मा. ध्यक्षा व मा. मु़ख्याधिकारी यांचा नागरीकांना संदेश

चिपळूण नगर परिषदेच्या संकेतस्थळावर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!

आता शोधयंत्रास (Search Engine) समजेल अशा जगन्मान्य युनिकोड मराठीचा वापर वाढावा या हेतूने ही सर्व माहिती या वेबसाईटवर युनिकोड फॉंटमध्ये देण्यात येत आहे.

चिपळूण नगर परिषदेच्या वेबसाईटवर शहरा विषयी माहिती, शहराचा इतिहास, नगर परिषदे विषयी विस्तृत माहिती, शहरातील व जिल्ह्यातील मान्यवर व्यक्ती, नगर परिषदेची रचना व कार्य, लोकप्रतिनिधीं विषयी माहिती, नगर परिषदेची दूरध्वनी सूची, नगर परिषदेमध्ये झालेले संगणकीकरण - त्याचे जनतेस होणारे फायदे, नगर परिषदेच्या विभागांची विस्तृत माहिती, नगर परिषदेचे वार्षिक अंदाजपत्रक, चिपळूण शहरातील महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक - डॉक्टर्स, मेडीकल स्टोअर्स, चिपळूण नगर परिषदेत होणार्‍या घडामोडी - स्पर्धा, कार्यक्रम इ. माहिती आहे.

पर्यटन व्यवसाय वाढविणेसाठी चिपळूण शहरा मधिल व शहराजवळील पर्यटन स्थळांची विस्तृत माहिती या वेबसाईटवर देणेत आलेली आहे.

त्याच बरोबर अत्यंत महत्त्वाच्या सुविधा म्हणजे, " आपला कर माहित करा " व " निवीदा / जाहीराती " या गोष्टी ऑनलाईन देणेत आलेले आहेत हे या वेबसाईटचे खास वैशिष्ट्य आहे. या पैकी " आपला कर माहित करा " या लिंक मधुन चिपळूण नगर परिषदेच्या हद्दी मधील कोणत्याही करदात्यास त्याच्या मालमत्ता क्रमांका नुसार त्याचा मालमत्ता कर व पाणीपट्टी ही जगात कोठेही बसुन पहाता येणार आहे. (लवकरच मालमत्ता कर व पाणीपट्टी ही ऑनलाईन भरता येण्याची सुविधा ही सुरू करण्यात येणार आहे.) त्याच प्रमाणे " निवीदा / जाहीराती " या लिंक मधुन विविध कामांविषयी सर्व विभागांमार्फत काढण्यात येणार्‍या निवीदा व जाहीराती या देखील जगात कोठेही बसुन पहाता येणार आहेत.

त्याच प्रमाणे आपल्या सुचना " मदतनीस " या लिंक मार्फत आमच्या पर्यंत पोहोचवू शकता.

सर्व नागरिकांनी या सुविधांचा वापर करावा हे अवाहन करणेत येत आहे.

 

© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions