा मार्ग ताशीव दगडांनी बांधलेला आहे. शिवसागर जलाशयात जलक्रिडेचा नौकाविहाराचाही आनंद घेता येतो. चिपळूणकडून 400 किमी. अंतरावरील कोयना येथून 5 किमी. अंतरावरील कोयना धरणापासून बामणोली गावातून मालदेव पर्यंत लाँचसेवा आहे. चिपळूणकडून तिवरे मार्गे बैलमारव व सरीच्या घाटाने सुमारे तीन तास चढाई करून मालदेवला पोहोचता येते. येथे शामराव कोकरे यांचे अद्यापि वास्तव्य आहे.

टीप :- मालदेव हे गाव वन विभागाच्या कोयना जल विद्युत प्रकल्पाचा शिवसागर जलाशय व कोयना अभयारण्या प्रकल्प ग्रस्त असल्यामुळे विस्थापीत झालेले गाव आहे. विशेष जैवविविधतेबाबत सदरहू क्षेत्र हे अंति संवेदनशील असल्याने तेथे भटकंती करताना शासकीय पूर्व परवानगी अत्यावश्यक आहे.

किल्ले गोविंदगड उर्फ गोवळकोट


श्रीदेवी करंजेश्वरी मंदिरानजीक असलेला व इतिहासप्रसिध्द गोवळकोट बंदरामुखाशी शहरालगतच बसलेला भुईकोट किल्ला म्हणजे किल्ले गोविंदगड उर्फ गोवळकोट. हा किल्ला जमिनीवरील सुमारे 2 एकर परिसर क्षेत्रफळात विस्तारला आहे.

सद्यस्थितीत सुमारे 342 पाय-या चढून किल्ल्यावर जाता येते. तत्काळी या गडाचा वापर प्रामुख्याने टेहळणी व कोठार याकरिता होत असे. संपूर्ण गडमाथ्यासभोवती तटबंदी असून गडाच्या रक्षणार्थ माती, दगड, गुळ-चुना आदि माध्यमांचा बांधकामात वापर आढळतो. गडाला एकूण 12 बुरूज आहेत. सध्या 4 बुरूज सुस्थितीत आहेत. किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात 48 फुट लांब, 44 फुट रूंद व 22 फुट खोल आकारमानाचा विशाल हौद आहे. पूर्वेकडून व उत्तरेकडून असे दोन दरवाजे आहेत. दक्षिणेकडील तटबंदीलगतच श्रीदेवी रेडजाई मंदिर आहे. ही मूर्ती इ.स. 1690 पूर्वीची असल्यामूळे हा गड शिवाजी महाराजांनी 1670 दरम्यान बांधल्याची प्रचिती येते. गडाच्या चहुबाजूनी वाहणा-या वाशिष्ठी नदी व गोवळकोट खाडी परिसरातील बेट समुहांमुळे पर्यटकांना मोहित करणारा हा किल्ला शहरापासून सुमारे 5 किमी. अंतरावर आहे.

गोवळकोट इतिहासातिल महनीय घटना

गडाच्या पायथ्याशी असलेल्या श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी फाल्गुन शुध्द त्रयोदशीला शिवप्रभूंच्या भरणा-या दरबाराच्या सदर ठिकाणी आसनस्थ होई. तिला शास्त्रोक्त पूजाविधीसह तोफा डागून मानवंदना दिली ज्ाात असे. 1689 नंतर जंजि-याच्या सिद्यीने गोवळकोट किल्ला बळकावून ताब्यात घेतला.

2 में 1699 मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांनी श्रीदेवी करंजेश्वरीचे दर्शन घेऊन गडाला भेट दिली होती.

2 मार्च 1700 मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांनी या गडाची पाहणी केली होती.
नोव्हेंबर 1700 मध्ये जंजिरेकर सिद्यीचे पारिपत्य करण्यासाठी ताराबाई राणीसाहेबांनी कान्होजीराव झुंजारराव व मरळ देशमुख यांना सात हजार फौजेनिशी कुंभार्ली घाटाने गडावर पाठवले होते.

1744 मध्ये आंग्रे यांनी हबशांकडून गड ताब्यात घेतला. पुढे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुत्र तुळाजी आंग्रे यांनी सिद्यीचा पराभव करून किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला त्यांनी गडाला गोविंदगड असे नाव दिले.

इ.स. 1755 ते 1817 पर्यंतच्या काळात या गडाचे स्वामित्व पेशव्यांकडे होते.

इ.स. 1818 मध्ये गड ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी दि. 27 मार्च 1849 रोजी कोतवडे येथे जात असताना श्रीदेवी करंजेश्वरीचे दर्शन घेतले. याच मुक्कामात त्यांनी पूजा व महारूद्र केला. सुमारे 800 भाविकांना दक्षिणेसह महाप्रसाद दिला. सुहासिनींना खण-लुगडी दिली व उक्ताडच्या गणपतीचेही दर्शन घेतले.

