खाडी पर्यटन
 

प्रस्तावना

चिपळूणला समुद्र सहवास नसला तरी त्याची कसर भरून काढणा-या खाडया पश्चिमेस थेट दाभोळ बंदरापर्यंत पसरल्या आहेत. या खाडयांमध्ये विविध मोसमात "बॅक वॉटर मोहोत्सव" आयोजन अलिकडे बहरू लागले आहे.

यातील प्रमुख व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा पट्टा म्हणून अलिकडच्या काळात गोवळकोट ते मालदोली बंदरा पर्यतचा खाडी पट्टा विशेष प्रकाशात आला आहे. या दरम्यान येणारे मजरेकाशी, धामणवेली, जुबारबेट, केतकी, कंरबवणे, बिवली, चिवेली ही बंदरे पर्यटन व्यवसायासाठी अधिक अनुकूल आहेत.

गुढरम्य दिवा बेट


गोवळकोट ते दाभोळ या सुमारे 30 नॉटीकल मैल (40किमी) लांबीच्या खाडीमधील दिवा बेट जलपर्यटनास किंवा खाडी पर्यटनास (बॅक वॉटर टुरिझम) खुणावते आहे. काहीसे उपेक्षित असलेले हे गूडरम्य बेट येथील ऐतिहासिक अवशोषंचा विचार करता पर्यटन आकर्षित होतील बसे आहे.

जेष्ठ इतिहास संशोधक आण्णा शिरगांवकर यांच्या मतानुसार या बैआची निर्मिती भूकंपामुळे झाल्याची दाट शक्यता आहे. सुमारे दहा लक्ष वर्षापूर्वी महाप्रलयकारी भूकंपाच्या उलथापालथीच्या समयी सध्याच्या सुरतपासून कारवारपर्यन्तची किनारपटटी समुद्रातून ऊर्घ्वपातळीवर आली. कालांतराने याच प्रांतात {कोकणप्| म्हणून संबोधले जाऊ लागले. तसेच याबाबत अनेक पौराणिक कथा - आख्यायिका संदर्भित आहेत. दिवा बेटावरील वैशिटयपूर्ण भुयारे म्हणजे तत्कालीन घटनेनुसार समुद्राच्या लाटांच्या प्रभावांमुळे पडलेली विवरे असावीत.

चिपळूण, खेड, दापोली, गुहागर या चार तालुक्यांच्या सरहदद्यदीतील गोवळकोट हे दाभोळ या ऐतिहाकसे व पिनसर्गरम्य खाडीमध्ये (बॅक वॉटर) गोवळकोट ते करंबवणे या जलप्रवाहमार्गाात म्हणजेच फाशात (चॅनेल) बेटांचा समूहच आहे. वाशिष्ठी नदी, ज्रगबुडी नदी व अरबी समुद्र यांच्या त्रिवेणी संगमामध्ये दिवा बेट अधिकच शोभिवंत दिसते. बेटाच्या आजूबाजूस बहिरवली, कोातवली, धामणदेवी, केतकी, करंबवणे ही गांवे आहेत. बहिरवली गावाच्या बाजूकडून बेटावर जाण्यासाठी पाय-या आढळतात. तसेच दोन टाकी, सहा कोरीव जोडलेली कुंडे (विहिरी), भूयारे,वाडा-राहूुटया, कबरी यंाचे भग्रावशेष या बेटाची ऐतिहासिक साक्षीदार ठरतात.

बेटावर काळया पाषाणातील सहा कुंडे आहेत. ती एकमेकांस जोडलेली आहेत. हे आगळेच अनोखे वैशिष्ठय आहे. ज्याप्रमाणे घराच्या खोल्यांची रचना असते त्या पध्दतीने दोन्ही बाजूस तीन- तीन चौकोनी कुंडांचा गट अशी सहा कुंडे परस्परांना संबंधित ठेवली आहेत. कुंडांच्या भितीची रुंदी दोन ते अडीच फूट असून, कुंडांच्यामध्ये थोडासा मोकळा भाग आहे. कुंडांमध्ये प्रवेशण्यासाठी भुयारी मार्ग असून तयाला आणखी दोन भुयारे जोडलेली आहेत. बेटाच्या माथ्याकडील भागात विविध वस्तूंचे भग्नावशेष आहेत. वाडयाच्या भग्नावशेषानजीनक वटवृक्ष आहे. त्याच्या मुळूैंशी छोटया टाक्यासारखी खोलगट जागा आहे. त्याच्या सभोवती उत्खननाचा प्रयत्न केल्यास भुयाराच्या शक्यतेस पुष्टी देणा-या खवुणा आढळतात.

वाडयाच्या पायाच्या चौथा-याच्या शेजारी कबर सदृश्य स्मृती पाषाण जमिनीत पुरलेले आहेत. तसेच काही भाग जमिनीत गाडल्या गेलेल्या शिलाखंडावर आकर्षक नक्षीकाम कोरलेले आहे. या बेटाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नसलीतरी तेथील अस्त्त्विात असलेले विविध प्राचीन भग्नावशेष एककाळच्या मानवी वस्तीचे भाक्म साक्षीदार आहेत. कडयासारख्या उंच टेकडीवरुन खाछीचे विलोभनीय दर्शन घडते. बेटाच्या एका बाजूने असलेला डोंगरासारख्या भागााखाली खोलगट विस्तीर्ण परिसर आहे. परंतु दाट वेली-वृक्षापंनी गुरफटलेल्या या भागाकडे पाहिल्यास संशोधनाचे कुतूहल जागे होते. या बेटाचा विस्तार एवढा आहे की बेटाला नौका विहाराव्दारे प्रदक्षिणा घालण्यास सुमारे दीड तासाहून अधिसक कालावधी लागतो. चिपळूण ते करंबवणे हा सुमारे 21 कि मी. लांबीचा प्रवास करुन करंबवणे किंवा केतकी दोन्हीही बंदरापासून न्ाौका विहाराव्दारे सुमारे 1.5 कि.मी. जलप्रवासानंतर दिवा बेट येथे पोहोचता येते.

 
© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions