आरोग्य विभाग

आरोग्य विभागामार्फत शहरातील स्वच्छतेची कामे करणेत येतात. रस्ते सफाई गटर सफाई, रस्त्यालगतची बेणणी इ. कामे करणेत येतात. शहरात 6 घंटागाड्या सुरू असून कामाचे सोयीचे दृष्टीने घंटागाडीद्वारे कचरा गोळा करणे कामाचे 12 प्रभाग करणेत आलेले आहेत. घंटागाडीद्वारे कचरा गोळा करणे कामाची वेळ सकाळी 6.30 ते 1.30 असून, प्रत्येक घंटागाडीवर 4 सफाई कामगार काम करतात. शहरातील गटर सफाई व डेब्रीज उचलणेकामी एक वाहन आहे. साथ रोग उद्भवू नये, यासाठी व डासांचा प्रादुर्भाव कमी करणेसाठी 3 फॉग मशिन व 5 हॅन्ड मशिन व 5 हॅन्डपंप असून शहरात अॅबेट, कार्बोलिक पावडर, हर्बो पावडर फवारणी करणेत येते.
शहराच्या विस्तार व वाढती लोकसंख्येच्या प्रमाणात असलेल्या सफाई कामगारांची संस्था फारच कामी असल्यामुळे शहरातील बाजारपेठ, उक्ताड, खेंड, गोवळकोट, पेठमाप भागातील गटर सफाई रस्ते सफाई घंटागाडीव्दारे कचरा गोळा करणे काम सेवा तत्वावर ठेकेदार पघ्दतीने करणेत येते.

घनकचरा व्यवस्थापनासाठी नागरीकांमध्ये जनजागृती वाढविणेसाठी काम केले आहे घनकचरा व्यवस्थापनासाठी शहरात शिवाजी नगर भागात सर्वे नं. 168 हि.न. 3/2 मधील 240 गुंठे जागा खरेदी करणेत आली असून सदर जागेला तारेचे कुंपण करणेचे काम पुर्ण झाले असून, सदर जागेत बी.ए.आर.सी. ने विकसीत केलेला निर्सगऋण प्रकल्प उभारणेचे काम पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. सदर ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करणेत येणार आहे. सद्या ओल्या कचऱ्यापासून कंपेास्ट खत तयार करणेत येते व सुका कचरा भुमी भरावासाठी वापरणेत येतो. दरवर्षी शासन आदेशानुसार संत गाडगे बाबा नागरी स्वच्छता अभियान संपुर्ण शहरात राबविणेत येते. या विभागामार्फत बेवारस प्रेत व बेवारस जनावरे यांची विल्हेवाट लावणेत येते. तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणेत येतो. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये प्राप्त झालेल्या अर्जानुसार अर्जदार यांना माहिती पुरविणेत येते.

 
© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions