आवक जावक विभाग
आवक
या विभागा
मार्फत कार्यालयास प्राप्त झालेले शासकीय शासन
पत्रके व नागरीकांकडून प्राप्त झालेले सर्व अर्जाच्या
नोंदी संगणक प्रणालीमध्ये नोंद केली जाते. सदर
नोंदीमध्ये पत्रावर कार्यालयाचा शिक्का मारून,
शिक्यामध्ये क्रमांक व दिनांक व कार्यवाही विभाग
यांची नोंद करण्यात येते. त्यानंतर प्रत्येक पत्र
मा. नगराध्यक्ष, मा. मुख्याधिकारी तसेच प्रशासकीय
अधिकारी, यांचे निदर्शनास आणून त्यांची सही झाल्यावर
सर्व पत्र संबधीत विभाग प्रमुखांकडे पुढील कार्यवाही
करीता सुपूर्द करणेत येते. सर्व पत्र सुपूर्द करताना
आवक विभागाची एक स्वतंत्र टपालवही ठेवणेत आली आहे.
यावहीमध्ये त्या-त्या विभागांना प्ात्र देताना
त्यांची पत्र विभागात मिळल्या बद्दल पोच म्हणून
दिनांकासहित स्वाक्षरी घेतली जाते. याच विभागात
माहितीच्या अधिकाराचे अर्ज स्वीकारले जातात, त्याचे
स्वतंत्र रजिस्टर ठेवणेत आले आहे. त्या रजिस्टर
द्वारे माहिती अधिकारी यांचे कडे त्वरीत सदरचे
अर्ज पुढील कार्यवाहीसाठी पाठविले जातात, सदरचे
कामकाज कार्यालयीन कामकाजाच्या दिवसाप्रमाणे नोंदविणेत
येते.
जावक
नगर परिषदे
तर्फे पाठविण्यात येणारे पत्रव्यवहाराची नोंद विहित
नमुन्यात असलेल्या संगणकीय जावक रजिस्टरद्वारे
जावक नंबर टाकला जातो. प्रत्येक विभागात संगणक
असल्याने प्रत्येक विभागात जावक करता येते, त्यानंतर
जावक झालेले टपाल व संबधीत विभाग प्रमुखांची स्वाक्षरी
असलेले पत्र आवक जावक विभागमध्ये दिले जाते. तशी
विभागातील अंतर्गत टपाल वहीमध्ये आवक-जावक लिपीकाची
स्वाक्षरी घेतली जाते. त्यानंतर आवक-जावक लिपीक
दिलेल्या पत्यावर शासकीय पत्र पोस्टाद्वारे संबधीत
ठीकाणी रवाना केले जाते. तसेच शहरातील नागरीकांसाठी
पाठविणेत येणारी पत्र टपालवही विहीत नमुन्यातील
आहे. त्या नोंदवहीमध्ये नागरीकाचे नांव पत्ता लिहून
नगर परिषद कर्मचाऱ्यांमार्फत पाठविली जातात. पत्र
पोचकरताना वहीमध्ये संबधीतांची स्वाक्षरी दिनांकासहीत
घेण्यात येते. अशाप्रकारे पत्रव्यवहार पुर्ण केला
जातो. सदरचे कामकाज कार्यालयीन कामकाजाच्या दिवसा
प्रमाणे नोंदविणेत येते.
आवक जावक लिपीक - श्री. प्रसाद देवरूखकर