गडाचे प्रचलित नाव गोवळकोट असेले तरी त्याचे मूळ नाव आरमार प्रमुख तुळाची आंग्रे यांनी ठेवले. संपूर्ण गडमाथ्याभोवती तटबंदी असून गडाच्या रक्षणार्थ बांधलेल्या या तटबंदीत माती, दगड, गूळ, चुन्ाा आदि माध्यमांचा वापर केलेला आढळतो.

किल्ले बारवई


हा पर्वतीय वनदुर्ग या प्रकारातील किल्ला आहे. आदिलशहाच्या काळात दाभोळच्या सुभ्याखाली असलेल्या चिपळूण व अंजनवेल प्रातांत वर्चस्व प्रस्थापिलेल्या बारराव कोळयांच्या साम्राज्याचे निवासी ठिकाण म्हणजे किल्ले बारवई.

दसपटीतील मौजे पेढांबे, खडपोली आणि कळकवणे या गावच्या सीमा मध्यावर 1500 फुट उंचीवर हा किल्ला आहे. या स्वयंपूर्ण किल्ल्याचे अवशेष आजही पहावयास मिळतात. दारूगोळा कोठार, बुजलेली तळी, व्ाहीरी यांचे बांधकाम दिसते. किल्ल्याचे तटावरून उडया मारून बारराव कोळयांच्या स्त्रिया सती गेल्या ती जागा आजही सतीचा कडया या नावाने ओळखली जाते.

घोडयावरून जाण्यासाठीच्या पुरातन पाखाडया किल्ल्यावर आहेत. येथील वेताळ बुरूजावरून श्रीक्षेत्र परशुराम, दाभोळची खाडी, किल्ले अंजनवेल, गोवळकोटचा गोंविदगड, तिवरे घाट, कुंभार्ली घाट नजरेच्या एकाच टप्प्यात दिसतात. या ठिकाणी पूर्वी लपून राहण्यासाठी भुयारे होती. 300 खंडी भात या किल्ल्यावर पूर्वी पिकत असे.

जंगली जयगड


किल्ले जंगली जयगड हा वनदुर्ग डोंगरी किल्ला या प्रकारात मोडता. याची समुद्र सपाटीपासून उंची सुमारे 2850 फूट इतकी आहे. या किल्ल्याचे सपाट पदेशाचे क्षेत्रफळ सुमारे 10 ते 15 एकर भरत्ो.

हा किल्ला ज्या सहयगिरीच्या डोंगर रांगेवर उभा आहे. त्या डोंगराच्या पोटात कोयना जलविद्युत प्रकल्पाचा चौथा टप्पा वसला आहे. त्या डोंगराच्या अभियांकत्रिकीचे आश्चर्यच म्हणावे लागेल. तसेच या किल्ल्याचे जंगलक्षेत्र शासकीय वनविभागाच्या अख्यत्यारित आहे. (संरक्षित क्षेत्र) त्यामूळे या किल्ल्यावर जाण्यास सन 1992 पासून प्रतिबंध आहे.

या किल्ल्यावर जाण्यास दोन मार्ग आहेत. निवचीवाडी मार्ग हा चढाईस आव्हानात्मक असून पायथ्यापासून चालत सुमारे 1 तासात गडावर पाहोचता येते. दुसरा मार्ग नवजा मार्गे असून जाताना रामबाण तीर्थक्षेत्र मध्येच पायी प्रवासा दरम्यान लागते. हे क्षेत्र म्हणजे जांभ्या खडकाच्या तीन विशाल शिळा आहेत. त्यालाच श्रध्दावान श्रीराम, लक्ष्मण, सीता यांचे रूप मानतात. गड अरण्यमय प्रदेशाने दाटलेला असल्याने आल्हाददायक वातावरण आहे. जंगली जयगडच्या बाले किल्ल्यावर निशाण काठी स्थानी निशाण {ध्वज| फडकवणे हा पत्करावा. जंगली जयगडच्या माथ्यावरून पोफळी, अलोरे व चिपळूणचा काही भाग, कोळकेवाडी दुर्ग, तिवरेगड सहयाद्रीतील सपाट पठारीभाग, डब्ल्यू (थ) काराची खिंड, रूद्राई मंदिर स्थान व खेमसे येथील समर्थ रामदास स्वामी गुंफा डोंगर आदिंचे दर्शन होते. गड प्रतिबंधित क्षेत्राच्या अखत्यारित असल्याने पूर्व परवानगीनेच पहावा.

 
© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions