अभिलेख व भांडार विभाग


चिपळूण नगर परिषदेमध्ये अभिलेख व भांडार हा स्वतंत्र विभाग आहे. हया विभागामधून नागरीकांना आवश्यक असणा-या जन्म व मृत्यचा दाखला देण्यात येतो.

नगरपरिषदेकडे जन्माचे दाखल्यांचे व मृत्यूच्या दाखल्यांचे 1920 सालापासून रेकॉर्ड उपलब्ध आहे. अंदाजे दरवर्षाला सुमारे 7500 जन्म नोंदीचे दाखले दिले जातात व अंदाजे 2500 मृत्यूचे दाखले दिले जातात.

सुरुवातीला जन्म व मृत्यूचे दाखल्या करीता रक्कम रु. 1.70 मात्र नगरपालिका फी अकारत होती आता सदरची फी रक्कम रु. 10/- झाली आहे.

1920 च्या दरम्यान प्रचलीत भाषा मोडी होती त्यामुळे दाखले देण्याकरीता भाषेची अडचण येत असे ही अडचण ओळखून सन 1925 ते 50 पर्यंतचे जन्म व मृत्यूचे दाखल्यांचे मराठीत भाषांतर करण्यात आले आहे. तसेच हया संगणकाच्या युगात नगरपालिकेने सुध्दा भरारी मारलेली आहे. सबब सन 2002 सालापासून जन्म व मृत्यूचे दाखले संगणकीकृत केलेले आहे व नागरीकांना तातडीने दिले जातात.

नगरपरिषदेचे जुने अभिलेख सुस्थितीत ठेवण्यात आले आहेत. शासनाचे परीपत्रकाप्रमाणे अ, ब, क, ड असे कागदपत्रांचे वर्गीकरण करण्यात येते.

"अ" वर्गामध्ये कायम स्वरुपी जतन करण्याचे कागदपत्र येतात.
"" वर्गामध्ये 10 वर्षापूर्वीचे कागदपत्रांचे वर्गीकरण येते.
"" वर्गामध्ये 5 वर्षाचे आतील कागदपत्रांचे वर्गीकरण येते.
"" वर्गाकरीता 1 वर्षाचे आतील कागदपत्रांचे वर्गीकरणे येते.

नगर परिषदेने जुने अभिलेख सन 1876 सालापासून जतन केलेले आहे. अ वर्ग कागदपत्रांमध्ये सर्वसाधारण कौन्सिल ठराव / प्रोसिडींग / कॅशबुक / स्थावर / जंगम मालमत्ता नोद वही असे अभिलेख येतात.

 
© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions