या
विभागामार्फत नगर परिषदेचे वार्षिक अंदाजपत्रक
तयार करणेत येते . अंदाजपत्रक व जमाखर्च आर्थिक
वर्षाचे 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीसाठी
तयार करणेत येते
अंदाजपत्रक महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे
कलम 101 मधील तरतुदीनुसार करण्यात येते. अंदाज पत्रकाचे तरतुदीस अधिन राहुन
ठेकेदारांचे धनादेश अदा करण्याचे काम केले जाते. नगर परिषद कर्मचा-यांचे नेमणुक
दि. 1/04/1966 नंतरचे सेवानिवृत्त कर्मचा-यांचे निवृत्ती वेतन मंजुरीचे काम
या विभागामार्फत केले जाते. तसेच घरपट्टी, पाणीपट्टी व इतर विभागामार्फत जमा
होणारे कर या ठीकाणी स्विकारले जातात. माहीतीचा अधिकार 2005 अंतर्गत लेखाविभागाशी
संबंधीत माहीती नागरीकांचे अर्जानुसार पूरविली जाते.
या विभागात खालील कर्मचारी कार्यरत आहेत.
श्री.
प्रकाश स. लवेकर, लेखापाल तथा जनमाहिती अधिकारी
-
जनरल कॅशबुक व इतर योजनांच्यासंबधी कार्यवाही करणे तसेच लेखा विभागातील कामांचे
नियोजन करणे.
श्री. प्रकाश
आ. कापडी, रोखपाल -
नगर परिषद कर्मचा-यांचे वेतन
देयके अदा करणे . नगर परिषदेकडे जमा होणारे मालमत्ता
कर व इतर कर व सर्व प्रमाणपत्राने जमा होणारी
रक्कम या विभागा मार्फत बँकेमध्ये जमा करणे.
तसेच वेगवेगळया विभागामार्फत येणा-या बिलांचे
चेक काढणे व अदा करणे.
श्री. मनोहर
शां. शेलार, लिपीक -
शासकीय व नागरीकांचा पत्रव्यहार
सांभाळणे तसेच कर्मचारी विषयक सर्व प्रश्न संबंधी
कार्यवाही करणे. ठेकेदारांचे आयकर टी.डी.एस.
तयार करणे. वार्षिक अंदाजपत्रका संबंधी माहीती
तयार
करणे. माहीती अधिकाराबाबत प्राप्त होणारे अर्जाचे
लेखी माहीती देणे.
श्री. राजेंद्र
पां. जाधव, लिपीक -
जमा खर्चासंबंधी सर्व कार्यवाही
करणे जिल्हासांख्यिकी माहीती तयार करणे अनामत
व अग्रिम संबंधी आवश्यक ती सर्व कार्यवाही करणे
निवृत्ती वेतन, उपदान इत्यादी देयके तयार करणे.
व्दीनोंद लेखा पध्दती संबंधी आवश्यक ती कार्यवाही
करणे.
श्री.
श्रीनिवास य. जोशी, लिपीक -
चिपळूण नगर परिषदेकडे
जमा होणारे विकासकर, टेंडर तसेच सर्व प्रकाचे
अनामत व इतर विभागामार्फत वसुल होणारे करांच्या
संगणकीय पावत्या तयार करून देणे.
श्री. प्रसाद
वा. साडविलकर, लिपीक -
चिपळूण नगर परिषदेकडे
जमा होणारे मालमत्ता, पाणीपट्टी करांसंबंधी व
इतर करासंबंधीच्या रकमेच्या संगणकीय पावत्या
तयार करून देणे.