वसुली विभाग

चिपळूण नगर परिषदेचे वसुलीविभागामार्फत नगर परिषदेचे हददीतील मालमत्ताधारकांकडून घरपटटी, पाणीपटटी, शिक्षणकर, रोजगार हमी कर, विशेष स्वच्छता कर, जाहिरात कर इत्यादी करांची वसुली केली जाते.

नगर पालीका हददीतील कर वसुलीसाठी क्र. 1 ते 8 व उपनगर असे प्रभाग करणेत आलेले आहेत. त्याप्रमाणे वसुलीसाठी प्रभाग निहाय खालील कर्मचारी कार्यरत आहेत.

प्रभाग
प्रभाग निहाय वसुली कर्मचारी

    वॉर्ड क्रमांक 1 -

    श्री.शरद मोहिते
    वॉर्ड क्रमांक 2 -
    श्री शरद जानवलकर
    वॉर्ड क्रमांक 3 -
    श्री.दिलीप हराळे,
    वॉर्ड क्रमांक 4 -
    श्री.शरद जानवलकर
    वार्ड क्रमांक 5 -
    श्री.कुसुमाकर कापडी व श्री.चंद्रशेखर खेडेकर
    वॉर्ड क्रमांक 6 -
    श्री.अमोल वीर
    वॉर्ड क्रमांक 7 -
    श्री.नंदकुमार मोहिते व श्री.अशोक चव्‍हाण
    वॉर्ड क्रमांक 8-1 -
    श्री.वसंत निवाते
    वॉर्ड क्रमांक 8-2 -
    श्री.वसंत निवाते
    उपनगर -     श्री.दाऊद कास्कर, श्री.विजय सावंत,
तसेच शहरातील संपूर्ण जाहिरात कर वसुलीसाठी श्री.मंगेश ना. देवळेकर यांची नेमणुक करणेत आलेली आहे.


शहरातील मालमत्ता करांची आकारणीसाठी शहराचे 4 झोन पाडणेत आलेले आहेत. याबाबत झोनचा नकाशा नागरिकांचे माहितीसाठी वसुली विभागामध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक झोनसाठी इमारतीच्या प्रकाराप्रमाणे माननिय नगर रचनाकार तथा मूल्यनिर्धारण अधिकारी, रत्नागिरी यांचेकडून प्राप्त प्रती चौरस मीटरचे दराप्रमाणे आकारणी करणेत येते.

  • झोन नंबर 1 - मध्ये मुंबई-गोवा हायवे दोन्ही बाजूकडील भाग रावतळे, बहाददुरशेख, मार्स डेव्हलपर्स परिसर, वांगडे मोहल्ला, काविळतळी, मार्कंण्डी, वाणीआळी, सोनारआळी, बेबल मोहल्ला, बाजारपेठ, खेंड जाकमाता मंदिरकडील भाग, चितळेवाडा, मापारी मोहल्ला समोरील भाग, बाजारपेठ, उक्ताड देसाई मोहल्ला, खाटीक आळी, पाग गोपाळकष्णवाडी, मंुबई-गोवा हायवे, पाग शासकीय विश्रामगह दोन्हीबाजूकडील भाग या भागांचा समावेश होतो.

  • झोन नंबर 2 - मुंबई-गोवा हायवेलगत पाग कास्कर आळी भाग, शिवाजीनगर ओझरवाडी, डोंगराळ भागातील घरे या भागांचा समावेश होतो.

  • झोन नंबर 3 - बाजारपूलाचे पलीकडील भाग, गोवळकोट रोड (चरापर्यंत), संपूर्ण पेठमाप या भागांचा समावेश होतो.

  • झोन नंबर 4 - उपनगर गांधीनगर, शंकरवाडी, मुरादपूर भोईवाडा, मुरादपूर मिठागरी मोहल्ला, गोवळकोट चरापुढील सर्व भाग, व संपूर्ण गोवळकोट भाग, पागमळा, बावशेवाडी खेंड, महालक्ष्मी नगर या भागांचा समावेश होतो.


    घरपटटी आकारणीसाठीचा दर हा बांधकामाचे प्रकाराप्रमाणे अ,ब,क,ड,इ प्रमाणे केले जाते. त्यांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

 

प्रकार अ पहिल्या प्रतीचे बांधकाम -

  • भिंती-दगडी/विटांच्या पक्क्या आतून व बाहेरुन सिमेंट प्लँस्टर
  • जमिन- मोझॅईक/पॉलिश शहाबाद फरशी किंवा सिंमेंट कोबा (आय.पी.एस.)
  • छप्पर- आर.सी.सी.स्लॅब दरवाजे/खिडक्या लाकडी/ अॅल्यूमिनियम चांगल्या प्रकारच्या.
  • संडास/स्नानगह प्रत्येक गाळयासाठी स्वतंत्र व अंतर्गत वीज सोय आहे.

प्रकार ब दुययम प्रतीचे बांधकाम -

  • भिंती-दगडी/वीटांच्या आतून प्लॅस्टर बाहेरुन सिमेंट दर्जा.
  • जमिन- रफ शहाबाद फरशी किंवा सिमेंट कोबा
  • छप्पर- आर.सी.सी.स्लॅब/सागवानी फ्रेमबर मंगलोरी कौले
  • दरवाजे /खिडक्या- लाकडी दुययम प्रकारच्या
  • संडास/स्नानगह - प्रत्येक गाळयासाठी स्वतंत्र अंतर्गत पाणी व्यवस्था- अंतर्गत
  • पाणी व्यवस्था- अंतर्गत किंवा बाहेर पण नळाची व्यवस्था वीज आहे.

प्रकार क साधारण प्रतीचे बांधकाम -

  • भिंती - दगडी /विटांचे प्लॅस्टर शिवाय फक्त सिमेंट दर्जा
  • जमिन- रफ सिमेंट कोबा, छप्पर दुययम प्रतीचे कौलारु/ पत्र्याचे छप्पर.
  • दरवाजे/ खिडक्या - दुययम प्रकारच्या लाकडी/सिमेंट जाळी
  • संडास/स्नानगह - बाहेरील बाजूस सामाईक पण मोरी अंतर्गत
  • पाणी व्यवस्था- बाहेर नळाचे किंवा विहीरीचे, वीज -आहे

प्रकार ड निकष्ट प्रतीचे बांधकाम -

  • भिंती -दगड मातीच्या कच्च्या जमिन- मातीची रफ
  • सिमेंट कोबा छप्पर- निकष्ठ प्रतीचे कोलारु/पत्र्याचे दरवाजे/ खिडक्या-सिमेंट
  • जाळी/निकष्ठ लाकडी संडास / स्नानगह सार्वजनिक/ मोरी आहे किंवा सामाईक
  • पाणी व्यवस्था - सार्वजनिक नळ / विहीर - वीज आहे.

प्रकार ई ताप्तुरते बांधकाम

  • झोपडीचे बांधकाम


मालमत्ता कर आकारणी पध्दती

मा.नगर रचनाकार तथा मुल्यनिर्धारण अधिकारी यांचे कडून मंजुर दराप्रमाणे मालमत्ता कर आकारण्यात येता. येणारे दर प्रतिवर्षी नवीन येतात. सदरचे दर हे रहिवास वापराचे आहेत. वाणिज्य वापर अकारणी रहिवास दराच्या दुप्पट दराने करण्यात येते.

सन 2010-2011 सालासाठीचे दर तक्ता

भाडे मुल्य विभाग क्र.
इमारतीचा प्रकार



1
330
280
205
140
2
285
225
180
120
3
240
210
170
110
4
210
170
140
105


शिक्षणकर व रोजगार हमीकर यांच्या टक्केवारी व आकारणी संबधी माहीती

 
वार्षिक भाडेमुल्याचे टप्पे.
निवासी जागावर आकारावयाचा
सेसचा दर इमारती व जमिनी
बिगर निवासी जागावर आकारावयाचा सेसचा दर इमारती व जमिनी
बिगर निवासी उपयोगासाठी वापरण्यात येणा-या जमिनी व इमारतीवर
शिक्षणकर
रोजगारहमीकर
1
ज्या प्रसंगी वार्षिक भाडेमुल्य रु. 75/- किंवा त्याहून अधिक पण रु. 150 व त्याहून कमी असते.
2 टक्के
4 टक्के
1 टक्के
2
रु. 150 हून अधिक व रु. 300 व त्याहून कमी
3 टक्के
6 टक्के
1.5 टक्के
3
रु. 300 व त्याहून अधिक व रु. 3000 हून कमी
4 टक्के
8 टक्के
2 टक्के
4
रु. 3000 व त्याहून अधिक व रु. 6000 हून कमी
5 टक्के
10 टक्के
2.5 टक्के
5
रु. 6000 व त्याहून अधिक
6 टक्के
12 टक्के
3 टक्के


मालमत्ता कर आकारणी नमुना

मालमत्ता कर आकारणी नमुना (रहीवास)
जर एखादी 500 स्के. फूट ची सदनिका असेल तर खालील प्रमाणे मालमत्ताकराची केली जाते

झोन क्रमांक - 1 बांधकाम प्रकार - अ दर प्रति चौ. मिटर रुपये 300/-

हॉल 16.00 X 13.02 = 208.32
किचन 10.00 X 9.00 = 90.00
बेडरूम 10.00 X 11.00 = 110.00
---------------------------------------------------
408.32 चौ. फूट
---------------------------------------------------
37.94 चौ. मिटर
37.94 चौ.मि. X 300 = 11382/10244
वार्षिक भाडेमुल्य : 11382/-
10 टक्के मेंटनन्स कमी करणे : 1138/-
---------------------------------------------------
करयोग्य मुल्य : 10244

करयोग्य मुल्याचे 23 टक्के घरपट्टी :- 2356/-
करयोग्य मुल्याचे 1 टक्के वृक्षकर :- 102/-
वार्षिक भाडेमुल्याचे 6 टक्के शिक्षणकर :- 683/-
एकूण कर आकारणी :- 3141/-




मालमत्ता कर आकारणी नमुना (वाणिज्य)

झोन नंबर 1 बांधकाम प्रकार अ आकारणी दर 600/- प्रती चौ.मीटर
व्यापारी गाळा 10 X 10 उ 100 चौ.स्के.फूट = 09.00 चौ.मिटर
9.00 चौ.मि. X 600 दर = 5400/4860

वार्षिक भाडेमुल्य : 5400/-
10 टक्के मेंटनन्स कमी करणे : 540/-
---------------------------------------------------
करयोग्य मुल्य : 4860/

करयोग्य मुल्याचे 23 टक्के घरपट्टी :- 1118/-
करयोग्य मुल्याचे 1 टक्के वृक्षकर :- 49/-
वार्षिक भाडेमुल्याचे 10 टक्के शिक्षणकर :- 540/-
रोजगार हमी कर :- 135/-
एकूण कर आकारणी :- 1842/-

 

वरीलप्रमाणे नमूद केल्याप्रमाणे बांधकामाचे प्रकाराप्रमाणे महाराष्ट्र नगर पालिका, नगर पंचायती व औद्योगिक शहरे अधिनियम 1965 चे कलम 113, 114 व कलम 115 प्रमाणे नगर परिषद हद्यीतील बांधकामांची पहाणी करुन त्याप्रमाणे बांधकामाचे प्रकाराप्रमाणे व दराचे अनुषंगाने कर योग्य मुल्य निश्चित करुन करनिर्धारण यादी तयार करणेत येते. व मंजूरीकरीता मूल्यनिर्धारण अधिकारी यांचेकडे पाठविणेत येते. कलम 117 प्रमाणे ती तपासून मूल्य निर्धारण अधिकारी यांचेकडून प्राप्त झाल्यावर कलम 118 प्रमाणे करनिर्धारण यादीबाबतची नोटीस प्रसिध्द करणेत येते.

कलम 119 प्रमाणे कर आकारणीबाबत लेखी अर्ज प्राप्त करुन घेतले जातात. व कलम 120 प्रमाणे मूल्यनिर्धारण अधिकारी यांचे समोर अर्जदारांना समक्ष बोलावून अर्जाबाबत सुनावणी केली जाते. व त्यानंतर कलम 121 प्रमाणे करनिर्धारणाची अंतिमयादी तयार करणेत येते. सदरची कर निर्धारण यादी अंतिम झालेनंतर संबंधित मालमत्ताधारकांस/ भोगवटाधारकांस कलम 150 प्रमाणे मागणी बिल देणेत येते.

सदरचा बिल भरणेचा कालावधी 15 दिवसांचा असतो. व सदरची रक्कम मुदतीत भरल्यास मालमत्ता कराचे रक्कमेच्या 1 टक्का इतका बटटा दिला जातो. मुदतीत सदरची रक्कम न भरल्यास कलम 151 प्रमाणे मागणी नोटीस बजावणेत येते. व अशी मागणी नोटीस बजावणेत आल्यावर नोटीस बजावल्यापासून मागणीची नोटीस न भरल्यास कलम 152 प्रमाणे रक्कमेच्या वसुलीसाठी कारवाई केली जाते.
करनिर्धारण यादी अंतीमझाल्यावर कलम 150 प्रमाणे मागणी बिल दिल्यावर कराची रक्कम मान्य नसल्यास संबंधित मालमत्ताधारकांस / भोगवटाधारकास कलम 169 प्रमाणे सचिव, मालमत्ताकर अपिल कमिटी यांजकडे मागणी बिलाचे 30 टक्के रक्कम भरुन अपिल करता येते. सदर अपिलाचा निर्णय जर मान्य नसेल तर संबंधित मालमत्ताधारकांस/ भोगवटाधारकांस सक्षम न्यायालयात अपिल करता येते.

महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती, औद्योगिक नगरे अधिनियम 1965 चे कलम 127 प्रमाणे एखादी इमारत किंवा जमिन रिकामी आहे किंवा तिच्यापासून कोणतेही भाडयाचे उत्पन्न मिळाले नाही अशा आशयाची लेखी नोटीस मुख्याधिका-यास दिल्यास अंशत: माफीची तरतूद आहे.

तसेच कलम 129 व 130 प्रमाणे अनुसूची 2 किंवा अनुसूची 3 प्रमाणे संबंधितांनी मालमत्ता हस्तांतरणाबाबत नगर परिषदेस नोटीस दिल्यास मालमत्ता हस्तांतरणाबाबत कार्यवाही केली जाते. वरीलप्रमाणे वसुली विभागामार्फत कार्यवाही केली जाते.


विभाग प्रमुख : श्री प्रमोद शंकर ठसाळे

 
© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions