जनरल विभाग

प्रशासकीय अधिकारी

चिपळूण नगर परिषद ही ब वर्ग नगर परिषद असून प्रशासकीय अधिकारी म्हणून श्री. रामदास गोपाळ सांवत, हे शासकीय संवर्गामधून नियुक्त झालेले आहेत. त्यांना मुख्याधिकारी यांचे कांही मर्यादीत अधिकार महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 77 (2) नुसार अध्यक्ष, नगर परिषद चिपळूण यांचे मान्यतेवरुन सोपविण्यात आले आहे, त्यांचे मार्फत मुख्याधिकारी नगर परिषद करीता स्वाक्षरी करुन रहिवाशी प्रमाणपत्र , वीज कनेक्शन साठी नाहरकत प्रमाणपत्र , जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र , मालमत्तेचा उतारा, व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र, नागरिकाकडून अर्ज स्वीकारणे मुख्याधिकारी यांचे गैरहजेरीत कार्यालयीन कामे मुख्याधिकारी करिता म्हणून स्वाक्षरी करणे इत्यादी कामे सोपविण्यात आले आहे व नागरिकांची गैरसोय टाळण्यात आली आहे.

या विभागामार्फत महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 81 नुसार सभेचे कामकाज केले जाते मा. अध्यक्ष, नगर परिषद चिपळूण यांचे आदेशाप्रमाणे सर्व साधारण सभेची बैठक आयोजित करण्यात येते सर्वसाधारण सभेची बैठक दोन महिन्यातून एकदा बोलविण्यात येते. स्थायी समितीची बैठक प्रत्येक महिन्यात एकदा बोलविण्यात येते. तसेच विषय समितीच्या बैठका संबंधीत विभागामार्फत विषय समितीच्या सभापतीच्या आदेशावरुन बोलविण्यात येतात. सर्वसाधारण सभा व स्थायी समितीने मंजूर केलेल्या ठरावाच्या प्रती या विभागामार्फत पुरवण्यात येतात व विषय समितीचे ठरावाच्या प्रती समिती लिपीकमार्फत पुरविण्यात येतात.

माहितीचा अधिकार 2005

केंद्र शासन माहितीचा अधिकार 2005 ची अंमलबजावणी चिपळूण नगर परिषदेतर्फे करणेत येते. त्यासाठी नगर परिषदेने सर्व विभागाचे वरिष्ठ लिपीक यांची माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती केलीली आहे तसेच अपिलीय अधिकारी म्हणून प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे. नागरीकांनी माहिती अधिकार अन्वये मागविणेत आलेली माहिती विहीत मुदतीत दिली जाते.
चिपळूण नगर परिषदेचे सार्वत्रिक निवडणुका अधिसुचनेनुसार दर राज्य निवडणूक आयुक्त मुंबई पाच (5) वर्षात सार्वत्रीक निवडणुका घेण्यात येतात. चिपळूण शहर हद्दीतील विधान सभा मतदार संघातील भाग क्रमांकाच्या मतदार यादीच्या आधारे नगर परिषदेच्या वॉर्ड रचनेनुसार वॉर्ड निहाय मतदार यादी तयार करून मतदार यादी शहरातील नागरीकांना नियमानुसार योग्य ती संधी देऊन मतदार यादी अंतिम करण्यात येतात.


या विभागा मार्फत नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, नामनिर्देशित सदस्य, स्थायी समितीचे तीन सदस्य, विषय समित्याची निवडणुक प्रक्रिया नगर पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशाप्रमाणे ठरवुन दिलेल्या मुदतीत घेण्यात येतात. निवडुन द्यावयाच्या सदस्य संख्येमध्ये 30% महिलासाठी 27% नागरीकांच्या मागास प्रवर्गातुन एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसुचीत जाती व अनुसुचीत जमातीची सदस्य संख्या निश्चित करण्यात येते.

 
© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions