|
सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना
राज्यामधील नागरी भागामध्ये दारिदय्र रेषेखालील लोकांचे रहाणीमान उंचवण्यासाठी
त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दष्टीने दिनांक 01/12/1997 पासुन
केंद्र पुरस्कृत सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना सुरू करण्यात आली आहे. सुवर्ण
जयंती शहरी रोजगार योजना ही सामुहीक सबलीकरणातून दारिद्रय निर्मुलनावर भर देणारी
योजना आहे. सन 2005-2006 च्या र्सव्हेक्षणाच्या यादीनुसार एकूण 427 कुटुंबांची
दारिद्र रेषेखाली नोंद झाली आहे. ही योजना सहा घटकांद्वारे विविध स्तरावर राबवली
जाते.
अ.
सामाजिक संरचना
ब. स्वयंरोजगार
क. नागरी रोजगार योजना अ - सामाजिक संरचना :- दारिद्र रेषेखालील कुटुंबाना सामाजिक संरचनेद्वारे संघटीत करून या योजनेच्या
निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. अंदाजे
2000 कुटुंबापर्यंत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचे एक समाज विकास संस्था (सी.डी.एस.)
तयार होते. चिपळूण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये एक सी.डी.एस. कार्यरत आहे. अंतीम
यादीनुसार सदर समाज विकास संस्थेचे 427 सदस्य करणे आहे. ब - स्वयंरोजगार :-
ज्या
दारिद्ररेषेखालील कुटुंबाना बचत गटामध्ये सामावुन घेता येत नाही, त्यांच्यासाठी
वैयक्तिक स्वयंरोजगार अंर्तगत कमाल रूपये 50,000/-
मात्र मर्यादित वैयक्तिक कर्ज पुरवठा करण्यात येतो. कर्जाच्या रक्कमेच्या
15 टक्के एवढी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते.
बचत व काटकसर
गट - या योजनेचा प्रमुख उद्देश सामुहिक सबलीकरणातून महिला
सक्षमीकरण व महिला उद्दोगातून सामुहिक दारिद्रय निर्मुलन करणे असा आहे.
दारिद्र रेषेखालील
10 ते 20 कुटुंबातील प्रत्येकी एक महिला सदस्य मिळून एक बचत गट बनतो.
या बचत गटांना प्रशिक्षण व अंर्तगत बचतीद्वारे सक्षम बनविण्यात येते.
महिला
व बालके विकास - बचत
गटांचे वस्तु उत्पादन करणाऱ्या वा सेवा पुरवणाऱ्या व्यवसाय गटामध्ये
रूपांतरण केले जाते. या गटाला व्यवसाय करण्यासाठी प्रकल्प किंमत रूपये 2,50,000/-
मात्र पर्यंत कर्ज् बँकाकडून पुरविले जाते. सदर गटाला या योजने अंर्तगत
प्रकल्प किंमतीच्या 50 टक्के येवढे अनुदान मिळते. सदर गटांना मुलभुत
सुविधा उपलब्ध करून
दिल्या जातात. या व्यवसाय गटातील सदस्य दारिदय्र रेषेवरती यावे असे अपेक्षित
आहे.
प्रशिक्षण - या
घटकाअंर्तगत दारिदय्ररेषेखालिल व्यक्तींना किंवा बचतगटातील महिलांना
स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण हे व्यवसायभिमुख
असते. ब्युटीपार्लर फॅशन
डिझायनींग संगणक सारख्या व्यवसायभिमुख कोर्सेसचे प्रशिक्षण या घटकाअंर्तगत
दिले जाते. शहरामध्ये मिटकॉन आ.टी.आय. सारख्या शासनमान्य संस्थाकडून
तर काही खाजगी
संस्थाकडून हे प्रशिक्षण पुरे केले जाते.
क : नागरी मजुरी रोजगार कार्यक्रम
शहरामधील दारिद्रयरेषेखालिल लाभार्थींच्या श्रमशक्तीचा उपयोग सामाजिक व आर्थिकदष्टया
उपयुक्त अशा सार्वजनिक मत्तांच्या निर्मीतीसाठी करून घेउन रोजगार पुरवण्यावर
या कार्यक्रमाचा भर असतो.
या कार्यक्रमाअंर्तगत घेतलेल्या कामासाठी साहित्य व मजुरी यांचे प्रमाण 60/40
या प्रमाणत राखले आहे. संबंधीत क्षेत्रासाठी वेळोवेळी लागु असलेल्या किमान मजुरी
दराप्रमाणे या कार्यक्रमांच्या लाभाथ्यार्ंना मजुरी दंण्यात येते.
या विभागामध्ये खालिल कर्मचारी कार्यरत आहे.
सौ. नेहा करमरकर, प्रकल्प अधिकारी
|