एक खिडकी विभाग

या विभागामार्फत नगर परिषद एक खिडकी योजना कडे नागरीकांचे जन्म/मृत्यु/मालमत्ता उतारा अर्ज ,प्रतिज्ञापत्राने नाव दुरुस्ती इत्यादी अर्ज स्विकारुन सदरचे दाखलेचे मागणीप्रमाणे फी भरुन त्यांना पावती पुस्तकामध्ये पावती करुन दिली जाते तसेच संगणकामध्ये नोंद करुन एक खिडकी योजनेचे निर्गती बाबतचे कुपन दिले जाते तसेच सदरचे अर्ज रोजचे रोज निकाली काढले जातात.

तसेच बांधकाम विभागाकडील संबधित इमला परवाना अर्ज,रेखांकन अर्ज, बांधकाम पुर्णत्व/विज कनेक्शन नाहरकत दाखले अर्ज,बिनशेती नाहरकत दाखले,व्यवसाय नाहरकत दाखले अर्ज नागरीकांकडन स्वकारुन त्याची योग्य ती फी भरुन पावती करुन दिली जाते व संगणकामध्ये नोंद करुन त्यांना निर्गतीबाबतचे कुपन दिले जातात.

कर वसुली विभागाकडील खरेदीखताने /वारसाहक्काने नावदुरुस्तीबाबतचे नागरीकांचे अर्ज स्विकारले जातात व सदर बाबतचे संगणकामध्ये नोंद करुन निर्गतीबाबतचे कुपन दिले जाते तसेच विहीत मुदतीत नगर परिषदेमध्ये नोंद न केलेल्याबाबत वसुली विभागाकडून कार्यवाही होवून नागरीकांना दंडात्मक नोटीस दिली जाते त्यानंतर संबंधित नागरीक समक्ष एक खिडकी विभागाकडे येतात व त्यांना त्याबाबत संपुर्ण माहिती दिली जाते व मुदतीत त्यांना उत्तर दिले जाते.

आरोग्य विभागाकडील आरोग्य नाहरकत,वृक्षतोड परवाने इत्यादी अर्ज स्विकारुन संगणकामध्ये नोंद करुन त्यांना निर्गतीबाबतचे कुपन दिले जातात व आरोग्य नाहरकत दाखले मंजुर झालेनंतर त्याची फी एक खिडकीकडे जमा करुन पावती दिली जाते.

पाणी पुरवठा विभागाकडील नवीन नळ कनेक्शन मागणी अर्ज नागरीकांकडून स्किाकारले जातात व सदरबाबत संगणकामध्ये नोंद करुन निर्गतीबाबतचे कुपन दिले जातात.

वरील सवंर्प्रकारचे अर्ज स्विकारुन संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी आवक रजिस्टर मध्ये नोंद करुन रोजचे रोज पाठविले जातात.

तसेच संपुर्ण दिवसात झालेल्या सर्वसाधारण पावत्यांची संगणकामध्ये नोंद केली जाते त्यानंतर सांयकाळी कलेक्शनची प्रत काढून व पावती पुस्तकावर शेरा मारुन नगर परिषद लेखा विभागामध्ये कॅशियर यांजकडे रोजचा भरणा रोज जमा केला जातो.

वरीलप्रमाणे सर्व कामे रोजचे रोज केली जातात तसेच सर्व अर्जाचे निकाली प्रकरणाबाबत मा.जिल्हाधिकारी सो,रत्नागिरी यांचे कडे मासिक रिपोर्ट पाठविला जातो.

वरील प्रमाणे एक खिडकी योजनेचे दररोज कामकाज चालत आहे.

या विभागामध्ये खालील कर्मचारी कार्यरत आहेत.

1 श्री. नंदकुमार शांताराम जाधव, लिपीक

 
© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions