चिपळूण नगर परिषदेचे संगणकीकरण

महाराष्ट्रातील नगर परिषदांचे संगणकीयकरणासं विविध संस्थानी अभ्यास केला आहे. तसेच याबाबत काही कंपन्यानी संगणकीय आज्ञावली विकसीत केली असून काही प्रमाणात नगर परिषदांनी त्याचा वापर सुरू केला आहे. चिपळूण नगर परिषदेची संगणक प्रणाली विकसीत करणेकामी कॉम्पुटर एट-सेट्रा, चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांची एजन्सी नेमलेली असून सदर संगणक प्रणाली लेखा संहिता नियमाप्रमाणे विकासीत करुन घेणेत आली आहे. त्याप्रमाणे प्रत्येक विभागाचे संगणक प्रणालीबाबतचे अभ्यास करण्यात आलेला असून त्याबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

जन्म-मृत्यु
-
नगर पालिकेमार्फत नागरीकांना विविध दाखले, परवाने दिले जातात. त्यामध्ये सर्वात महत्वाचा व नियमित मागणी असलेला म्हणजे जन्म किंवा मृत्यु दाखला यामध्ये संगणकीकरण केल्यामुळे नागरीकांना त्यंचा निश्चीत लाभ मिळत आहे.
संगणकीकराणापूर्वी वरील कामांसाठी नगर परिषदेला 2 ते 3 कर्मचारी नियमीत लागत होते. अर्जाप्रमाणे प्रत्येक नोंदीचा शोध घेवून दाखले तयार करणे त्यांच्या प्रती काढणे त्यासाठी वेळ वाया जात होता. त्यामध्ये चुका होण्याची शक्यता असते व नागरीकांना दाखल्यासाठी वेळ लागत होता. संगणकापूर्वी जन्म/मृत्यु दाखले तीन दिवसांत दिले जात होते.

नगर पालिकेच्या कर्मचारीवर्गाला करावी लागणारी कामे म्हणजे -

1. दरोरोजचे जन्म मृत्यु दाखल्याच्या नोंदी वेळच्या वेळी करणे.
2. मागील डेटा इंट्री करून घेणे.
3. प्रत्येक अर्जाप्रमाणे नोंदीचा उतारा तपासून घेणे.
4. दरमहा होणाऱ्या नोंदीवरून अहवाल तयार करणे, नोंदीचे उतारे काढुन पाठविणे.

संगणकीकृत जन्म मृत्यु दाखल्याकरीता आलेल्या नागरीकांच्या अर्जा प्रमाणे. आईचे किंवा वडीलांचे नांव, तारीख, रूग्णालय सन यापैकी कोणत्याही आधारे शोध घेता येतो, ज्या व्यक्तींना इंग्रजी दाखल्याची आवश्यकता आहे त्यांना तो सत्वर देण्यात येतो. संगणकीय दाखला सुस्पष्ट व बिनचुक मिळत असल्यामुळे तसेच 1 तासात दाखला नागरीकांच्या हाती पडल्यामुळे नागरीकांचा वेळ वाचतो. तसेच पुर्वी शासनाचे पाठवावयाचे अहवाल 15 तारखेपर्यत पाठविले जात होते, आता सदरचे अहवाल 1 तारखेला पाठविले जात आहेत. त्यामध्ये 1 लिपीक वरील संगणकीय कामे करून अन्य वेळी बाकीचेही काम करू शकतो. नागरीकांच्या दृष्टीने जन्म तारीख, आईचे किंवा वडीलांचे नांव, जन्माचा महिना या पैकी कोणत्याही एका माहितीचे आधारे दाखल्याचा शोध घेता येतो. तसेच जन्म किंवा मृत्युची नोंद नसल्यास तसाही दाखला सत्वर देता येतो. या मध्ये प्रतिज्ञापत्राप्रमाणे केलेल्या नोंदीही जन्म/मृत्यु मिळू शकतात. संगणकीकराणामुळे जन्म किंवा मृत्युची डबल नोंद होत नाही. संगणकीकरणामुळे 1 लिपीक जन्म मृत्यु नोंदी करुन अन्यही संगणक प्रणालीची कामे करू शकतो.

करवसुली -
कर हे नगर परिषदांचे महत्वाचे उत्पन्नाचे साधन असून शहरांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्व शहरात घरांची संख्या गेल्या 2 ते 5 वर्षात 2 ते 4 पटीने वाढली आहे. त्यामुळे त्यासर्व नोंदीची अचुकता ठेवणे कठीण होते.

या विभागाकडून दैनंदिन व वार्षिक खालील प्रमाणे कामे करावी लागतात -


1. नवीन घरांची आकारणी करणे.
2. मागील रजिस्टरचा जमेचा ताळमेळ घेणे व त्याप्रमाणे येणे बाकी ठरवणे.
3. नवीन मेाजणी रजिस्टर तयार करणे.
4. कर आकारणी मधील विविध टप्यांवरील नोंद ठेवणे.
5. विविध टप्यांवर अपीलांच्या सुनावणी व आक्षेपांप्रमाणे आकारणीत फेरबदल करणे.
6. आकारणी विविध टप्यांनंतर निश्चित करणे.
7. मागणी बीले तयार करणे.
8. प्रत्यक्ष मागणी बील प्रमाणे वसुली करणे
9. घरांची मालकी हक्कासंबधी नोटीस फेरबदल करणे.
10. कलम 151 अन्वये नोटीस देणे.
11. कलम 152 अन्वये जप्ती नोटीस देणे.


वरील कामे या विभागाकडून होत असतांना वरील क्रमांक 1 ते 6 पूर्ण झाल्याशिवाय मागणी बिले तयार करता येत नाहीत. त्यानंतर प्रत्यक्ष मागणी बीले तयार करणेचे कामही होईपर्यत अनेक वेळा नोव्हेंबर डिसेंबर महीना येतो. व त्यामुळे प्रत्यक्ष वसुलीचे कामासाठी 4 महीने राहतात. त्यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो.

नगर परिषदांची जकात बंद झाल्यामुळे सध्या नगर परिषदेकडे मनुष्य बळ आहे, परंतु तरीही वरील सर्व कामे किचकट तसेच एकच काम अनेक वेळा करावे लागते व त्यामुळे याबाबत जे काम परत परत करावे लागते तेवढेच काम संगणकामार्फत करून घेतले तर वाया जाणारा वेळ वाचतो. तोच वेळ फिरतीसाठी वापरता येतो व त्यामुळे वसुली मध्ये वाढ होते. नगर परिषदेची डिमांड बीले यापूर्वी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये नागरीकांना मिळत होती. संगणकीय प्रणाली विकसीत केल्यामुळे कर वसुली विभागाकडील मागणी बीले माहे जून मध्ये व पाणी पुरवठा विभागाकडील मागणी बीले ऑगष्ट मध्ये काढण्यात आली. त्यामुळे करवसुलीचे भरणा मध्येही वाढ झाली आहे.

कर वसुलीची आज्ञावली तयार करतांना खालील गोष्टींचा विचार केलेला आहे. प्रत्येक घरांचा र्सव्हे फॉर्म व त्यावरील गणतीय घराचे भाडे मुल्य प्रत्यक्ष फार्मवर केल्यानंतर परत तीच संपूर्ण माहितीचे संगणकीकरण न करता फार्मवर फक्त भाडे मुल्यांची डेटा एन्टी करून त्याप्रमाणे कर आकारणी सोपी पध्दत विकसीत केली आहे. त्यामुळे याबाबतीत झोन, तसेच वजावटी बाबतची मानवी चूका कमी करण्यात आल्या आहेत. मात्र लिपीकाला र्सव्हे करून फक्त भाडे मुल्य ठरवावयाचे आहे. यापुढील मागणी बीले, मागणी रजिस्टर, तसेच फिरतीच्या वेळी करण्यात आलेल्या कर पावत्या, 13 नंबर चलन तसेच 50 नंबर जमा रजिस्टर इत्यादी संगणकावर काढणे शक्य झाल्यामुळे वसुली मध्ये काम करणाऱ्या लिपीकांचा वेळ वाचून त्यांना फिरती साठी वेळ मिळत आहे.त्यामुळे नगर परिषदेचा भरण्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.

स्टोअर्स -
यामध्ये नगर परिषदेकडील सर्व जंगम मालमत्ता, स्थावर मालमत्ता यांच्या नोंदी शोधणे त्यांचे वर्गीकरण करणे तसेच दैनंदिन स्टोअर्स मधील वस्तूंवर नियंत्रण ठेवणे अधिकारी व पदाधिकारी तसेच कर्मचारी यांना माहिती समजू शकते. सध्याचे पध्दतीत मालांची आवक नोंदी मधील गैरव्यवहार किंवा वापरातील गैरव्यवहार रोखणेसाठी यांचा उपयोग होवू शकतो. त्यासंबधी या संगणक प्रणालीमध्ये नियोजन करणेत आले आहे व त्यामुळे खरेदीचे नियोजन व त्याच प्रमाणे अनावश्यक खरेदी टाळून बचत करणे शक्य होते.


आस्थापना -
आस्थापना विभागामार्फत दैनंदिन कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक नोंदी ठेवणे त्याचप्रमाणे पगारबीले तयार करणे कर्मचाऱ्यांचे प्रा. फंड लेखा अन्य सेवा पुस्तकासह लेखे अद्यावत ठेवणे आवश्यक असते त्याचप्रमाणे पगार बीले करणे इत्यादी कामांसाठी कर्मचार्‍यांचा बराच वेळ जातो. विशेषता नगर परिषदे 60 ते 70 कर्मचारी चतुर्थश्रेणी सफाई कामगार असल्याने त्यांच्या रजा, गैरहजेरी, विविध रजा असतात व त्यामुळे पगार बीले करणेचे कामासाठी जास्त वेळ वाया जातो. आस्थापना विभागाकडील संगणक प्रणाली विकसीत करतांना नियमीत काम करीत असलेले कर्मचारी यांचे पध्दतीमध्ये कोणताही बदल न करता त्यामधील वेळ घालवणारे काम कमी केलेले आहे. त्यामुळे त्याचा वापर करणे कर्मचार्‍यांना सोईचे होईल. आस्थापना विभागाची माहिती संगणक प्रणालीमुळे अद्ययावत केल्यामुळे कर्मचारी पेन्शन, कर्मचारी वेतन, रजा यासंबधी माहिती सत्वर मिळू शक ते. कर्मचारी यांचे कपाती योग्यवेळी व व्यवस्तीत होत असल्यामुळे त्याचा फायदा कर्मचारी यांना होतो.


बांधकाम -
बांधकाम हा विभाग नागरीकांच्या संपर्कात येणारा व नगर परिषदेत सर्वात जास्त कामांची व्याप्ती असणारा विभाग आहे. दैनंदिन कामे करणे व त्यांचे रेकॉर्ड ठेवणे इत्यादी कामे अत्यंत अडचणीचे तसेच वेळ घालवणारे असते. बांधकाम विभागाकडील याबाबत खालील कामे ही बराच वेळ घेणारी असतात.
1. अंदाजपत्रके करणे.
वरील कामे मॅन्युअल प्रध्दतीने केल्यास बराच वेळ जातो, त्याच्या नोंदी ठेवणे म्हणजे कामांच्या वाप्तीमुळे वेळखाऊ काम असते. संगणक प्रणालीमुळे सदरची कामे करणे सोईस्कर झाले आहे. त्यामुळे बांधकामाचे पर्यवेक्षकण करणे सोईचे झाले आहे. त्यामुळे बांधकामे पहाणीसाठी पुरेसा अवधी मिळू शकतो. वरील कामांचे संगणक प्रणालीमधून रिपोर्ट काढता येतात, त्यामुळे कामे वेळेवर होवून त्याचा फायदा नागरीकाना होतो.

लेखा विभाग -
लेखा विभागात कर पावती व सर्वसाधारण पावती संगणकावर करून देण्यात येते. त्यामुळे तेथील पावत्यांचे रिपोर्ट काढण्यात येतात.

एक खिडकी/आवक जावक -

एक खिडकी यांचे संगणक प्रणालीमुळे विविध विभागातील कामे एक खिडकीमध्ये सर्व कागदपत्रांची खात्री करून जमा केल्यामुळे तेथेच नागरीकांना कामांची पोच दिली जाते व पुढील निर्गत तारीख दिली जाते त्यामुळे नागरीकांना विविध विभागांना फे-या माराव्या लागत नाहीत. निर्गत तारीखेच्या दिवशी नागरीकांना योग्यतो दाखला मिळू शकतो. आवक जावक चे संगणक प्रणालीमुळे अर्ज घेवून येणाया नागरीकांना त्याची पोच दिली जाते. रोजचे येणारे टपाल/अर्ज सत्वर प्रत्येक विभागातील संणकावर पहावयास मिळतात. जावक करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांना आवक जावक विभागात जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जावक क्रमांक विभागातील संगणकावर करता येतो. सर्व विभागाचे नेटवर्कीग केल्यामुळे प्रत्येक विभागाचे असलेलेच टपाल त्या त्या विभागाना पहावयास मिळते. तसेच मुख्याधिकारी यांनाही टपाल/अर्ज कोणत्या विभागाकडे आहे त्याची माहीती तात्काळ मिळू शकते.
प्रत्येक विभागाचे संगणकीकरण करताना स्थानिक पध्दतीचा तसेच प्रचलीत पध्दतीत बदल केल्यास संगणकाचा वापर करणे कर्मचाऱ्याला अशक्य होते व त्यामुळे वापर होताना दिसत नाही. हे लक्षात घेवून नगर परिषदेत प्रचलीत पध्दतीमध्ये संगणक प्रणाली विकसीत करणेत आली आहे. तसेच प्रत्यक्ष संगणणकापर काम करताना कमीत कमी टायपींग करावे लागेल त्यामुळे ज्या लिपीकाला टंकलेखनाचे ज्ञान नाही तो ही काम करू शकला पाहिजे, हा दृष्टीकोन ठेवून संगणक प्रणाली विकसीत करणे आली आहे. तसा प्रयत्न सदरची संगणक प्रणाली विकसीत करतांना केलेला आहे. संगणकीकरण करताना नवीन सुधारीत अधिक विकसीत पद्धती टप्या टप्याने विकसीत करणेत येत आहेत.

संगणकीयकरणचे फायदे -

1. जन्म मृत्यु असेसमेट पावती दाखला यासारखे दाखले 10 मिनीटात तसेच अचूक सुस्पष्ट नागरीकाना मिळाल्यामुळे त्यासाठी दररोज होणारी नागरीकाची गर्दी व काही वेळा विलंबामुळे नागरीक व कर्मचारी यांच्यात येणारी कटूता कमी झाली.
2. घरपट्टी कराची मागणी बीले नागरीकांना लवकर प्राप्त झाल्यामुळे त्याना आर्थीक नियोजन करणे शक्य झाल्यामुळे करवसुलीचे प्रमाणात वाढ झाली आहे.
3. नागरीकाना कर भरणेसाठी विविध विभागात फिरावे लागत होते. संगणकावर एकाच ठिकाणी सर्व पावत्या होत असल्यामुळे नागरीकांचा त्रास वाचला आहे.
4. आवक जावक विभागात नागरीकाना आपल्या अर्जाची स्थिती त्वरीत समजू शकते.
5. नगर परिषदेचे कामकाजात संगणकीय करणामुळे अधिक पारदर्शिपणा येतो.

कर्मचारी कामावर देखरेख ठेवणे व त्याचे योग्य मुल्यमापन करणे मुख्याधिकरी यांना सहज शक्य होते.

© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions